लगी आज सावन की-Chandni-Hindi Rain Song
सौ. दर्शना भुरे..
यश चोप्रा…प्रेम विषयावर विशेषतः प्रेमत्रिकोणावर सिनेमे बनवण्यात माहिर होते. त्यांच्या सिलसिला, डर, दिल तो पागल है सारख्या अनेक अशा कितीतरी यशस्वी चित्रपटांपैकी..१९८९ सालामध्ये आलेला चांदनी …हा पण एक प्रेमत्रिकोणावर आधारित…
यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट…
चित्रपटातील.. ऋषी कपूर, विनोद खन्ना, श्रीदेवी सारख्या दिग्गज कलाकारांचा दमदार अभिनय तसेच त्यातील एकापेक्षा एक उत्कृष्ट आणि सदाबहार गाणी या सर्व गोष्टीं मुळे चांदनी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला..
व हा चित्रपट त्या सालातील सर्वात हिट सुपर डुपर रोमांटिक चित्रपट ठरला..
चित्रपटाचे कथानक असे की..
आत्याच्या मुलीच्या लग्नात सामिल झालेल्या चांदनी ची भेट (श्रीदेवी) त्याच लग्नासाठी आलेल्या तिच्या भावाचा मित्र रोहित शी (ऋषी कपूर) होते..
चांदनी च्या बहारदार नृत्याने आणि मादक सौंदर्याने रोहित पहिल्या नजरेत तिच्या कडे आकर्षित होतो व तिच्या प्रेमात पडतो..
तिही त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देते..
प्रेमात आणाभाका घेऊन ही दोघेही एकमेकांसोबत लग्न करून त्यांच्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागतात..
रोहित त्याच्या घरी चांदनी सोबत तो लग्न करणार असल्याचे जाहीर करतो..
दुसऱ्या समाजातील तसेच गरीब परिवारात जन्मलेली चांदनी रोहित च्या परिवारातील लोकांना सून म्हणून नको असते..
तेव्हा रोहित च्या बहिणी चा नवरा रमेश त्या दोघांना पाठिंबा देतो.. रमेश च्या आग्रहामुळेच हे लग्न पक्के होते..
रोहित आणि चांदनी ने एकमेकांसोबत पाहिलेले सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण होण्यापूर्वीच..
रोहित चा एका विमान दुर्घटनेत दुर्दैवी अपघात होतो.त्या अपघातात त्याची उजवीकडील बाजू पूर्णपणे निकामी होतो.. चांदनी रोहित ची खंबीरपणे साथ देते… त्याची काळजी घेते.. पण रोहित च्या घरातील मंडळी तिचा पदोपदी अपमान करतात तिचा सतत होणारा अपमान पाहून रोहित ला आपण लाचार असल्याची जाणीव होवू लागते
आपण तिच्या साठी काही करू शकत या विचाराने त्याचे मन त्याला खाऊ लागते..
यामुळे तो चांदनी ला आपल्या आयुष्यातून दूर निघून जाण्यासाठी सांगतो .. हताश, निराश चांदनी राहते गाव सोडून मुंबई ला जाते.. तिथे तिची भेट ललित खन्ना शी होते.. ललित खन्ना तिला आपल्या ऑफिसमध्ये काम देतो.. त्याच्या आईला चांदनी सून म्हणून पसंत पडते..
ती ललित ला तसे बोलून पण दाखवते..
वरील सर्व गोष्टींपासून अज्ञात असलेली
चांदनी…एके दिवशी
श्रावणात कोसळणाऱ्या पावसाच्या सरीचा मनसोक्त आनंद लुटत ललित ला म्हणते की तिला पाऊस आणि पावसात भिजायला खूप आवडले..
तिचे बोलणे ऐकून त्याला त्याच्या मृत पत्नी देविका ची प्रकर्षाने आठवण होते… तिलाही अशाच श्रावणात कोसळणाऱ्या घनदाट पाऊसाच्या सरींमघ्ये भिजायला खूप आवडत असे..
