चित्र बघितले …अन ..मनापासून वाटले कि यावर काही तरी लिहावे …एक सुरेख संध्याकाळ यात.दाखवली आहे …संध्याकाळ म्हटले कि सगळ्यांना ..सहसा ..आयुष्याचीच …..संध्याकाळ आठवते …काही लोकं उगाच म्हणतात …संध्याछाया भिवविती ह्हदया …पण मला नेहमी प्रश्न पडतो ..कि .. जे सुंदर आयुष्य आपण जगलो …खूप वेगवेगळे सुंदर नाते ..आपल्या आयुष्यात निर्माण झाले …त्या सगळ्यांचा आपण आनंद घेतला …त्याबद्दल आपण देवाचे आभारी असले . पाहिजे पण कदाचित हे सगळे सोडून जायच्या विचारानेच ..आपल्याला त्या भिववीत असाव्यात ….कुठल्याही गोष्टीची जेव्हा सांगता जवळ येते …तेव्हा मन ..हूरहुरतेच ना ….
चित्रामध्ये ..सूर्य मावळताना दाखवला आहे ..अन्… पाण्यामध्ये .त्याचे सोनेरी प्रतिबिंब लाटांवर पडले आहे …
हे दृश्य पण मनाला खूप भावून गेले ….चैतन्य दायी अश्या ..प्रेमाची ..आठवण ……….करुन देणारी संध्याकाळ …प्रेमात पडलेल्यांसाठी ..यापेक्षा ..भेटण्याची योग्य वेळ ती कोणती ? दिवसभराची हुरहूर संपवून ..टाकणारा भेटीचा तो हळवा क्षण …..बहुतेक सगळ्यात जास्त …संध्याकाळच्याच वाटेला आला आहे ….असे मला नेहमीच वाटते
सगळ्यात शेवटी …पण मनाला प्रकर्षाने भावलेली गोष्ट म्हणजे …चित्रामध्ये ..एक स्री ..( मी तिला आईच म्हणेन…एखाद्या गोड बाळाची …)..डोक्यावर गाठोडे घेउन …जाताना दिसत आहे
दिवसभर …कष्ट करून …घरी जाणाऱ्या ….असंख्य स्त्रियांची ती प्रतीनिधीत्व करते …असे कुठेतरी मनाला प्रकर्षांने जाणवले…तिच्या साठी ती मग ती एक संध्याकाळ न…रहाता… एक ..कातरवेळच ठरते …..सतत ..कर्तव्यनिष्ठ रहाण्याची ..धडपड ….करत ..जगण्याची …अन्..त्यातच..जगण्याची उमेद ..शोधणारी ……..
वैशाली जोशी ..खोडवे
बोलके चित्र- मन सेतु
चित्र बघितले अन् …मला रामायणातले ..गाणं आठवलं …सेतु बांधा रे …सेतू बांधा रे सागरी ….
सेतू ….म्हणजेच पूल …..कुठल्याही दोन गोष्टींना जोडणारा …नदीच्या दोन काठांना जोडणारा ……..
वरील चित्रातील पूल..हा सगळ्यांनाच माहिती असलेला ..वांद्रे.. वरळी ..सागरी पूल आहे…नदीवरील पूल…आपल्याला तसे माहिती आहेत ..पण ..हा ..सागरावरील…पूल आहे …चार वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईला गेले होते ..तेव्हा आवर्जून हा पूल बघायला गेले होते …जेव्हा आमची गाडी त्यापूलावरून जात होती ..तेव्हा अक्षरशः मी भारावून गेले होते ….दिव्यत्वाची जेथें प्रचीती ….तेथे कर….माझे जूळती…ह्याचा अक्षरशः मी अनूभव घेत होते….
हे झाले …दोन ..काठांना ..जोडणाऱ्या पूलाबद्दल …पण …दोन ..माणसांच्या मनाला जोडणारा पूल ..तुम्ही कधी झाले आहात का …एकदा होऊन बघा …खूप छान वाटेल …
लहानपणी आपण नाही का आपल्या दोन.मैत्रीणींची ..कट्टी झाल्यावर ..त्यांची सो करून द्यायचो …कारण दोघीही आपल्या जिवलग मैत्रीणी असायच्या..त्यांच्या कट्टी असण्याने आपणच बेचैन असायचो …आणि मग त्यांच्यातला पूल बनून मग त्यांच्यातले भांडण मिटवून टाकायचो…..
दोन माणसांमधल्या दूराव्याला सांधणारा जसा, एक पुल होता येते…तशीच गरज, किंबहुना त्यापेक्षा अधिक गरज, एकाच माणसाच्या दोन मना मधील अंतरासाठी असावी….म्हणजे…त्याची आवड/महत्त्वाकांक्षा/इच्छा……..एका बाजूला…आणि त्याची परिस्थिती, मनाचा बुजरेपणा, लोकलज्जा…..दुसर्या बाजूला….
एखाद्या जवळच्या / दूरच्या व्यक्ति ची एखादी गोष्ट आवडली / खटकली……तर सांगू का? कसे सांगू….काय वाटेल….लोक काय म्हणतील……..
अशा वेळेस त्याला, योग्य तो सल्ला, प्रोत्साहन, आधार….देऊन……..त्याच्याच दोन मनांमधला पूल होता येईल, आणि ह्याच पुलावरून……मैत्रीचा पूलही बांधला जाईल
वैशाली जोशी खोडवे








मस्त ..
Mast 🌹🌹🌹