Chandni-Parbat se kali ghata-परबतसे कालीघटा
Chandni-Parbat se kali ghata-परबतसे कालीघटा

Chandni-Parbat se kali ghata-परबतसे कालीघटा

Parbat se kali ghata-परबतसे कालीघटा-Chandni
पाऊस आणि प्रेम यांचे अतूट नाते आहे.तो आला कि फुले फुलतात,झाडे बहरतात,पाने हर्षवायू झाल्यासारखे टपोरे,मोत्यासारखे थेंब झेलत डोलतात.प्रेमात पडलेल्यांना भेटीची ओढ लागते.
आभाळात मेघांनी गर्दी करायला सुरु केली की प्रेमीजणांना एकमेकांना भेटण्याची ओढ लागते,जुनी भेट आठवायला लागते, पुढील भेटीचे स्वप्न पडायला लागते.
आभाळातील काळे ढग कालिदासाच्या मेघदूतासारखा निरोप एकमेकांना देवून भेटण्यासाठी सांगतो.
आपल्या हिंदी,मराठी सिनेमात पाऊस,प्रेम याला महत्व देत खूप गाणी आली आहेत.त्यातील बरीच गाणी त्यांच्यातील माधुर्यामुळे,प्रेमरसामुळे  पाऊस आला कि लगेच आठवतात.
असेच एक प्रेमरसाने ओतप्रोत असलेले गीत
तरल प्रेमकथा,स्त्रीला महत्व,सिनेमाचे,गाण्याचे अप्रतिम लोकेशन,दिग्दर्शन यात तरबेज असणारे यश चोप्रा,श्रीदेवीसारखी केवळ डोळ्यांतुनही अभिनय करणारी,नृत्यात जादूगारी दाखवणारी  लावण्यखणी
चांदणी….मेरी चांदणी-चांदणी(श्रीदेवी),प्रेमकथेला साजेसा नैसर्गिक  अभिनय करणारा हिरो ऋषी कपूर यांच्या सुपरहिट सिनेमातील ‘परबत से काली घटा टकराई’ पावसाचे गीत.
परबत से काली घटा टकराई
पानी ने कैसी ये आग लगाई?
परबत से काली घटा टकराई
पानी ने कैसी ये आग लगाई?
हाए, आग लगाई
दिल देने दिल लेने की रुत आई
परबत से काली घटा टकराई
पानी ने कैसी ये आग लगाई?
फिर, आग लगाई
हाए, आग लगाई
मारी शरम के मैं तो सिमट गई
चुनरी मेरी मुझसे लिपट गई
मारी शरम के मैं तो सिमट गई
चुनरी मेरी मुझसे लिपट गई
मस्ती में आ के मैं झूम लूँगा
रोक मुझे मैं तुम्हें चूम लूँगा
हो, मस्ती में आ के मैं झूम लूँगी
रोको मुझे मैं तुम्हें चूम लूँगी
आभाळात ढग जमा होतात.उंचच उंच पर्वतांना काळे ढग आच्छादित करतात आणि  प्रेमीजणांचा आवडता मेघमल्हार सुरू  होतो.
पावसाचा ऋतू सुरु होतो. प्रेमीजनांच्या प्रेमभावना  उत्कट बनल्या.हृदयात लपून असलेल्या भावना उचंबळून येतात,प्रेमाची तीव्रता वाढते.  प्रेम करण्याची वेळ आली,व्यक्त होण्याची वेळ आली अशीच प्रेमात आकंठ बुडणाऱ्याची भावना होते.
ती पावसात भिजून चिंब होते,तिची ओली झालेली ओढणी तिला चिपकते.ओले कपडे अंगाला चिपकलेले ,गालावरुन ओघळणारे पावसाचे थेंब आणि त्याची तिच्याकडे रोखून धरलेली नजर… ती लाजेने चूर होते.
तिच्या कमनीय देहाच्या हालचाली बघून त्याचे भान हरपते.
पावसात भिजलेली त्याची प्रेयसी, तिच्या मादक हालचालीअशा वेळी  तिचे चुंबन घ्यायची त्याची इच्छा  होते. तिच्याही मनात तेच सुरु आहे.दोघेही एकमेकांना   संयम ठेवून  थांबवावे असे सुचवत आहे.
आनंद बक्षींनी लिहिलेल्या या गीताला मोजके पण दर्जेदार स्वर देणाऱ्या शिव-हरी यांचे संगीत आहे.मादक,सुंदर,आकर्षक  नृत्याच्या स्टेप्स सरोज खान यांनी दिलेल्या आहेत.
गीताचे गायन आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायले आहे.
एका लग्नात रोहित चांदणीला बघतो,तिच्या प्रेमात पडतो.
तिलाही तो आवडतो. दोघांचे प्रेम फुलत असतांना रोहितचा अपघात होतो आणि दोघांचे प्रेमात रंगलेले आयुष्य बदलून जाते,विस्कळीत होते.दोघांनी बघितलेली स्वप्ने बेरंग होतात.
रोहित नैराश्याने ग्रस्त होतो.चांदणीच्या प्रेमाचे त्याला ओझे वाटायला लागते.त्याच्या घरच्यांना ती आवडत नाही.रोहितवर जीवापाड प्रेम असूनही चांदणी त्याला सोडून जाते.मुंबईला येते.
रोहित तिला विसरण्याचा प्रयत्न करतो.पण चांदणीला विसरणे त्यालाही शक्य नसते.
नेहमीसारखा पावसाळा सुरु होतो.पावसाची रिमझिम सुरु होते.
रोहित व्हिलचेअर वरा बसून असतो.चांदणीला विसरलो या भ्रमात असलेल्या रोहितला तिचे भास होतात.ती आठवते—खूप आठवते.त्याच्या नजरेसमोर पाऊस येतो.पावसात चांदणीचा हसण्याचा आवाज येतो.ती धावत पावसात येते.भिजते.गाणे आणि  थिरकणे सुरु होते.
शुभ्र कपड्यांमधली श्रीदेवी,पावसातले थेंब अंगावर झेलत थिरकते.
पावसात तो आणि चांदणी भिजत आहेत,गात आहेत…
पावसात भिजलेली ती मादकता आणि तिच्याकडे आकृष्ट होणारा ,तिच्या ओलेत्या रुपामुळे संयमाचा बांध कधीही तुटेल अशी अवस्था झालेला रोहित…गाणे संपते.स्वप्नातील रोहित भानावर येतो आणि चांदणी अशी साद घालतो….आपणही चांदणी,तिचे नृत्य बघतांना मंत्रमुग्ध होतो.
गाणे संपते आणि श्रीदेवी अभिनयाची,नृत्याची जादुगरनी होती याची पुन्हा पुन्हा खात्री पटते.
प्रिय वाचक,श्रावणधारांनी धरा चिंब झाली की आनंदोत्सव सुरु होतो.अशा रम्य पावासाळी वातावरणात तुम्हालाही काही पाऊसगाणी आठवत असतील….पाठवा तर मग पावासाळी गीताचे रसग्रहण
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!