अक्षम्य  भाग-१०
अक्षम्य  भाग-१०

अक्षम्य  भाग-१०

काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य 
भाग-१०
पण श्रीकांत तयार नसेल तर वेळ लागेल अस्मिता.
बघ ना शलाका तो आरामात एका बाईसोबत राहतोय.वेळ लागला तरी काही फरक नाही पडणार त्याला.मी एवढे दिवस एकटीच होते.आणि  आता घटस्फोट घेतांना वेळ लागेल तेव्हाही मीच एकटी. सगळेच विचित्र आहे ना.
अस्मिता विषन्नपणे बोलली.
शलाकाने विचारले.
काही मधला मार्ग नाही निघू शकणार का अस्मिता?
नाही.मधला मार्ग कसा निघेल?
जीवापाड ज्याच्यावर प्रेम केले त्यानेच फसवणूक करणे खूप  दुःखदायक आहे.फसवणूकीपेक्षाही अपमानजनक आहे सगळे माझ्यासाठी. मी एकटेपणा सोसत होती तेव्हा हा दुसरीकडे मजा करत होता.
दुसऱ्या स्त्रीत गुंतण्याआधी तो माझ्याशी बोलला असता तर कदाचित्  मधला मार्ग निघू शकला असता.
शलाकाने विचारले भावनेशी जुळणाऱ्या  नात्यात तेवढा वेळ कुठे मिळत असणार?
अस्मिता तावाने म्हणाली.म्हणून जोडीदाराला फसवायचे?
तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि बंधनाने तुमच्या सोबत जुळलेल्या जोडीदाराने काय करायला हवे अशा वेळेस?
तो दुसरीकडे गुंतला म्हणजे माझी त्याच्या आयुष्यात असणारी गरज संपली.
आता सोबत राहणे म्हणजे अन्याय करणे आहे एकमेकांवर.
तसे असते तर श्रीकांत पवार घटस्फोट द्यायला लगेच तयार झाले असते.
शलाका त्यांच्या मनाने कधीच घटस्फोट दिलाय मला.
आता हे जे नाटक आहे ते समाजात अब्रु कमी होऊ नये म्हणून आहे. 
Ok.केस फाईल करण्याआधी एकदा भेटू अस्मिता.
असे म्हणून शलाकाने फोन ठेवला.
बाजूला बसलेल्या आनंदच्या लक्षात एकंदरीत काय बोलणे झाले असेल लक्षात आले.
काय म्हणते अस्मिता?
त्याने शलाकाला विचारले.
वेगळे राहण्यावर ठाम आहे अस्मिता.
फसवणूक झाल्यामुळे अपमानित झाल्यासारखे वाटत असणारच.
फसवणूकीचे पण किती प्रकार असतात ना शलाका?
शलाका आनंदच्या या वाक्यावर थबकली.
हो ना आनंद.पण काही फसवणूकीला पर्यायच नसतो.
आणि फसवले असे समोरच्याला सांगण्यातही अर्थ नसतो.
आनंद कधी कळत,नकळतपणे तू कुणाला फसवले का?
सांगू नाही शकत. नकळतपणे कदाचित् फसवलेही असेल.
तू?
शलाका काहीही न बोलता उठून गेली.
शलाकाने अस्मिताची केस फाईल केली.
श्रीकांत पवार सुरूवातीच्या दोन तारखांना बिझी असल्याचे कारण सांगून आलेच नाहीत.
तिसऱ्या तारखेला आले. शलाकाने  mutual होऊ शकते का हे चाचपडून बघितले. पण  श्रीकांत पवारला घटस्फोट नकोच होता.त्यांनी शलाकाला सांगितले तसे.
अस्मिताबरोबर राहायचे असे म्हणत होते.
शलाकालाही घर तुटण्यापेक्षा जुळले तर बरे असे वाटत होते.
तिने अस्मितासोबत एकदा श्रीकांत पवारांना भेटायचे ठरवले.
अस्मिता कशीबशी तयार झाली.
श्रीकांत पवारांना घरीच भेटायचे ठरवले.खूप दिवसांनी ते घरी आले होते.शलाका त्यांच्या घरी गेली.
श्रीकांत पवार त्यांच्या घरी आले पण घर आणि ते दोघेही एकमेकांना अनोळखी वाटत होते. त्यांना आवडणाऱ्या बागेत जाऊन ते बसले.
शलाकाने त्यांना आवाज दिला.
संभाषणाची सुरुवातही तिनेच केली.
अस्मिताला सध्या तिने तिच्या खोलीतच राहायला  सांगितले .
पवारसाहेब काय ठरवले मग तुम्ही?
इथे राहण्याचे.
पण अस्मिता तयार नाही.
please तुम्ही समजून घाला तिची.
कशी घालणार? चुकीच्या गोष्टीचे समर्थन मी कसे करणार?
चुका होतात कधी कधी नकळतपणे.
त्याचे परिणाम काय होणार हे माहित नसले कि त्यातून बाहेर पडणेही कठीण  होऊन बसते.
अस्मिताने पिहूचा तरी विचार करायला हवा.
तुम्ही नाही केला.
पण मी चूक दुरुस्त करायला तयार आहे.
म्हणजे नेमके काय करणार तुम्ही?अस्मिताने बाहेर येत विचारले. 
राहायला येतो इथेच.
बरं.मग पुढे ?
पुढे  म्हणजे?सोबत राहू या.
आधीचे सगळे विसरण्याचा प्रयत्न करेन मी.
प्रयत्न? त्याला यश नाही आले तर.
तू साथ देशील तर यश येईल.
मी? मी का साथ देऊ? 
अस्मिता please.
एकदा क्षमा कर मला.
नाही.मला नाही जमणार ते.मनं दुरावल्यावर सोबत राहू नाही शकणार मी.
तुम्ही तिला विसरले तरी मी नाही विसरु शकणार.कायम माझ्या मनात ती दडी मारुन बसणार.
शलाकाने घरी येऊन आनंदला सांगितले.
आनंद – फार जिद्दी आहेत ग अस्मिता मॕडम.श्रीकांत पवार चूक मान्य करत आहेत.
नाही रे.अस्मिताने घटस्फोटाचे नाव घेतले म्हणून घाबरले ते.तिच्यावरच्या प्रेमापायी वापस आले असते तर त्यांनी माफ केले असते कदाचित्.
प्रेमात तडजोड नसावी आनंद. नाहीतर प्रेमातील निखळता कमी होते.
शलाका एक संधी तर त्यांना मिळायला हवी.
काही चुका संधी गमावतात आनंद.
पवार दुसऱ्या बाईत गुंतले तेव्हाच अस्मितासोबत राहण्याची संधी संपली.
आता उगाच समाजाला दाखवण्यासाठी सोबत राहण्यात काय अर्थ आहे?
म्हणजे तुला अस्मिताने घटस्फोट घ्यावा असे वाटते?
मला नाही वाटत.अस्मिताला वाटत आहे. नवऱ्याला क्षमा करावी कि नाही हा सर्वस्वी तिचा प्रश्न  आहे.
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे कि सोबत राहून ती सुखी राहू शकत नसेल तर मग सोबत का राहायचे?
आनंद यावर काहीही बोलला नाही.
अस्मिता श्रीकांतसोबत राहायला तयार होते का…वाचा पुढील भागात
क्रमशः
पुढील भागाची लिंक

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!