८- स्वप्न तहानलेले
भय इथले संपत नाही
ज्योती रामटेके
प्रिय वाचक,आतापर्यंत तुम्ही वाचले
आनंदी मुलांना घेऊन खूप वर्षानंतर माहेरी आली.तिचे पुर्वायुष्य व्यापलेल्या कनकच्या आठवणी नव्याने ताज्या झाल्या. आता पुढे वाचा
भाग-८
भय इथले संपत नाही
आंनदी, दीपा त्यांच्या आवडीच्या दगडावर बसल्या.तो दगड आजही तसाच होता.
दीपा हा दगड तसाच आहे ग. पुराच्या पाण्यात तग धरून आहे. आपण तिघे या दगडावर तासनतास बसून गप्पा करायचो.
गप्पा तरी कोणत्या,?
शाळेतल्या नाहीतर गावातल्या. कधीतरी कनक वाड्यातल्या गोष्टी सांगायचा.किती निष्पाप वय होते ते.
कनक जगावेगळा होता .त्याला त्याच्या श्रीमंतीचा, वैभवाचा जराही दंभ नव्हता.तो फक्त प्रेमावर विश्वास ठेवायचा.
आंनदी तुझ्या लग्नानंतर कोलमोडला होता कनक. त्याची जगण्याची इच्छा नाहीसी झाली होती. तुझ्या आठवणीत व्याकुळ होत होता. मी कधी मैत्रीण बनून तर कधी बहीण बनून त्याला धीर देत होती.
त्याचे मन वाड्यात रमत नव्हते. मग तो माझ्याकडे येत होता. संध्याकाळी आम्ही नदीवर जायचो. तो तुझ्या आठवणींच्या पाऊलखुणा शोधायचा. हळवा आहे ग तो. त्याला त्याच्या स्वभावाची चीड येत होती.मी पेटून उठायला हवे होते ग दीपा.आक्काच्या विरोधात जायला हवे होते…
असे काहीतरी बडबडायचा.
तुला दिलेल्या शब्दासाठी तो नव्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा.त्याला कसेही करुन गरिब मुलांच्या सोयीसाठी शाळा बांधायची होती. तसे तुम्हा दोघांचे ठरले होते.
तुझ्या लग्नानंतर वाड्याला अवकळा येऊ लागली.
कनकचे बाबा आजारी पडले.कनकने खूप सेवा केली त्यांची. त्यांचा आजार हा मानसिक होता. त्यांना कसेही करुन त्याचे लग्न बघायचे होते.तो कधीच लग्नाला तयार होणार नाही हे त्यांना कळत होते. पण मनात आशा होती.
कनकने शाळेचे बांधकाम सुरू केले. शाळा सुरू झाली होती.पण काही दिवसच.
हळूहळू त्याचे मन विचलित व्हायला लागले.
मला आता वाड़याचा कंटाळा आला. दुर कुठेतरी निघून जावेसे वाटते. इथे नाही राहायची इच्छा होत आता. समोर मला फक्त श्वास घ्यायचे आहेत. जगणे तर आंनदी सोबत कायमचे गेले.
त्याला जगाण्यात काहीही रस उरला नाही. त्याच्या
असे तो सांगायचा.एक दिवस तो आश्रमात निघून गेला.
शाळा बंद पडली.काही दिवसांनी त्याचे बाबा गेले. मधल्या काकाला मुलबाळ नव्हते.लहान काकाच्या मुलींचे लग्न झाले. वाडा ओस पडला.
आंनदीला हे सर्व ऐकून यातना होत होत्या. दीपा, कनक पुन्हा वाड्यात वापस येईल का? त्याच्या जाण्याला अप्रत्यक्ष मी जबाबदार आहे.
लग्नानंतर मी माझ्या संसारात गुंग झाली, किंबहुना जरा जास्तच गुंतत गेली.हे सारे ठरवून केले.
भुतकाळाची जराही सावली माझ्या घरावर नको म्हणून माहेर सोडून दिले.मी पण दुःखात होते.हळूहळू सावरले स्वतःला.
धवलचा विश्वासघात केला असता तर स्वतःला माफ नसते करु शकले मी.लग्न झाले त्या दिवशी एक नवीन जन्म झाला माझा. तो जन्म फक्त आणि फक्त धवलसाठी होता. नंतर मी आई झालेमुले आणि धवलशिवाय आयुष्य उरलेच नाही माझे
.
जसे वय वाढते तशी प्रगल्भता येते म्हणतात.कनक सारे विसरून लग्न करेल असे वाटायचे मला.
मग तू ओळखलेच नाही आनंदी त्याला.
दीपा आपण त्याला वाड्यात येण्याची विनंती करू. येईल तो. त्याचे घर.. शाळा त्याची वाट बघत आहे. आणि आराधना पण.
तिने मनातून कनकवर प्रेम केले.पण कधी दर्शवले नाही. मला तिच्या भावना कळायच्या. तिने कधी माझा राग केला नाही. तिला कळल्यावर देखील आधी सारखीच वागायची.
आराधना अजूनही त्याच्या प्रतीक्षेत असेल. वाट बघत असेल ती कनकची.
दीपा, त्या झाडाला बघ,झोका बांधून दिसत आहे.झुलायचे का ग आपण.किती काळ लोटला. लहानपणी आपण तिघे नदीवर आलो कि किती झोके घेत होतो. तेव्हा प्रत्येक झाडाला झोका बांधून दिसायचा. नागपंचमीच्या दिवशी तर गावातल्या सर्व बाया येत होत्या.
पहिला मान वाड्यातील बायांना दिला जायचा. किती झोके घ्यायचे यावरून आपले बरेचदा भांडण होतं होते.कनक मात्र बघत राहायचा. त्याला भांडता सुध्दा येत नव्हते.
दीपा.. रात्र होत आहे.मुले वाट बघत असतील. चल घरी.
दोघी घरी जायला निघाल्या. आंनदीने मागे वळून बघितले.
त्या दगडावर कनक बसल्याचा भास झाला. तेवढ्यात दुरुन सुसाट वेगाने पाण्याचा लोंढा आला आणि कनक नाहीसा झाला.
कनक, तुला पोहता येते नं.. मग कसा वाहत गेला तू..
कनक.. कनक म्हणून आक्रोश करु लागली.
आंनदी.. अग काय झाले. दीपा तिला हलवत होती. काही भास झाला का तुला?
दीपा.. कनकला वाड्यात आणायला हवे..
उद्या आपण जाऊ वाड्यात.
तिच्या कानांना कधीतरी कनकनेच गायलेले गाणे ऐकू येऊ लागले.
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते…….
कथामालिका कशी वाटत आहे?
Comment मधून अवश्य कळवा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा




खूप छान कथा मालिका
Wah
छान कथा
खुप भावनिक कथा