Bollywood sitare
Wahida Rahaman-वहिदा रहमान- चौदहवीं का चाँद

चौदहवीं का चाँद हो, या आफ़ताब हो
जो भी हो तुम खुदा कि क़सम, लाजवाब हो
ज़ुल्फ़ें हैं जैसे काँधे पे बादल झुके हुए
आँखें हैं जैसे मय के पयाले भरे हुए
मस्ती है जिसमे प्यार की तुम, वो शराब हो
चौदहवीं का …
चेहरा है जैसे झील मे खिलता हुआ कंवल
या ज़िंदगी के साज पे छेड़ी हुई गज़ल
जाने बहार तुम किसी शायर का ख़्वाब हो
चौदहवीं का …
होंठों पे खेलती हैं तबस्सुम की बिजलियाँ
सजदे तुम्हारी राह में करती हैं कैकशाँ
दुनिया-ए-हुस्न-ओ-इश्क़ का तुम ही शबाब हो
चौदहवीं का …
साहिर लुधियानवीने केलेले हे वर्णन,जिच्या सौंदर्यावर हे गीत रचले आहे ती-वहिदा रहमान म्हणजे आगळं सौदंर्य आणि अप्रतिम नृत्य आणि अत्युच्च अभिनयक्षमता यांचा संगम.वहिदा रहमान यांचा जन्म ४ फेब्रुवारीला १९३८ मध्ये झाला.
अवघ्या सोळाव्या वर्षी राजूला मरायी चित्रपटाद्वारे तामीळ चित्रपट सृष्टीत प्रवेश केलेली ही अभिनेत्री नंतर कित्येक वर्ष दर्शकांना वेगवेगळ्या विषयावरील चित्रपट देत राहली.
एका पार्टीत गुरुदत्तने तिला बघितले. त्याच्या पारखी नजरेने तिच्यातील गुण हेरले आणि C.I.D. सिनेमापासून तिची हिंदी कारकिर्द सुरु झाली.
वहिदाचे लुब्ध करणारे सौदंर्य ,नृत्यकौशल्य,पडद्यावरील व्यक्तीरेखांना जिवंत करण्याचे कसब यांनी त्याकाळी आणि नंतर कैक वर्ष प्रेक्षकांवर गारुड केले होते.
१९५७ साली आला प्यासा

गुलाबो (वहिदा)विजयवर(गुरुदत्त),त्याच् या लिखाणावर भरभरुन प्रेम करणारी वेश्या.
गुलाबोला पेपरच्या रद्दीत विजयचे लिखाण सापडते. त्याचे लिखाण तिला भुरळ घालते.ती त्याने लिहिलेल्या तरल काव्याच्या प्रेमात पडते.
दुःखी विजय एकटाच अंधारात बसून असतो.निरव शांततेचा भंग करीत त्याच्यापर्यंत त्याच्याच ओळी पोहचतात
फिर ना किजिए मेरे गुस्ताख नजरोका गिला
देखिए आपने फिर प्यारसे देखा मुझको
विजयचे काव्य तिच्याजवळ कसे….तो अचंबित होतो.आणि म्हणतो
,सुनिए…
ज्याच्या काव्यावर ती लुब्ध झाली तो कवी हाच आहे हे तिला माहित नाही.गुलाबो मान वळवून त्याच्याकडे बघते
जी मैने कहाँ
आणि पडद्यावर सुरु होतो शब्द आणि भावना,अभिनयाचा अविष्कार.
शब्द पेरीत शब्दमाळ बनवणाऱ्या जादूगर साहीरचे शब्द कानावाटे थेट ह्दयात उतरतात.
जाने क्या मैने कहाँ…..
गाण्याच्या शब्दानुरुप विभ्रम करणारी साधी पण लावण्यवती दिसणारी वहीदा…तिच्या चेहऱ्यावरचा एकेक भाव दिलखेच आहे.
तिचे मोहक रुप, खुल गये राज कही….म्हणतांना तिचे भूवई उडवणे,तिची मान हलवण्याची अदा …सगळेच आकर्षित करणारे. सिनेमात कमी रोल असणारी पण विजयला शेवटपर्यंत साथ देणारी गुलाबो प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते.
कागजके फुल

