जोडीदार-१३-उलटे पडले फासे
जोडीदार-१३-उलटे पडले फासे

जोडीदार-१३-उलटे पडले फासे

उलटे पडले फासे
-जोडीदार
भाग-१३
तुम्हाला कोणी सांगितले खूनी सापडल्याचे?
ज्याला पकडले त्याच्यावरील गुन्हा अजून सिद्ध झाला नाही. योग्य वेळ आल्यावर आम्ही सांगूच. या आता तुम्ही.मानकरसर जरा रागातच बोलले.
मयंक अग्रवाल नावाजलेला बिझनेसमॕन असल्यामुळे त्याच्या केसकडे मिडियाचे लक्ष राहणारच होते……
आता वाचा पुढील भाग
उलटे पडले फासे-जोडीदार
भाग-१३
कंपनीतच सुगावा लागेल काहीतरी. अशी आता मानकरसरांना खात्री वाटू लागली.
दुसऱ्या दिवशी मानकर सर आधी रमाला घेऊन पोलीसस्टेशनला गेले.विनय रमाची वाट बघत होताच. ती दिसल्यावर तिच्या नजरेला नजर देणे टाळले त्याने. रमासारख्या सुशील मुलीला आपण काही देवू शकलो नाही ही सल त्याला नेहमी डाचत राहायची. 
विनयला गजाआड बघून रमाचे काळीज पिळवटले.
त्याची खाली गेलेली नजर बघून  आतापर्यंत आवरलेले तिचे  अश्रू वाहायला लागले.
तिने विनयचे हात पकडले
विनय माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू चोरी का केली माहीत आहे मला.आईच्या इलाजाला पैसे नाहीत म्हणून तू अविचाराने  हे पाऊल उचलले. 
विनयला रमा समजून घेईल याची खात्री होती.
रमासारखी जोडीदार मिळाल्यामुळे तो स्वतःला भाग्यवान समजायचा.
नशिबाने खूपदा दगा दिला पण रमासारखी सहचरीणी मिळायलाही नशीब लागते असेच त्याला वाटायचे.
पण कशाही साठी केला तरी गुन्हा तो गुन्हाच. 
रमाचे शब्द त्याच्या कानावर आदळले. 
थोडा धीर धरला असता तर काहीतरी मार्ग  निघाला असता.
मी तुझ्या प्रामाणिकपणावर भाळले होते रे. आज 
मात्र त्याच्यावरच प्रश्नचिन्ह लागले.
विनय- रमा हतबल झालो होतो मी. खूप प्रयत्न केले पैसे जुळविण्याचे पण व्यर्थ. आईला माझ्या डोळ्यासमोर कसे मरु देवू? 
माझा प्रामाणिकपणा आईला नव्हता वाचवू शकत.म्हणून मला चोरी करावी लागली.
रमा- तू केलेली चोरी आईला वाचवणार का? उलट आईला हे कळले तर त्या ह्याच आघाताने जातील.
विनय– नको ग अशी बोलू रमा. तू फक्त  तूच  मला समजून घेऊ शकते.
रमाने विनयच्या हातावर हात ठेवून त्याला आश्वस्त केले.
विनय-आईला हे काहीही कळता कामा नये.
रमा- नाही कळणार.तू निश्चिंत रहा.
विनय-बाळ कसा आहे?
त्याच्या वडिलांनी चोरी केली हे समजले तर पार हादरुन जाईल ग तो. माझ्यासारखे नको व्हायला त्याचे.
आणि  विणा? तू  इकडे आल्याचे  माहित आहे का तिला?
रमा– नाही.मी काही दिवस माहेरी जाऊन येते असे सांगून आले.विनय तू काळजी करु नकोस.आपल्या  बाळाला नाही समजणार कधी. तो भाऊजींच्या घरी आहे.तुझ्या  रमावर विश्वास ठेव.
