उलटे पडले फासे
भाग-१७
आयुष्याची वाट–कथामालिका
आता आता कुठे जरा जगण्याचा आभास निर्माण होत होता.एकंदरीत सुखातच चालले होते सगळे.
पण आयुष्याची वाट एवढी साधी,सरळ असती तर कित्येक वाईट गोष्टी घडल्या नसत्या.
मला कुणाकडून उधार मिळणे शक्य नव्हते.
आईचा जीव वाचवणे आवश्यक होते.चोरीशिवाय पर्याय नव्हता.
शेवटी आईच्या प्रेमाने तिनेच दिलेल्या संस्कारावर मात केली आणि घडू नये ते घडले.
तुम्हाला नेहमी चोरीपासून परावृत्त करणाऱ्या माझ्या हातून चोरी झाली.
असे म्हणून विनय रडायला लागला.
थोडावेळ पुन्हा गप्पा रंगल्या.
शिल्पा,अर्पिता,रमा झोपायला निघून गेल्या.
आता विनय,राहूल आणि मनिष तिघेच होते हाॕलमध्ये.
विनयची जमानत तर झाली होती.पण आता कोर्टात केस सुरु झाल्यावर विनयला कसे वाचवायचे हा खरा प्रश्न होता.असली खुनी सापडत नव्हता.
मनिष आणि राहूल बराच वेळ या गोष्टीवर खलबत करीत बसली.पण उपाय सापडत नव्हता.विनय शांतपणे दोघांचे बोलणे ऐकत होता. आपले मित्र आपल्यावर एवढे प्रेम करतात हे बघून गहिवरला तो.
राहूलः विनय तू मयंकच्याच घरी का चोरी केली?
योगायोग.दुसरे काय?
एक दिवस पेपर वाचता वाचता मयंक अग्रवालची बातमी वाचली. त्याला कुठले तरी मोठे टेंडर मिळणार होते.
त्याखाली त्याच्या श्रीमंतीचेही वर्णन होते. ते वाचून मनात आले,मयंक जवळून सात लाख गेले तर त्याला फारसा फरक पडणार नव्हता.पण त्या सात लाखाने माझ्या आईचा जीव मात्र वाचणार होता.
मी पेपर वाचून मयंक अग्रवालची,त्याच्या घराची माहिती मिळवली.
चोरी करायला मन धजावत नव्हते पण मेंदूने मात केली मनावर.
मनिष—तू असे करशील असे कधी मनातही आले नव्हते आमच्या.
विनय- माणसाला परिस्थिती खूप असहाय्य बनवते मनिष.
बाबांवरच्या खोट्या आरोपामुळे एका दिवसात आमचे आयुष्य आमुलाग्र बदलले.आयुष्यातील उमेदच हरवली.
ती हरवलेली उमेद नंतर कधी फिरकली नाही आमच्याकडे.
पण तरीही आईने कधी नाउमेद होऊ दिले नाही.
पुढे काय झाले? तू मयंकच्या घरी गेल्यावर पुढे काय झाले?
विनय–मी मयंकच्या घरी गेलो.तिथे एक बॕग पडून होती.त्यात पैसे भरुन होते.मी बॕग उचलली आणि बाहेर पडलो. माझ्या कमनशिबाने चौकीदाराचे माझ्या कडे लक्ष गेले.
पुढचे तुला माहित आहे राहूल.
हो रे.पुढचे माहित आहे.
मनिषः विनय तू नीट आठवना.तिथे बॕग उचलतांना तुला काही वावगे दिसले का,
नाही रे.मी खोलीत गेलो.तिथे एक बॕग पडून दिसली.ती उचलली आणि पळालो.
पण तू त्याची खोली कशी ओळखली? कारण घर मोठे आहे त्याचे. राहूलने विचारले
अरे मला जास्त काही माहित नव्हते. मी कसातरी त्याच्या इमारतीत प्रवेश केला.चौकीदार झोपून होता.
एक खिडकी उघडी दिसली तिथून खोलीत उडी मारली.खोलीत उडी मारली तेव्हा समोरच बॕग होती.ती पटकन उचलली.इकडेतिकडे न बघता त्याच खिडकीतून बाहेर पडलो.
बाहेर आलो तेव्हा समोरच चौकीदार उभा.पाच मिनिटात तो झोपेतून उठून समोर उभा होता. नशिबाने इथेही घात केला माझा.
तू त्या खोलीत जायच्याआधीच मयंकचा खून झाला होता.
राहूल एकदा पुन्हा मयंकची पत्नी शिखाला भेटतोस का?