गुरुदत्त दिग्दर्शित असलेला सिनेमा.
सुरेश सिन्हाचे पत्नीसोबतचे ताणलेले संबंधआणि शांतीचे त्याच्या जीवनात येणे,हिट,फ्लाँप दोनच शब्दांवर चालणारी सिनेसृष्टी….यावर आधारित हा सिनेमा आहे.नावातच सिनेमाचा अर्थ दडला आहे.
सिनेमाच्या सुरुवातीला तिची आणि सुरेश सिन्हाची भेट,सुरेश सिन्हाने तिला दिलेला कोट परत करायला तिचे येणे,तिचे चुकून कॕमेऱ्यात येणे, तिचे साधे,शांत सौंदर्यामुळे सुरेश सिन्हाने तिची देवदाससाठी पारोची निवड करणे,नंतर शांतीची screen test …सगळेच तिचे काम लाजवाब.
पारोसाठी तिची निवड झाली हे तिला माहित नसते.
सुरेश—-बिल्कुल वही हो तुम,बरसोसे मेरी आँखे इसी रुपकी तलाशा में थी, वही सादगी,वही भोलापन….सुरेश सिनूहाच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकून
शांती- मेरा नामा शांती है,पारो कोई और होगी…..किती निरागासतेने सांगते शांती
इथेच शांतीचा अजून डायलाॕग आहे
अजिबसी बात है,जिंदगीमें पहली बार मुझे खुदसे ज्यादा किसी दुसरेपें भरोसा है…
अनाथालयात वाढलेल्या शांतीच्या आयुष्यात सुरेश सिन्हाशिवाय कोणी नसते.
अवखळ,शांत शांतीपासून ते यशस्वी अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास,सुरेश सिन्हाच्या मुलीसाठी सुरेश सिन्हावर अमाप प्रेम असूनही त्याला सोडून जणारी,पण त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी न झालेली शांती वहिदाने ताकदीने रंगावली आहै.सुरेश सिन्हा पासून दूर गेल्यानंतर मिळालेले यशही अर्थहीन होत जाते. या सिनेमातील
वक्तने किया क्या हसीं सितम….
गाणे सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेले.
गाण्यातील वहिदाचे भाव काळीज हेलावून टाकते.
या सिनेमातील वहिदाचे काही डायलाॕग्ज
जब मतलबसे प्यार होता है ….तो प्यारसे मतलब नही रहता…
इस दुनियामें चाहे वो ईन्सान हो या मकान हो….एक दिन मिट ही जाता है…नही मिटता है तो वो है प्यार…
साहिब,बीवी और गुलाम

संपूर्ण सिनेमा छोटी बहू आणि भूतनाथवर आधारित आहे.
वहिदाचा रोल छोट्या बहूच्या तुलनेत छोटा.पण तरीही साहिब,बीवी और गुलामचे नाव घेतले कि मीनाकुमारी,गुरुदत्त बरोबर वहिदा रहेमान आठवतेच.
सिनेमातील छोटी बहू जमीनदारी,बुरसटलेल्या विचारांची भळी दाखावली तर जबा(वहीदा) आधूनिक,वडिलांचा व्यवसाय सांभाळणारीआणि धीट दाखवली.
जबाला भूतनाथचा साधेपणा आवडतो,तोही आवडायला लागतो,पुढे सिनेमा ,जबाचे आयुष्य वेगळे वळण घेत जाते.
जबाने अवखळपणे गायलेले गाणे
भँवरा बडा नादान है….लक्षात राहते.
१९६५ मध्ये देवआनंदचे स्वप्न गाईड आली.

रोझी देवदासीची मुलगी.तिची आई तिचे लग्न आर्कलाॕजिस्ट मार्को सोबत लावून देते.
मार्को रोझीने यापुढे नृत्य करु नये या अटीवर तिच्याशी विवाह करतो.पुढे तिच्या आयुष्यात राजू गाईड येतो.
तिच्या पंखात बळ भरुन तिला उडायला शिकवतो.
काँटों से खींच के ये आँचल
तोड़ के बंधन बाँधे पायल
कोई ना रोको दिल की उड़ान को
दिल वो चला हा हा हा हा हा हा
आज फिर जीने की तमन्ना है….
तिच्यात जगण्याची आसक्ती निर्माण झाल्यानंतरचेआत्मवाश्वास निर्माण झाल्यानंतरचे हे पहिले गाणे,नृत्य.
गाईड मध्ये वहिदा रहेमानचे
दोन नितांतसुंदर नृत्य आहेत.
पिया तोसे नैना लागे रे
सैया बेईमान…..
राजूच्या मदतीने रोझी प्रसिद्ध नर्तकी बनते.पण नंतर तिला मिळणाऱ्या पैशांमुळे राजुला काही वाईट सवयी लागणे,त्याचे जेमध्ये जाणे…रोझीचे आयुष्य विस्कळीत होत जाते…
गाईडच्या रोझीसाठी वहिदाला अभिनयासाठी फिल्मफेअर मिळाले.
१९६९ मध्ये आला खामोशी

