भाग-५ – तृष्णा (प्रेमाची)
आम्ही एकाच वर्गात होतो.पण एकमेकांशी बोलणे कमी व्हायचे. आईचा धाक होताच.तिला कळू न देणे यासाठी जीवापाड प्रयत्न केले. अकरावी,बारावी दोन वर्ष आम्ही सोबत राहलो. एकही पुरुष नसलेल्या घरात मी वाढले होते.पहिल्यांदा पुरुषाचा आधार काय असतो हे चैतन्यच्या सहवासात उमजले.
आईला माझ्यातला बदल जाणवला.तिने विचारले आणि मी आईशी खोटे नाही बोलू शकले.आईला माझे कुणावर प्रेम आहे हे मान्य करणे शक्य नव्हते. आईने मला समजवण्याचा प्रयत्न केला. काॕलेज बंद करायची धमकी दिली. बारावीचा रिझल्ट आला आणि चैतन्य इंजिनियरींगला नंबर लागला म्हणून दुसरीकडे गेला.तो इथे त्याच्या मामाजवळ शिकायला होता.एकदा काॕलेज सोडल्यावर आम्ही कधीही भेटलो नाही. त्याने एक दोनदा काॕलेजमध्ये येऊन मला भेटण्याचा प्रयत्न केला.पण तो काॕलेजमधून गेल्यावर मी काॕलेजमध्ये जाणे बंद केले होते.शिवाय त्याला न भेटण्याचे आईला दिलेले वचन मी मोडू शकत नव्हती. आईच्या आयुष्यात बाबा गेल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीची मी साक्षीदार होती. तिच्या जगण्याचा मी एकमेव आधार होती.
अचानक आयुष्यात आलेला चैतन्य जातांना चैतन्य सोबत घेऊन गेला.
बारावी झाल्यावर मी घरुनच परीक्षा देत बी.ए. केले.आमचे दोघींचे एकमेकींसाठी आयुष्य सुरु होते.आईने शिलाई काम करुन माझ्या लग्नासाठी पैसे जमवले. माझ्या लग्नाचे,सुखी संसाराचे स्वप्न तिच्या डोळ्यात नेहमी तरळायचे.
तिने एका मंडळात माझे नाव नोंदवले.
तिथेच हा माझा जोडीदार भेटला. आईला माझ्यासाठी जसा जोडीदार हवा होता तसाच मिळाला.
मला कुटुंबाची सवय नव्हती. याला पण कुटुंब नाही. लहानपणी अपघातात वडील गमावलेला,बहीणभाऊ नसलेला मुलगा जावई आईला पसंत पडला. त्यांचीआई खूप आजारी असल्यामुळे त्यांना लग्नाची घाई झाली होती.जोडीदाराचे नाव मी सखा ठेवले.
मी आणि मुक्ता इथे राहलो तर आम्ही सुखी राहू.मुक्ता महत्वाकांक्षी नाही.मी सोबत असलो कि ती सुखी असे सरळ गणित आहे तिचे. मी जाऊ का परदेशी?
हाॕटेलमध्ये परतेपर्यंत त्याच्या डोक्यात ह्या विचारांनी गर्दी केली होती.
हाॕटेलच्या बाहेरच त्याला विजय भेटला.
साहेब एक गिऱ्हाईक मिळाले घरासाठी.उद्या आणतो त्याला.
बरं. अमोल उत्तरला.
विजयसोबत गप्पा करत दोघे एका धाब्यावर जेवायला गेले.विजय जवळपास अमोलच्याच वयाचा. दहावा वर्ग शिकलेला.नंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून आॕटोरिक्षा चालवायला लागला.
विजयने अमोलला हाॕटेलमध्ये सोडले आणि परत गेला.
अमोल रुममध्ये आला. कॕसेट नंबर तीन त्याला खुणावत होती.पण सकाळीच गिऱ्हाईकाला भेटायला जायचे होते.म्हणून तो झोपण्याचा प्रयत्न करु लागला.