मनिषने राहूलला सुचवले.
भेटलो यार एकदा.
काही मिळाले नाही तिथे.
एकदा शेवटचे भेटून कसून चौकशी कर.
तुझा शिखावर संशय येत आहे का?
तसे नाही.पण काही हाती येते का बघूया.
खुनी सापडेपर्यंत प्रयत्न तर करावे लागतीलच.
सोमवारी जाऊन बघतो.
मनिष आपल्याला एखादा चांगला वकील शोधावा लागेल.
मनिष—राहूल मी नौकरीचा राजीनामा द्यायचा विचार करतोय.
राहूल— काय?
अरे तुझे जज बनायचे स्वप्न?
आपण दुसरा शोधू या वकील.
मनिष—माझ्या स्वप्नाचा निर्माणकर्ता विनय आहे हे विसरुन कसे चालेल?पुरावे सगळे विनयच्या विरोधात आहेत.
मी मांडेन तशी विनयची बाजू कोणी मांडू शकेल असे वाटते का तुला?
विनय हे सर्व ऐकत होता.
तो म्हणाला, मनिष, माझ्या चुकीसाठी तू तुझे आयुष्यभर जपलेले स्वप्न कायमचे सोडावे हे मला कधीही पटणार नाही. मला खूप अपराधी वाटेल रे जन्मभर.
तुझा एखादा वकील मित्र शोध ना.
आणि मी खून केला नाही हे सत्यच आहे.
त्यासाठी तू नौकरी नको सोडू.तुझ्यासारख्या निष्णात वकिलाची गरज आहे सरकारला. तुला जज झालेला बघण्यात खूप आनंद वाटेल रे आम्हाला.
मनिष, तू काळजी नको करु.दोनएक दिवसात काही धागेदोरे लागतीलच आपल्या हाती.
आणि सगळ्या गोष्टी विनयच्या विरोधात असतील तर बघू मग पुढे . पण तू राजीनामा द्यायची घाई करु नकोस.
ठीक आहे. थांबतो काही दिवस.
दुसऱ्या दिवशी सगळे उशिराच उठले.
अर्पिताने सगळ्यांसाठी चहा बनवला.
काय मग किती वेळ रंगल्या मित्रांच्या गप्पा?
अर्पिताने विचारले.
अग पहाटे पहाटे झोपलो आम्ही.
राहूलने उत्तर दिले.
सगळे हाॕलमध्ये चहानाश्ता करत बसले.
विनय बोलला,
आज मी आणि रमा वापस जाण्याचा विचार करतोय.
राहूलः का? केसची तयारी करावी लागेल आता आपल्याला.
थांब काही दिवस.
रमाः भाऊजी आम्ही जाऊन येऊ परत पुन्हा.विनयला पण आईला भेटायचे आहे.
राहूलः आले माझ्या लक्षात सगळे.तुम्हाला संकोचल्यासारखे वाटत असेल इथे राहायला.रमावहिनी तुमचेच घर समजा ह्या घराला. आम्ही परके वाटतोय का तुम्हाला?
मनिषः इथे संकोचल्यासारखे वाटत असेल तर माझ्या घरी चला.
रमाः नाही भाऊजी.तसे नाही,तुम्ही तर खूप प्रेम दिले आम्हाला.पण किती दिवस राहणार अजून?.आमच्यामुळे अर्पिताताईंची पण कामे वाढलीत.
अर्पिताः रमा काहीही बोलू नकोस.उलट तुझ्या मुळे मला एक बहीण मिळाली. आधी आम्ही दोघीच होतो.मी आणि शिल्पा.आता तू तिसरी.हो कि नाही शिल्पा?
शिल्पाः हो.बरोबर बोलली अर्पिता.
विनयः पण आईला भेटायला तर मला जावेच लागेल नं.
राहूलः जा.पण दोन दिवसात वापस या.सोमवारी जा,आता मनिष,शिल्पा पण आहेत.तुम्हीही थांबा दोन दिवस.
विनयः बरं.
सोमवारी मनिषा-शिल्पा घरी गेले.विनय-रमाही गावी निघाले.
क्रमशः
….प्रिती….
Next Part
Previous Link
विनय,मनिष,राहूलची घट्ट मैत्री.पण अकल्पित घटनांमुळे विनयचे आयुष्य पार बदलून गेले. आता पुढे तरी त्याच्या आयुष्यात काही चांगले घडते का…….वाचा पुढील भा तुमचा प्रतिसाद आम्हाला मौल्यवान आहे.कथा कशी वाटते…comment मध्ये कळवत रहा
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा





छान लिहिले