मराठीअपराध कथा-मनाचा कप्पा
शुभदा आणि राजपालच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली होती.या दहा वर्षात राजपालने शुभदाला भरभरुन सुख दिले.सर्वार्थाने राजा,राणीचा संसार फुलला होता.
राजपाल आयुष्यात नसता आला तर…..
असा विचार करत असलेली शुभ़दा मोबाईलच्या रिंगने भानावर आली.
अपेक्षेप्रमाणे राजपालचा फोन होता
.तयार रहा लवकर येतो आॕफिसमधून.
अरे मीच आले असते आपल्या नेहमीच्या हाॕटेलमध्ये पण आज रिक्षाचालकांचा संप आहे.
कितीदा सांगतो ड्रायव्हर ठेवूया.तू ऐकत नाहीस शुभदा.
दोघेच आहोत.कशाला हवा ड्रायव्हर?
आता काहीएक ऐकणार नाही मी तुझे
राजपाल म्हणाला नि फोन ठेवून दिला.
संध्याकाळी दोघे बाहेर गेले.जेवता जेवता राजपालने उद्यापासून ड्रायव्हर ठेवला असे शुभदाला सांगितले.
शुभदाच्या तोंडातला घास तोंडातच राहला.
राजपाल मी सगळे ऐकते तुझे पण ही गोष्ट…नाही…नको मला ड्रायव्हर
अग पण का?
काही कारण नाही पण नको.
please राजपाल.
बरं तुझी इच्छा नाही तर राहू दे पण मला कारण तर सांग.शुभदा काहीही बोलली नाही.
दोघेही घरी आले.
आज खूप थकलो शुभदा.रस्त्यावरची traffic,घरापासून दूर असलेलं आॕफिस…जाण्यायेण्यातच वेळ आणि एनर्जी जाते.
शुभदा गपचूप ऐकत होती.काही बोलली तर विषय पुन्हा ड्रायव्हरवर येईल या शंकेने चुप राहणेच योग्य होते.
रात्र झाली होती.राजपाल लगेच झोपला. शुभदा जागीच होती.सकाळी शुभदा जरा उशीराच उठली.झोप झाली नव्हती.
किती लवकर दहा वर्ष संपली नं शुभदा आपल्या सहवासाची.
संपली काय म्हणतोस.छान जगलो कि आपण.
हो ग.तू अचानक प्रवासात मला भेटलीस काय…मी तुझ्या प्रेमात पडालो काय…सगळेच अगदी काल घडल्यासारखे.
तुला कधी माझ्या बद्दल तक्रार नाही करावीशी वाटत शुभदा?
सदा माझ्या होकारात तुझा होकार असतो.
एवढे सगळे भरभरुन देणारा नवरा असल्यावर तक्रार कसली करणार मी?
मीच तुला मुल देवू शकली नाही राज.
शुभदा जाऊ दे तो विषय.शनिवार,रविवार येत आहे.भटकून येऊ जवळपास कुठेतरी.
नको रे थकतोस तू मग.
अग थकतो म्हणून कुठे जायचे नाही का? एक ड्रायव्हर ठेवला तर खूप फिरु शकतो शुभदा आपण.
एवढा वेळ शांत असणारी शुभदा जोरात किंचाळली.
ड्रायव्हर,ड्रायव्हर ड्रायव्हर…रोज रोज तेच ते.ड्रायव्हर नको मला कितीदा सांगितले तुला.ऐकत का नाहीस?
शुभदाचे हे रुप राजपालसाठी नवीनच होते.
काहीतरी बिनसले नक्की.एरवी बोलकी,खेळकर असलेली शुभदा ड्रायव्हरचा विषय काढला कि अबोल,चिडकी बनते…असा विचार करत तो आॕफिसमध्ये निघून गेला.
थोड्या वेळात शुभदा शांत झाली.
मी राजवर ओरडायला नको होते….हे असे पहिल्यांदाच झाले.
राजपाल आॕफिसमधून लवकर घरी आला
.शुभदा तू बरी आहेस नं?
हो.sorry राज.मी सकाळी…
अग होतं असं कधी कधी.तू दिवसभर घरी एकटी असतेस.एकटेपणामुळे होतं असं
डाॕक्टरकडे जाऊ या शुभदा.
नको रे.मी बरी आहे.तू काळजी नको करु राज.
उद्याची मी सुट्टी घेतली शुभदा.जाऊन येऊ एकदा.
शुभदा काहीच बोलली नाही.
