२०-हरवून गेल्या जाणिवा
२०-हरवून गेल्या जाणिवा

२०-हरवून गेल्या जाणिवा

 

२०-हरवून गेल्या जाणिवा

सौ. दर्शना भुरे…

आबा आणि काका आल्याचे कळताच
त्यांच्या भेटीसाठी खोलीतून बाहेर पडत असताना वैकुला तिच्या चुलत सासूबाई ने अडवले .. त्यामुळे ती रडू लागली.. व आता च्या आता आपल्या घरी घेऊन चल म्हणतच हट्टाला पेटली..

पुढे..
पण सध्याच्या परिस्थितीत तिला आताच माहेरी नेणे किंवा त्याविषयी बोलणेही योग्य नाही हे तिची आई ओळखून होती.
म्हणून तिची मनधरणी करु लागली.

दादांची तेरावी आटपोपर्यंत वैकुला सासरी च ठेवणे भाग होते. तिचे लग्न लावून दिल्यापासून ते आतापर्यंत तिला
तिच्या चुलत सासूनेच सांभाळले होते.पण आता तिच्या सोबत तिच्या माहेरचे कोणीतरी असावे असे विमलला वाटत होते. कांता सोबत आलेलीच होती आणि तिचा वैकुवर जीवही होता. तेव्हा तिनेच वैकुसोबत रहावे असे विमलला वाटत होते.
व तसे तिने कांता जवळ बोलून दाखवले.मोठ्या जावेच्या म्हणण्यानुसार कांता वैकुसोबत राहण्यास तयार झाली.

कांता पहिल्यांदाच तिच्या जवळ सासरी राहणार होती.
व बाकी सर्व जण दादांचा तिसरा दिवस करून मग गावाकडे परतणार होते.

तिन्ही सांजेची वेळ होती.बाई देवाजवळ बसून होती.
आज दादांना जाऊन तीन दिवस झाले.
नवरा गेल्यापासून जवळ जवळ सुवर्णाने खाणे पिणे सोडले होते.
नवऱ्यासोबत घातलेला क्षण न क्षण तिला आठवत होता . ती सारखी तिचे पाझरणारे डोळे पदराच्या टोकाने पुसत होती. वसंता दुरवरुन बाईची प्रत्येक हालचाल पाहत होता.
बाई वरून वरून हिंमत दाखवत असली तरी आतून पुर्णपणे खचून गेली आहे हे त्याला माहित होते.

तो बाईला सतत हिंमत देत होता तिची
काळजी करत होता.

वसंताची आई कांंताप्रसादची दुसरी बायको सुवर्णाची ही वैकुवर खूप माया होती. सुवर्णाला तिला सर्व मुले बाईच म्हणत.. वसंताचा बाईवर खूप जीव होता. हरिप्रसाद,सतीश,प्रभाकर रमेश ही कांंताप्रसादच्या पहिल्या पत्नीची मुले तर दुसरी पत्नी सुवर्णापासून वसंता ,अनंताआणि मुलगी त्रिशला ही तीन मुले झाली. पैकी अनंता जन्मल्यापासून थोडा वेडसर होता. आणि त्या वेडाच्या भरातच तो घरातून निघून गेला तो घराकडे परत फिरकला नाही.
सवतीच्या आणि आपल्या पोटच्या मुलांमध्ये सुवर्णाने कधीही भेदभाव केला नव्हता. सर्वांना तीने समान वागवले होते..सुवर्णाच्या आणि कांताप्रसादच्या वयात दुप्पट अंतर होते..माहेरी गरीबीत वाढलेल्या सुवर्णाला कांताप्रसादसारखे पिढीजात श्रीमंत स्थळ स्वत:हून चालत आलेले..त्यामुळे तिच्या आईवडिलांनी कांताप्रसादच्या वयाचा विचार न करता कोवळ्या वयाच्या सुवर्णाचे त्यांच्याशी लग्न लावून दिले..
सुवर्णा लग्न होऊन सासरी आली.तेव्हा कांप्रसादचा मोठा मुलगा तिच्या पेक्षा वयाने मोठाच होता. त्याला त्याच्या वडिलांचे या वयातील लग्न मान्य नव्हते. त्याने तिला आई म्हणून कधीच स्विकारले नाही. तो त्याच्या सावत्र आईशी नीट बोलत किंवा वागत नव्हता..

घरची गरिबी पाहिलेल्या साध्या सरळ स्वभावाचा सुवर्णाच्या मोठ्या जावेने गैरफायदा घेऊन तिला सतत घरकामात राबवून घेतले.. तिच्या माहेरच्या गरीबीचा उपहास उडवला. तो तिने निमुटपणे सहन केला. नवऱ्याच्या सुखात आपले सुख मानत नेटाने संसार केला..सासरी मिळालेल्या श्रीमंतीचा अजिबात गर्व न करता स्वतः च्या साध्या सरळ स्वभावाने , प्रेमळ वागणुकीने सर्वांची मने जिंकून घेतली..
घरातील नोकरचाकर ही तिला खूप मान देत असत.. तिच्या लग्नानंतर पुढे काही दिवसांनी हरिप्रसाद चेही लग्न झाले. त्याची बायको सुवर्णाच्याच वयाची असल्याने त्या दोघीं सासु सुनेचे आपसात लवकरच सुत जमले..
पण हे हरिप्रसाद ला पटत नव्हते..

हरिप्रसादचे वसंताशी आणि त्याच्या आईशी फटकळ वागणे मधुकररावच्या नजरेतून सुटले नाही. त्याची बायको बायको मात्र स्वभावाने अगदी त्याच्या विरुद्ध.. प्रेमळ, समजुतदार होती. घरातील माणसांचे आपसात कितीही मनमुटाव असले तरी सर्व बायांची मात्र एकी होती.त्या आपसात समजसपणाने रहात.

क्रमशः

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!