चाकोरीबद्ध हिंदी सिनेमापेक्षा आगळा असलेला हा सिनेमा प्रेमाची तीव्रता आणि अभिनयाची उंची दाखवणारा आहे.
संपूर्ण सिनेमा लीलया पेलणारी,शांत राहून प्रेम करणारी,प्रेमीचे लग्न झाल्यावर तेवढ्याच शांतपणे त्याचा स्वीकार करणारी पण आतल्या आत तुटत जाणारी वहिदा. दुसऱ्या पेशंटशी जवळीक वाढतांना पहिल्या प्रेमाची तिव्रता जाणणारी वहिदा, जो तिच्यावर प्रेम करत आहे त्याच्यावर प्रेम न करु शकणारी,ज्याने तिला अव्हेरले त्याच्यावर वेड्यागत प्रेम करुन वेडी होणारी वहिदा….प्रत्येक वेळी अभिनयाच्या कसोटीत खरी उतरली.
देववर प्रेम करणारी राधा प्रेम व्यक्त करण्यासाठी देवला भेटायला जाते.वाटेत देवचे आईवडील देवचे लग्न ठारल्याचे सांगतात.
शादी?
एवढाच शब्द ती उच्चारते.तिच्या त्या एका शब्दातून तिच्या काळजाचा झालेला थरकाप आपल्यापर्यंत पोहचतो.
तिचे ह्दय,तिचे मन, तिचा आत्मा देवचे तिच्यावर प्रेम नाही हे स्विकारु शकत नाही. देववर असलेले प्रेम तिच्यापुरतेच सीमित राहते.
‘मै ॲक्टींग नही कर रही थी’
हे डाॕ. ला उद्देशून म्हंटलेले तिचे शब्द कानावर आदळत राहतात.
तिसरी कसम
Innocent lovestory

साधा,लहान मुलासारखा साधे,सरळ,स्वच्छ,पारदर्शी मन असलेला हिरामन आणि जत्रेमध्ये नाचणारी हिराबाई यांच्यातील अर्ध्यावर राहलेली ही प्रेमकथा.
हिरामन,हिराबाई,बैलगाडी…यया तीन गोष्टी केंद्रस्थानी ठेवून अप्रतिम संगीत,गीतांनी सजलेला,राजकपूर-वहिदा रहेमानच्या अभिनयक्षमतेसाठी अवश्य बघावा असा सिनेमा.
याशिवाय बात एक रातकी,काला बाजार, कोहरा,मुझे जीने दो,बाजी, लम्हें,राम और शाम,चांदणी,कभी कभी,त्रिशुल…..अशा अनेक सिनेमात अभिनय केला.
१९६८ मध्ये आलेल्या नील कमल या चित्रपटातील अभिनयासाठी वहिदा रहमानला उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
१९७१ साली आलेल्या रेशमा और शेरा या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
१९७२ साली वहीदा रहमान यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले..
१९९४ मध्ये फिल्मफेअर लाईफा टाईम आचिव्हमेंट अवार्ड मिळाले
२००६ मध्ये नॕशनल अवार्ड,
२०११मध्ये पद्मभुषण मिळाले.
१९५० ते १९७० पर्यंत चित्रपटसृष्टीत राज्य करणाऱ्या वहिदा रहमानचा फागुन” हा चित्रपट नायिका म्हणून शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर वहिदाने चरित्र अभिनेत्री म्हणून कामं स्वीकारायला सुरुवात केली.
बाॕलीवूडच्या सोनेरी युगाच्या वाटेकरी वहिदा रहमान यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा….
जो भी हो तुम खुदा कि क़सम, लाजवाब हो
आवडल्यास नक्की Like,Share करा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन
शब्दपर्णवरील सिनेमांचे रसग्रहण वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
{ फोटो सौजन्य गुगल}
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.











लाजवाब.