रात्री जेवण करुन घराजवळच असणाऱ्या बीचवर फिरायला गेले.
तुला आठवते शुभदा लग्न करुन तू आली तेव्हा समुद्राच्या पाण्यात पाय ठेवायला किती घाबरत होती.
अथांग पसरलेला समुद्र आधी खूप घाबरवायचा मला.नंतर तुझ्या आधाराने प्रेमाने,तुझ्या वरच्या विश्वासाने धीट झाले मी.तू सोबत असला कि कसलीच भीती नाही वाटत मला.तू असाच सोबत रहा माझ्या कायम.
हो ग राणी. चल जाऊया आपल्या घरट्यात वापस.
सकाळची appointment आहे.झोपू या लवकर.
शुभदाच्या डोळ्यातील झोप उडाली होती.
डोळे पार पंधरा वर्ष मागे गेले.मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलेले गुपीत चाचपडू लागले.डोळ्यापुढे सगळे चित्र जसेच्या तसे उभे राहले. त्या चित्राला दूरवर ढकलून ती राजपालच्या मिठीत शिरली. पण चित्र तिचा पाठलाग सोडत नव्हते.
धाsssडकन मनाच्या कप्प्याचे दार उघडले.
मधुरा गरीब आईवडील ,बहीण मंजिरी सोबत राहत होती.हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर तिचा बी.ए.एम.एस.ला नंबर लागला. होस्टेलची भरायला आईवडिलांजवळ पैसे नव्हते.मावशीच्या घरी राहू लागली. मावशी दुसऱ्या शहरात राहायची.अधूनमधून घरी यायची.
श्रीमंत मावशी आल्यावर फिरण्यासाठी अनंतला ड्रायव्हर ठेवले होते.तो बाजुलाच राहायचा.विवाहित असलेल्या त्याची नि मधुराची ओळख झाली.दोघे प्रेमात पडले.सद्सद्बुद्धी हरवलेले दोघेही एकदिवस मावशीच्या घरुन मौल्यवान सामान घेऊन पळून गेले.
दहा एक दिवसात पोलिस त्यांचा मागोवा घेत त्यांच्यापर्यत पोहचले.दोघांनाही जेलमध्ये टाकले.मधुराच्या वागण्यामुळे धक्का बसलेले आईवडील जमानत घ्यायला तयार नव्हते.जवळपास एक वर्षाने एका समाजसेवी संस्थेने जमानतीवर तिला सोडवले.नंतर केस…मधुराला झालेली शिक्षा…जेलमध्ये झालेले अबाॕर्शन…शिक्षा संपल्यावर सुटका…तिच्यामुळे अपमानीत झालेले आईवडील…घरापासून दूर निघून येणे… टूरवर आलेल्या राजपालसोबत भेट… नाव बदलवून,राजपालसोबत खोटे बोलून आयुष्याची नवीन सुरुवात पण त्याच्या पासून भूतकाळ लपवल्याची सतत टोचणारी बोच.राजपालमुळे सुखात कसर नव्हती पण अपराधीपणाची बोच सुख बोथट करत होती.राजपासून सगळे लपववण्यात यश तर मिळाले होते पण सुख…
आणि अनंत…कुठे असेल तो?
शुभदा ऊठ ग.डाॕक्टरची appointment आहे.राजपालने आवाज दिला.
धाडकन उघडणारा मनाचा कप्पा शुभदाने हळूच कुलुपबंद केला.
(मनाचा कप्पा-प्रत्येकाजवळ असणारा,प्रत्येकापासुन सांभाळून ठेवलेला,न आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्यात असतात. त्या मनाच्या कप्प्यातून काढता येत नाही.
शुभदाची कथा सत्यघटनेवर आधारीत आहे.सत्यघटनेचे कथेत रुपांतर केल्यामुळे शेवट सुखद करता आला.पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. शुभदा आजही शिक्षा भोगत आहे)
शब्दपर्ण साईटवरील अपराध कथा वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
प्रिती







सुंदर कथानक..
छानच
रोंगटे उभे झाले ग वाचता वाचता…
खूपच वेगळी …मनाला चटका लावणारी कथा
कितीतरी गुपित, रहस्य दडले असतात मनाच्या कप्प्यात, तो रिता करण्यासाठी एकतरी सखा मैत्रीण असावी
उताम लेखन .
Wahh chanch
Chhanchg
खुप छान कथा
अतीत से आज तक कोई नही भाग पाया…
एवढ्याशा मनात किती तरी गोष्टी दडून असतात
सुंदर कथा