दोघींच्या विचारांमध्ये एवढे साम्य.. देविका च्या आठवणीत रममाण झालेला ललित ..
बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे नजर टाकतो …
आज बाहेर तोच श्रावणातील पाऊस सुरू झालेला असतो.. पण त्याची पत्नी देविका आज या क्षणी त्याच्या सोबत नसते..
पत्नी विरहाच्या आगेत होरपळलेल्या ललित च्या नजरे समोरून देविका सोबत घालवलेल्या सुंदर आठवणी व्याकूळ करू लागतात..
त्याला आठवतात ते श्रावण महिन्यातील काहीसे धुंद असे पावसाळ्यातील ते दिवस …त्या दिवसांत ती दोघे एकमेकांना भेटली होती तेव्हा त्यांना खूप खुषी झाली होती आणि खुषीची फुले बागेत नाही तर त्यांच्या हृदयात उमलली होती.. आज मोसम तोच आहे.पण तुझ्या सोबत घालवलेल्या सुंदर क्षणांचा आनंद देणारा तो हा ऋतू नाही आहे.
बाहेर कोसळणारा पाऊस जणू माझ्या सोबत माझ्या दु:खात रडून मला साथ देत आहे असेच त्याला वाटत असते..
खरे च कोणी या क्षणी माझ्या दु:खाने होरपळून निघणाऱ्या हृदयावर प्रेमाने फुंकर घालून माझ्या हृदयावर हात ठेवून माझे विखुरलेले हृदय जोडेल..
पण तुटलेले हृदय पुन्हा जुळवून येणे वगैरे ह्या सर्व गोष्टी कल्पनेत किंवा स्वप्नात च घडून येतात..वास्तवाशी यांचा काही संबंध नसतो..
लगी आज सावन की फिर वह झड़ी हैं
लगी आज सावन की फिर वह झड़ी हैं
वही आग सीने में फिर जल पड़ी हैं
लगी आज सावन की फिर वह झड़ी हैं
कुछ ऐसे ही दिन थे
वह जब हम मिले थे
चमन में नहीं
फूल दिल में खिले थे
वही तोह हैं मौसम
मगर रुत नहीं वह
मेरे साथ बरसात भी रोह पड़ी हैं
लगी आज सावन की फिर वह झड़ी हैं
लगी आज सावन की फिर वह झड़ी हैं
कोई काश दिल पे जरा हाथ रख दे
मेरे दिल के टुकड़ों को एक साथ रख दे
मगर यह हैं ख्वाबों ख्यालों की बातें
कभी टूट कर चीज़ कोई जुडी हैं
लगी आज सावन की फिर वो झड़ी हैं
लगी आज सावन की फिर वो झड़ी हैं
वही आग सीने में फिर जल पड़ी हैं
लगी आज सावन की फिर वो झड़ी हैं.
तसेच लगी आज सावनकी… शिवाय
चांदनी चित्रपटातील पुढील सर्व नावाजलेली ,कर्णमधुर अशी गाणी..
चांदनी ओ मेरी चांदनी….
.परवत से काली घटा टकराई..
आ मेरी जान…
मेहबूबा….
तेरे मेरे ओठो पे.. गीत मितवा..
तू मुझे सुना…
मेरे हाथो मे नौ नौ चुडियां….
मै ससुराल नही जाऊंगी…
चित्रपट-चांदनी
गाणे- लगी आज सावनकी फि वर वो झडी है _
संगीतकार,- शिव हरी
गीतकार-आनंद बक्षी
गायक- सुरेश वाडकर, अनुपमा देशपांडे
कलाकार-विनोद खन्ना, श्रीदेवी, जुही चावला
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
रसग्रहण सुरेख,मधुर
सुंदर रसग्रहण
Wahh mast
छान, पावसाची अशीही एक आठवण