खूप  संकटावर आपण मात करुन इथवर पोहोचलो.हेही दिवस जातील.
देव आणखी किती परीक्षा घेईल आपली?
थकेल तो एक  ना  एक दिवस.
मानकरसर लांब उभे राहून दोघांमधले बोलणे ऐकत होते.
ते विनयजवळ आले आणि  म्हणाले,
विनय तू काळजी करु नकोस.आईचा इलाज मी करतो.
वहिनी तुम्ही उद्याच वापस जा आणि  आईला घेऊन या.इथल्या दवाखान्यात आॕपरेशन करु आपण.
मानकरसरांच्या बोलण्याने विनय आणि रमाला खूप धीर आला.
रमाने त्यांच्याकडे बघून हात जोडले.
मानकरसर— वहिनी हात जोडून मला लहान करु नका.
विनय माझा केवळ मित्रच नाही. माझ्या जीवनाला दिशा त्याच्याच मुळे मिळाली आहे.
वहिनी–तरी एवढे कोणी करत नाही भाऊजी कुणासाठी.
त्यातही मित्र गरीब आणि चोरी,खुनाचा आरोप असणारा असेल तर कोणी जवळ फिरकत नाही.
एवढे बोलून डोळे पुसत रमा बाहेर आली.
रमाला घरी सोडून मानकरसर मयंकच्या कंपनीत गेले.
मयंक अग्रवालच्या सेक्रेटरीला भेटले. यापूर्वीही भेटले होते.पण तो काहीही बोलायला तयार नव्हता.
आज सेक्रेटरीकडून मानकरसरांनी बोलता बोलता ही कंपनी आधी भागीदारीत होती हे सांगून टाकले.
साधारण पाच वर्षापासून मयंकच्या हाती पूर्ण कंपनी आली होती. कंपनीचे सगळे अधिकार आता त्याच्याजवळ होते.
सेक्रेटरीने सांगितल्याप्रमाणे भागीदार मयंकचा चुलतभाऊ 
शाश्वत अग्रवाल होता.
शाश्वत अग्रवालची आता दुसरी कंपनी होती.
शाश्वत अग्रवालला भेटणे आता गरजेचे वाटू लागले.
मानकर सर  शाश्वत अग्रवालच्या कंपनीकडे वळले.
कंपनी छोटी होती.
अजून नीट जम बसला नव्हता.मानकर सरांच्या बोलण्यावरुन शाश्वतला त्याच्याकडे संशयाची सुई वळलेली दिसायला लागली.
मानकर सर-  मि. शाश्वत तुमची भागीदारी का तुटली?
शाश्वत अग्रवाल- सर,आमची भागीदारी तुटली पण त्यामुळे आमच्यात शत्रुत्व आले असेल असा समज कृपया करु नका.
शत्रुत्व न येता भागीदारी कशी तुटेल?
सांगतो.बसा तुम्ही. मानकरसर बसले.त्यांच्या समोरच शाश्वत बसला.आणि  सांगू लागला.
मयंक आणि  मी लहानपणापासून सोबतच वाढलो.
आमच्या वयात असलेल्या कमी अंतरामुळे आम्ही चुलतभाऊ कमी आणि मित्र जास्त होतो. आमची आजी असेपर्यंत आमचे एकत्र कुटुंब होते.आजी गेल्यावर संपत्तीच्या वाटण्या झाल्या. आणि  आम्ही दुसऱ्या घरी राहायला गेलो. तेव्हा आम्ही काॕलेजमध्ये होतो.एवढी सोबत,एकत्र घालवल्यावर आम्ही कंपनीही सोबतच काढायचे ठरवले.
मानकर सर– मग भागीदारी तुटण्याचे कारण?
मयंक-शाश्वतची भागीदारी का तुटली असेल?
खूनी मयंक असेल का…..

कथामालिका कशी वाटत आहे?
Comment मधून अवश्य कळवा.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
Previous PART

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!