काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य
भाग-२
शलाका केस जिंकली.तिला नवी उमेद मिळाली.आनंदी ,चैतन्यमय वातावरण तयार झाले.आता पुढे….
भाग-२
शेवटी नक्षत्राला न्याय मिळाला यार.
मोहित बोलला.
न्याय म्हणजे काय?.
अपराध्याला शिक्षा.
अपराध्याला शिक्षा मिळाली पण ज्यांच्यावर अन्याय होतो तो खरेच भरुन निघतो का? त्या वेदना,ती वेळ सगळे तसेच.
आनंदचे हे बोलणे शलाका ऐकत होती.
ती संभाषणात भाग घेत बोलली
आनंद, मान्य कि अपराध्याला शिक्षा झाली तरी ज्याच्यावर अन्याय झाला( त्यातही मुलींवर होणार लज्जास्पद अत्याचार) दूर होत नाही.पण बाकी लोकांना एक धडा तर मिळू शकतो.जखम राहते पण जखमा करणाऱ्याला शिक्षा मिळाली तर ती भळभळा न वाहता तिच्यावर खपली धरु शकते.अन्याय करणाऱ्याला शिक्षा मिळाली तर आत्मबळ वाढायला नक्कीच मदत मिळते.
हो ग.पण अन्याय झालेल्या व्यक्तीच्या संवेदनेचा प्रश्न तसाच राहतो.अनुत्तर. त्यातही तुझ्यासारखी वकील मिळाली तर बरे.
नाहीतर अन्यायाला वाचा न फुटता ते तसेच राहतात मुकबधीर बनून.
आता नक्षत्राचेच बघ ना.तू तिची केस घेतली नसती तर अन्याय झेलणारी नक्षत्रा मुकी होऊन राहली असती.आणि अन्याय करणारा विलास मनसोक्त भटकत राहला असता.
अशा कित्येक नक्षत्रा पायदळी तुडवल्या गेल्या आहेत.
त्यांच्या भावनेचे निर्माल्य झालेले कुणाला कळतही नाही.
त्यांच्या वेदना गोठून जातात थंड बर्फासारख्या.
अरे यार आनंद सोड ना केस.
खूप दिवसांनी relax व्हायला जमलो आपण.
आणि इथे पण तू तेच टेंशन आणतो आहेस.
शलाका हा घरी पण असाच नेहमी तत्ववेत्त्याच्या भूमिकेत असतो का?
हो.मग काय? असे म्हणत शलाका हसू लागली.
तूच सांग घरी कसे आहेत सगळे?
मोहितने विचारले.
मजेत आहेत सगळे. आईबाबांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरु असतात.पण वयानुसार चालायचेच ते.
मुक्ता कशी आहे ग?
मुक्ता तीन वर्षाची झाली.
उद्या एका शाळेत तिच्या admission साठी जायचे आहे.
आनंदने पण सुट्टी घेतली उद्या.
बापरे! शाळेत जाण्याएवढी मोठी झाली मुक्ता.
हो रे मोहित.दिवस भराभर पळताहेत नुसते.
शलाका तू आराम कर आता काही दिवस.काही जबाबदाऱ्या या आनंदवरही टाक.
हो रे.आता काही दिवस मी केस घेणार नाही.
नक्षत्राच्या केसने थकवले मला.
हो यार.मस्त जवळपास फिरुन या तुम्ही.
शलाकाची मैत्रीण वैभवी म्हणाली.
चला,सगळेच जाऊ या ना सोबत.
मी बनवते plan.मानसी बोलली.
आनंद,मोहित , सिद्धार्थ,मानसी,वैभवी एकाच काॕलेजमध्ये सोबतच शिकले होते.ते आनंदचे मित्र म्हणून शलाकाचीही त्यांच्यासोबत मैत्री झाली.
मानसी Law करायला शलाकासोबत होती.
रात्री आनंद शलाका बरेच उशीरा परतले.
मुक्ता झोपली होती.
शलाका, मुक्ताला एवढ्या लवकर शाळेत टाकावे असे खरेच वाटते का तुला? आनंदने विचारले.
अरे आता सगळीकडे तसेच टाकतात.
आता टाकले तर सहा वर्षाची असतांना ती पहिलीत जाईल.
मला काळजी वाटते खूप.
कसली? आपल्या दोघांपैकी कोणीतरी सोडून देईल.बाबा घ्यायला जातील.
आनंद नशिबाने आईबाबांमुळे मुक्ताची काळजी नाही आपल्याला.खूप सांभाळतात ते मुक्ताला.
आणि तिच्या वयात सगळ्याच मुली शाळेत जातात.ती एकटी नसणार त्यामुळे काळजीचे कारणच नाही.
आनंद तू एवढी काळजी करशील तर आजच्या जगात जगायला ती समर्थ कशी होईल?
हो ग. पण वाटते ना काळजी.बापाची काळजी नाही कळायची तुला.
तू माझे ऐकत नाही आहे म्हणून.नाहीतर मी तिला अजून पाच वर्ष तरी शाळेत टाकले नसते.
कमाल आहे रे बा तुझी.
ती बिचारी पोर घरी कंटाळून जाते.तिला तिच्या वयाचे कोणीतरी खेळायला नको का?
बरं माते जशी तुमची मर्जी.
आनंद आता मुक्ताला एखादे बहिण भाऊ आणावे असे नाही वाटत का तुला?
नाही.मुक्ताच्या वेळीच ठरवले होते आपण एकच पुरे म्हणून.
हो रे पण एखादे मुल हवे अजून.आपल्याला तर आईबाबांचा पण आधार आहे.
शलाका मुक्ताला एकटीलाच छान वाढवू आपण.समर्थ बनवू.तुला तुझ्या आईवडिलांनी वाढवले तसे वाढवू मुक्ताला.
सकाळी मुक्ताची शाळेत Admission झाली. मुक्ताची शाळा जवळच होती.
मुक्ताची शाळा सुरु झाली.
शलाका सोडायला जायची आणि आई-बाबा घ्यायला जायचे.
आनंद काॕलेजमध्ये व्यस्त राहायचा.
ज्या काॕलेजमध्ये शलाका आणि आनंद शिकले तिथेच तो प्राध्यापक होता. अभ्यासात हूशार असलेल्या आनंदने साहित्याची आवड असल्याने इंग्रजी आणि मराठी साहित्यात एम.ए. केले.
दोन्ही विषयांवर त्याची हुकूमत होती.
त्याचा पिरेयड असला कि नेहमी गैरहजर असणारी मुलेही काॕलेजमध्ये हजर असायची.
क्रमशः
कथाकल्पना-विशाल भोवते
पहिल्या भागाची लिंक
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.







छान कथा मालिका