सकाळी अमोल विजयच्या फोनने उठला.
रात्री प्रयत्न करुनही उशिरा झोप लागली.अमोल पटकन तयार होऊन खाली उतरला,विजय वाट बघत होताच.
घर हवे असणारा मनुष्य परस्पर घराकडे पोहचला.
अमोल त्यांना आत घर बघायला घेऊन गेला. घराची माहिती अमोललाही जुजबीच होती.पण समोरच्या माणसासाठी तोच घरमालक होता.
त्या मनुष्याला घर आवडले.एकदोन दिवसात नक्की काय ते कळवतो असे सांगून गेला.तो गेल्यावर बाजुचे काका आले.त्यांनाही घर आवडले होते. बाजूचेच असल्यामुळे त्यांना हवेच होते.
अमोल बाबांशी बोललो मी सकाळी. ते तयार आहेत मला घर विकायला.
बरं काका.
काका निघून गेले,विजय बाहेर उभा होता.
अमोलची नजर बेडरुममधील कवितेकडे गेली.
घर असावे असे माझे
तुझ्या स्पर्शाने ओलावलेले
प्रेमाने ते पाझरावे
कायम हसत असलेले
अमोल तृष्णाच्या आयुष्याशी गुंतत चालला होता.
पुढे काय? उत्सुकता शिगेला पोहचत होती.तृष्णाच्या खाजगी आयुष्यात डोकवायचे नाही असे मनोमन ठरवले तरी स्वतःला तो थांबवू शकत नव्हता.
मी घर विकू कसे?
हे घर तर तृष्णाचे आहे.
अमोल पटकन घराबाहेर पडला. मुंबईला लवकर परतायला हवे तो पुटपुटला.
मोबाईल बघितला.मुक्ताचे दोन मिस् काॕल होते.
त्याने फोन लावला.
बोल मुक्ता.
काय रे कुठे आहेस?
अग घरी आलो.गिऱ्हाईकाला दाखवायचे होते.
विक लवकर आणि ये परत लवकर.
हो ग राणी.
अमोल अरे तीनच दिवसांत तू भेटला नाही तर किती बेजार झाली मी तुझ्या आठवणीत.तू परदेशी गेल्यावर कशी राहू मी?
नाही जाऊ का मग?
नकोच जाऊ.
मलाही तसेच वाटते इथे आल्यापासून.
मुक्ता हे गाव इतके छान आहे ना इथेच राहावे वाटत आहे.
अरे तुला तर छोटे गाव आवडायचे नाही.
हो ग.पण हे वेगळे आहे,तू ये इथे एकदा. तुला पण आवडेल.
मुक्तासोबत बोलत असतांनाच बाबांचा फोन आला.
अमोल मला फोन आला होता त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेऊन परत ये. त्यांच्यासोबत बोलणे झाले माझे.दोनेक महिन्यांनी खरेदी करु.
बाबा मी येतो दोन तीन दिवसात.
का रे? तिथे कशाला रेंगाळतो आहेस? छोटे गाव आहे.तू थांबावे असे काहीही नाही तिथे. उद्या येऊन जा बेटा,
बरं बघतो बाबा असे म्हणत अमोलने फोन ठेऊन दिला.विजय निघण्याची घाई करत होता.
अमोलने त्याला जायला सांगितले. आज तो आरामात वापस जाणार होता.विजय गेला.अमोल परत एकदा तृष्णेच्या घरात शिरला.
काका रोज घरात येऊन घर थोडे थोडे स्वच्छ करत होते.त्यामुळे घर आता राहण्यायोग्य झाले होते.
अमोल बेडरुममध्ये बेडवर बसला.
आता तृष्णा कुठे असेल?
क्रमशः
Next Part
शब्दपर्णवरील वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या कथामालिकांच्या लिंक पुढे दिल्या आहेत.
आभास हा छळतो मला
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
सुंदरा मनामध्ये भरली
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.






उत्साहवर्धक कथा