मराठी प्रेमकथा
अनघा…..चुणचुणीत कॉलेज गर्ल,गव्हाळ वर्ण,सडपातळ बांधा,बोलके डोळे,, चंचलता अशी की जणू वाहणारं वारं. करकचुन स्कुटी ला ब्रेक लाऊन गाडी स्टैंण्ड ला लावते .लगबगीन गेट उघडून आत प्रवेश करुन बेलचे बटन दाबते .
काकु दार उघडतात.
अनघा -नमस्कार काकु … कशा आहात?
काकु -मी मजेत आहे बेटा.तू कशी आहेस?
अनघा-मी पण मजेत. खूप दिवस झाले रेवती ला भेटून. रेवती कुठे आहे?
काकु -ती च्या रुम मधे.जरा बर नाही तिला.बघ तुच काय म्हणते तर ती
अनघा -बर काकु,बोलते तिच्याशी.
रेवती ,अग ए रेवती , कुठे आहेस?
रेवती-ये अनघा ,बस ,,,
अनघा-हल्ली दिसत नाहीस ग .कालेज मधूनही आवाज न देता निघून आली ,गेली चार दिवस आपली भेट नाही .. का बोलत नाही ?, काय झाले आहे तुला?काकु सांगत होत्या बर नाही ..काय झाले?मला सांग नं ..मी जीवलग नं तुझी,,, सांग न मला ,,,,सांग बघु,,,,काय होतय तुला.
रेवती-(शून्यात पाहत…..).काही नाही ग अनघा,काहीच नाही,तुझ्याकडेच येणार होते आज,बस जरा उदास वाटतय ग ,करमत नाहीय ,बाकी काही नाही.
अनघा-माझ्याशी खोट ….. माझ लक्ष आहे म्हटल …..हुं,,हुं,,हं,,हुँं..अग हस ग.उदास कशाला होत आहेस?
गमतीची ती पाऊल वाट गंतव्यास पोहचली बहुतेक (बारीक हसत)…….सांग, मला सांग .काय झाले ?
रेवती –काय सांगू तुला ….कसे सांगू ,माझे मलाच कऴत नाही. हरवल्या सारखेच झाले ग.वेळ आली की सांगेन .
अनघा – हुमममममममममम…….नको सांगू ,
नको ग सांगू ……
नकोसच सांगू कुण्णाकुणाला ,
नकोच सांगू ,
नात हे अंतरंगातलं,
ओठात पेरलेल्या मधाऴ शब्दांचं ,
डोऴ्यात साठवलेल्या नशील्या लाजेचं,
अंगभर माऴलेल्या त्याच्या सुगंधी दरवऴीचं,
या ह्रदयी च्या त्या ह्रदयी धडधडणाऱ्या श्वासांच्या आवर्तनांचं,
कल्पनेत सोबत करणाऱ्या त्या अलगद पावलांचं,
एकांती हऴव्या होणाऱ्या त्या बेलगाम भावनांचं,
आठवात रमून कासावीस सहोणाऱ्या नाजुक मनाचं,
आणि एखाद्या मोहरलेल्या क्षणी ओथंबून निघणाऱ्या त्या गात्राचं.
हे अस ,
हऴुवार नात नकोसच सांगू ..कुण्णा कुण्णाला
सये किती ग लपवशील,प्रेमाच हे सुख हसरं
गुपित मनातील कथितात गं ,डोळ्यांची पापणपाखरं
हे प्रेम आहे वेडा बाई प्रेम , निखऴ , निर्मऴ,निर्विकार , निर्व्याज .प्रेम.भक्ती पेक्षा ही श्रेष्ठ .मनातील मानस पूजा म्हणजे प्रेम.अस हे प्रेम होण्याला सोप , निभवायला कठीण. गवसल त वरदान , नाही गवसल तर मोठ्या मनाने दिलेल दान .
राधाराणी झाली ग लाडके तु कृष्ण कन्हाई च्या प्रेमात रेवती ,
हो न …हो न ….सांग न संपूर्ण तनामनात आरास मांडलीय न. राहूल च्या नावाची राहूल..रेवती ,,.हो न ,,हो न,,हो.हो..,
कऴतात गं मला प्रेमा चे रंग ,
(मिश्किल हसत)………रेवती च्या डोऴ्यांचे डोह ,लाज लहरींनी तुडुंब भरले होते ,आणि नजरकोर कोपऱ्यातून हसत होती, ते लाजरे हास्य गालावरल्या खळीतून ओघळत होते.ऋतु हर्षित झाला होता..मनातील गोड गुपीत उलगडले होते,दोघी जीवलग मैत्रीणी,आनंद आलिंगनात विसावल्या, कोवऴे हास्य चहुदिशे ने पसरले.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा








हळूवार ,सुंदर कथा
सुंदर लिखाण
सुंदर .. हळूवार कथा
Nice
Wawawa