बापा कावुन गा आबा …आज रातच्या टायमाले पारावर येउन बसला .डोयान दिसते काय रातच्यान.अन तुय त मोतीबींदुच आपरेशन बी झाल आहे न.
अरे बापा काय कथा सागु तुले माया घरची…नीरा त्या टी .वी पाई जीव वैतागून गेला माया वाला.बेजा काव आनला …रात दीस नीरा ते बीनकामाच टप्पर चालु रायते राज्या.अन लेकरं बी घरी रायतेत.लेकरापाई त पागल झाल्यावानी लागते मले.दीसभर नीरा भांडन..तंडन चालु रायते. त्यायले मारता बी येत नाइ,आजकाल लेकराले माराच नाई अस म्हनतेत बापा.लेकर बेजा काफर झाले.
मी काय मनतो आबा तुम्ही मुकाट्यान सीरेल पायत जा ना मगं कायले ईचुकाट्याच ईकड..तीकड फीरा लागते.
अरे बाबु …त्या बायकाच्या सीरेल मले आवडत नाइ…सीरेलच नाव काय त ” माया नवऱ्याची दुसरी बायको सांग मंग आता कशी आवडन मले .मी मनतो बातम्या पावु द्या मले त बुडी नीरा आंगावर धावते.तीले लय आवडते बापा ते सीरेल.समद्या जीदंगीत तीन मले दुसऱ्या बाईशी बोलु दिल नाई ..दुसऱ्या बाईकड पावु बी नाई दिल..अन तेच आता ” माया नवऱ्याची दुसरी बायको पायते .सांग बाबू तुच आता काय जमाना आला.
अरे बाबु.. माया तरुनपनात रातच्या टायमाले भजन ..कीरतन रायत जाये. जेवन झाल कि सबन गावतले मातारे मानस..उली.,उली लेकर..बाया..बापड्या समदे जन एका ठीकानी जमा होत.मंग मायासारखा मतारा भजन करे…किरतन करे , सारे मन लावुन गुंगुन जायचे.लहान लेकर तटीसा झोपून बी जायचे , मंग काय आना त्यायला कडेवर.माया लायना भाउ त रोज असा करे.
पण तुले सांगतो बाबु लय चांगले दिस होते ते .कानावर चांगले सबद पडाचे.मन कस शांत राहाच..मोठ्याचा मानदान त्यायच्या शब्दाले किंमत रायत जाये.आतासारख होत काय बापा..कोनी कोनाले ईचारत नाई.जो तो आपल्या तालात.आता मायाच घरच पाय न मले टी.वी पायाची उजागरी नाई.ते लेकर त निरा वाकुल्या दाखुन पयतात.
नीरा कारटुन पायतात.अन तसच करुन पायतात
मायावाला लायना नातु त ईरभर ते सिंचन पायत रायते.
अन ते पावुन झाल की तसाच करते.लयच ईलबीस आहे ते पोरग.मायले..बापाले उलीसा भेत नाई. अन आता त त्या मोबाईलच्या नांदी लागले.एक जन घेते मायचा..अन एक जन घेते बापाचा.फोनआले त सांगत नाही ते , येवढे खजाल आहे लेकर.
बर बाबु..मले जरास हात धरुन घरालोक नेउन दे.लय रात झाली.पडलो त बुढी लय भांडन करन.तीचा लय धाक आहे माया जीवाले.मतारपन आल पन अजुन बी तीचा धाक आहे जीवाले.पन एक सांगु का बाबु बुढी आहे त मायावाली मजा आहे नाईत मले कुनी बी हुंगाळत नाई. मले येळेवर जेवन..खावन देन , माय औषध ..पानी सबन पायते.
किती बी भांडलो तरी आमी ऐकाचे ऐकच हुतो.
आबा , आता या मतारपनात तुमी बी ते सीरेल पाहाची आदत लावुन घ्या.काय करता आता? लय चांगला टाइमपास होते त्यान.
खर आहे बाबु तुयवाल .मलेच आता बदला लागन.ते समदे जे पायतात ते मुकाटयान पायत जा लागन.कुठ आता अंधाराच हात पाय तोडुन घेत.अन वर बुढीचे भलकसे बोलने.जाउ दे बापा आता घरी लय रात झाली.
पकड रे बाबु हात जरासा..अन वजे..वजे घरालोक नेउन दे
मले त रस्ता बी दिसुन नाइ रायला अंधाराचा
ज्योती रामटेके
आबाचं दुख- लय भारी