गर्वाचे घर खाली
गर्वाचे घर खाली

गर्वाचे घर खाली

गर्वाचे घर खाली

विराजची आत्या रोज विराजला एक गोष्ट सांगत असते.

आत्या आज कोणती कथा सांगणार? विराजने आत्याला विचारले.

आज ना मी तुला  जंगलाच्या राजाची गोष्ट सांगणार आहे.

सिंह राजाची?

हो.

आत्याने गोष्ट सुरु केली.

गोष्टीचे नाव आहे  गर्वाचे घर खाली

एक मोठे जंगल होते. तिथे होते वाघ, सिहं,हत्ती, कोल्हा, मोर, हरीण, जिराफ, वानर आणि अजून खूप खूप प्राणी.

महिन्यातून एकदा मीटिंग झाली पाहिजे असा सिहं राजाचा आदेश होता.

मीटिंग झाली आणि जगलात पहिल्यांदाच राजा ठरवण्यासाठी   निवडणूक घ्यायची असे हत्ती दादाने सुचवले.

सिहं राजा लगेच तयार झाला. निवडणुकीत मीच निवडून येणार याची त्याला खात्री होती

हत्ती, कोल्हा, ससा, मोर, सगळ्यांनी निवडणुकीचे अर्ज भरले.

आणि आता सगळेच प्रचाराला लागले. जगलात सभा, भाषण सुरू झाले. अर्ज भरलेले सगळे जिकायचेच ह्या इर्षेने कामाला लागले. सिहंराजा मात्र बिनधास्त होता. सिंहीन राणी सिंह राजाला बोलली धनी एकदा तरी सभा घ्या, भाषण दया.

हट काही बोलू नको तू. जन्मत: राजेपद मिळाले आम्हांला. आम्हाला हरवण्याची कोणात बिषाद आहे?

राणी गुपचूप बसली.

रात्री सगळ्या प्राण्यांनी एक मीटिंग घेतली. वाघ म्हणाला, सिंह मला खूप त्रास देतो. मी केलेली शिकार फस्त करतो. कोल्हा म्हणाला मलाही असेच करतो. हत्ती म्हणाला, मलाही तो त्रास देतो. शाकाहारी आहे म्हणून चिडवत असतो.हरीण म्हणाला आम्हाला तर नेहमीच त्याच्यापासून लपून बसावे लागते. आज तुझी शिकार नाही करणार असे  खोटे वचन देतो.

ससा टूनकण उडी मारून म्हणाला. कुणालाच सिंह राजा नाही आवडत तर आपण राजाच बदलवू.

हो… आपण राजा बदलवू… सगळे जोरात ओरडले.

शू…. हळू अस्वल हळू आवाजात बोलला

सिहं राजा ऐकेल ना.

सगळे चूप बसले. वाघ हळूच बोलला मी बनू का?

मी कोणालाही त्रास देणार नाही.

हरीण म्हणाले, आम्हाला तर धाक राहणाच तुझा.

नाही. मी फक्त म्हाताऱ्या प्राण्यांची शिकार करणार.

सगळ्या प्राण्यांना वाघाने सुरक्षिततेचे वचन दिले.

चला ठरले तर मग. आपण सगळ्यांनी वाघाला मते देऊ हत्ती बोलला.

सगळ्यांनी हत्तीकडे बघून माना डोलवल्या.

 सगळ्यांनी आपापसात युती केली.गुप्तपणे सिंह राजाचा काटा काढायचे ठरवले.सगळ्यांनी वाघाला मत द्यायचे ठरवले. निवडणुकीचा दिवस उजाडला. पूर्ण जगलाने उत्साहात मतदान केले.

सिंह घरीच आरामात लोळून होता.

राजे चला मत देऊन येऊ.सिंहीण राणी म्हणाली.

काही गरज नाही. मी खूप मतांनी निवडून येणार सिंह राजा गुरगुरला.

राणी बिचारी एकटीच मत द्यायला गेली.

दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु झाली. सिंहाला फक्त एक मत मिळाले.

वाघ प्रचंड मतांनी विजयी झाला.

स्वतःच्या हरण्यावर सिंहाचा विश्वास बसत नव्हता. पण आता तो काहीही करू शकत नव्हता.

आता जंगलचा राजा वाघ आणि राणी वाघीण बनली होती.राजा बदलवायची आयडिया सशाची होती म्हणून  राजाने त्याला  बक्षीस दिले.

सिंहाचे गर्वाचे घर खाली झाले होते.

विराज गोष्ट आवडली का? आत्याने विचारले.

हो आत्या.

मग सांग बरं सिंहाला एक मत मिळाले ते कोणी दिले असेल?

विराज विचारात पडला.

बालमित्रांनो तुम्ही दया बरे उत्तर

प्रिती गजभिये

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!