गुरुदत्त- फार थोड्या काळासाठी चित्रपटसृष्टीला लाभलेला परीस.परिसस्पर्शातून १९५७ साली निर्माण झालेली कलाकृती ‘प्यासा’
तहानलेला- विजय, मिना त्याची प्रेयसी दुसऱ्याशी विवाह होतो. आणि गुलाबो विजयवर,त्याच्या लिखाणावर भरभरुन प्रेम करणारी वेश्या.
सिनेमाचे लेखक अब्रार आल्वीच्या आयुष्यात घडलेली ही व्यथित करणारी कथा.
त्यांच्या आयुष्यात आलेली ‘गुलाबो’ आणि अब्रार यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. लेखकाची स्वअनुभूती असल्यामुळे चित्रपटाला जिवंतपणा येणे स्वाभाविक होते.
प्यासामधील जाने क्या तूने गीता दत्तच्या आवाजातील हे गाणे.गुलाबोला पेपरच्या रद्दीत विजयचे लिखाण सापडते. ती त्याच्या लिखाणाच्या प्रेमात पडलेली ती त्याला शोधते. तिने गायला सुरुवात केल्याबरोबर विजय तिला म्हणतो,सुनिए…मैने कहाँ
आणि पडद्यावर गाणे सुरु होते
जाने क्या तूने….
कुमार अवस्थेतून नुकताच यौवनात प्रवेश झालेला.आपल्यावरही कोणी प्रेम करावे असे वाटणारे वय. एकमेकांवर प्रीत उधळणारे दोन जीव मिळतात.
ह्दयाची तार वाजते. काळजातील धडधड वाढते.
दिवसरात्र बस् त्याचेच स्वप्न मनी रुंजी घालते.प्रेमाचा प्रवास सुरु होतो.
डोळे लाजेने खालच्या दिशेने वळत आहेत. चाल पण हळूवार झाली.
पावले तुझ्याजवळ थबकत आहेत.
तुझ्या प्रेमात आकंठ डुंबल्यावर माझा जणू दुसरा जन्म झाला. केसांची लट खांद्यावर रुळत आहे.त्याच्या सुगंधाने आता कितीतरी प्रेमाच्या गोष्टी बाहेर पडणार.
जाने क्या तूने कही
जाने क्या मैने सुनी
बात कुछ बन ही गयी
जाने क्या तूने कही …
सनसनाहट सी हुई
थरथराहट सी हुई
जाग उठे ख्वाब कई
बात कुछ बन ही गयी
जाने क्या तूने कही …
नैन झुक झुक के उठे
पाँव रुक रुक के उठे
आ गयी जान नई
बात कुछ बन ही गयी
जाने क्या तूने कही …
ज़ुल्फ़ शाने पे मुड़े
एक खुशबू सी उड़े
खुल गये राज़ कई
बात कुछ बन ही गयी
जाने क्या तूने कही …
पडद्यामागे गाणारी गीतादत्त आणि पडद्यावर गातांना दिसणारी वहीदा दोघीही जबरदस्त.
जाने क्या…काय अवखळ ,मधाळ आवाज दिलाय गीता दत्तने.
आणि गाण्याच्या शब्दानुरुप विभ्रम करणारी साधी पण सुंदर दिसणारी वहीदा…तिच्या चेहऱ्यावरचा एकेक भाव दिलखेच आहे. तिचे मोहक रुप, खुल गये राज कही….म्हणतांना तिचे भूवई उडवणे …सगळेच अप्रतिम.
साहिरच्या दमदार लेखणीतून उतरलेल्या गीताला सचिनदा बर्मन यांचे संगीत आहे.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










