शिक्षक साधारण नही हो सकता
” मी शिक्षक आहे मला साधारण
राहून चालणार नाही
राष्ट्र विकासाची मोठी जबाबदारी
माझ्या खांद्यावर आहे….
शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. विश्व विजय करणाऱ्या ध्येयाने पछाडलेला अलेक्झांडर भारतावर आक्रमण करतो. अनेक लहान राज्यांना धुळीला मिळवतो. आणि भारत काबीज करायला सुरुवात करतो.भारतातील काही लोक त्याला साथ देतात. आणि त्याचा मार्ग अजूनच सुकर होतो. हे सर्व तक्षशिला विद्यापीठातील एक शिक्षक हताशपणे बघत असतो. त्याला भारत देशाची ही दुर्दशा पाहवत नाही. तो पेटून उठतो आणि राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे भव्य स्वप्न पाहतो. त्यासाठी तो तत्कालीन सम्राटाला भेटण्यास जातो . मात्र सम्राट त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतो. एवढेच नव्हे तर, त्या शिक्षकाला भर दरबारातून हाकलून देतो. त्याचा अपमान करतो. तो शिक्षक खचत नाही. राजाला भर दरबारात तो सांगतो, शिक्षकाला साधारण समजू नकोस. शिक्षक हा राष्ट्र निर्माता आहे त्याने ठरविले. तर तो तुझ्यासारख्या राजाची मदत घेण्यापेक्षा ध्येयप्राप्तीसाठी तेजस्वी
सामर्थ्यवान राजाची निर्मिती करू शकतो. या तेजस्वी शिक्षकाचे नाव होते आचार्य चाणक्य !’
त्यांनी छोट्याशा खेड्यातून एक साधारण मुलाला निवडले, त्याला शिकविले, आणि परकीय सत्ता उलथून टाकून त्या मुलाला भारताचा सम्राट बनविले त्या सम्राटाचे नाव होते “सम्राट चंद्रगुप्त मौर्य”
शिक्षकांनी ठरवल्या तर ते काहीही करू शकतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे.
आज भारत हा सर्वात तरुण देश आहे जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या आपल्या देशात आहे या तरुणांना योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य शिक्षक हे सर्वात प्रभावी पणे करू शकतात म्हणून कबीर जी यांचा
दोहा
” गुरु,गोविंद दोऊ खडे
काके लागू पायी
गुरु,बलिहारी आपने
गोविंद दिखाओ…!”
म्हणूनच शिक्षकांना सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे. इतर देशांना उच्चशिक्षित तरुण हवे आहेत. म्हणून ते भारतात शिक्षण संस्था उभ्या करत आहे. त्या संस्थांमध्ये असेच विद्यार्थी घडवले जातील. जे परदेशात जाऊन काम करतील. इतर राष्ट्रांच्या विकासासाठी जीवन वाहून घेतील. त्यांचे मन हे पूर्णपणे विदेशी बनावटीच असणार आहे. त्यामुळे भारतीय शिक्षकांना अधिक जोमाने काम करावे लागेल. सुजान समजदार व राष्ट्रभक्त नागरिक निर्माण करण्याची जबाबदारी सध्या शिक्षकांवर आहे. आज साखरा सारख्या अनेक शाळांची नितांत गरज आहे. कारण अशा शाळा जर समृद्ध झाल्या तरच विद्यार्थी घडतील. परदेशात जाणारे लोंढे थांबतील. संस्कार असलेले विद्यार्थी जरी परदेशात गेले. तरी ते राष्ट्र विकासाच्या दृष्टीने सजग राहतील. विविध मार्गांनी देशाच्या विकासासाठी कार्यरत असतील. आपणाला राष्ट्रनिर्मितीसाठी फक्त पंधरा वर्षाचा वेळ आहे. कारण त्यानंतर आपल्या देशातील तरुणांची संख्या कमी होत जाईल जर आपला भारत देश पुन्हा वैभव निश्चितच प्राप्त करेल प्रत्येकाने स्वतःला दररोज आठवण करून द्यावी लागेल. जर मी शिक्षक आहे. तर मला साधारण राहून चालणार नाही.राष्ट्र विकासाची प्रचंड मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मला देशासाठी जर समाजासाठी काम करावेच लागेल.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचा सामर्थ शिक्षकांना करावेच लागेल. अन्यथा या देशाची युवा पिढी देशभक्ती पासून कोसो दूर राहील. नैतिक मूल्याच्या संस्कारातूनच जपले जातील. मोठ्यांचा सन्मान करणे, विनम्रता व लवचिकता विद्यार्थ्यांमध्ये असणे गरजेचे, मातृप्रेम, विद्यार्थ्याला ‘स्व ‘ची ओळख करून देण्याची आज गरज आहे. शिक्षकांचे काम खूप वाढलेले आहे. नाहीतर संस्कारहीन पिढ्या तयार व्हायला वेळ लागणार नाही.
घर ही बालकाची असलेली पहिली शाळा या शाळेची गुरुमाऊली ती म्हणजे ‘आई ‘
आई,वडील, शिक्षक या तिघांची ही मोठी जबाबदारी राष्ट्रनिर्मितीसाठी असून देशाचा सुजाण नागरिक निर्माण व्हावा. यासाठी कसून प्रयत्न करावे लागतील.
शाळा
” बीज रोविले संस्काराचे,
धडे देई उत्कर्षाचे,
नवयुगाचे होई शिल्पकार, अतुट नाते गुरुजनांचे…!”
गुरु विद्यार्थ्यांचे दिशादर्शक असतात.
पौराणिक काळापासून चालत आलेली गुरु आणि शिष्य परंपरा एकनिष्ठ राहून आश्रमात शिस्तप्रिय शिक्षण कृतीतून शिक्षण दिले जात असत .
अर्जुन, एकलव्य यासारखे गुरुनिष्ठ असलेले विद्यार्थी घडत असत.
गुरु सर्वात श्रेष्ठ साक्षात ईश्वराने गुरूंना दिलेल सन्मानाचं स्थान आहे.
“जहा कर्म से भाग्य बदलता,
श्रमनिष्ठा कल्याणी है,
त्याग और तप की गाथा
गाती कवी की वाणी है,.
सौ. सुरेखा गजानन मोगरे









