मुखवटा-marathi article
चेहरा….
खरा कि खोटा
अस्सल कि फसवा
हसरा चेहरा आतूनही हसरा असेल का?
आनंदी चेहरा आतूनही आनंदीच असेल हे
कसे ओळखणार?
नाही,नाहीच ओळखता येणार.
फक्त चेहराच असता तर कदाचित् ओळखलाही असता.
पण खोटेपणाचे
थरावर थर रचलेले असतात त्यावर.
मुखवटेच जणू.
चेहऱ्यावरचे खरे भाव कुणाला दिसू नये म्हणून कोण ही धडपड?
सदा मुखवटे लावावे लागतात.
आपण सगळ्यांना आनंदीच दिसायला हवे,आपले दुःख ,आपल्या आतील तणाव कुणालाही दिसता कामा नये.
हा अट्टाहास का?
कुणी घरी आले तर आनंदाने स्वागत करायचे
तुमचा मूड कसाही असो
घरी आलेल्यांना कळू नये.
घरची परिस्थिती कशीही असो
मुलांसमोर चेहरा हसराच हवा.
शेजाऱ्यांना अडचणी कळू नये म्हणून
त्यांच्यासमोर चेहरा दुःखी दिसता कामा नये.
घरी,दारी,बाहेर,आॕफिसमध्ये …..
सगळीकडेच फसव्या चेहऱ्याने वागायचे.
तो हसरा थर तसूभरही कमी व्हायला नको.
स्वतः तरी स्वतःचा मुखवट्याआडचा चेहरा बघायचा प्रयत्न करतो आपण?
सतत खोटा चेहरा मिरवायचा.
नट मेकअपचे थर चढवतो तसेच आपले पण.
ते पडद्यावर अभिनय करतात
आपण क्षणोक्षणी.
बाईने सुट्टी मागितली कि कपाळावरची आठी न दाखवता तिला सुट्टी द्यावी लागते.
आॕफिसमध्ये बाॕसने रजा रद्द केल्यावर आलेला राग चेहऱ्यावर दिसू देता येत नाही.
दोन अभ्यासात सारखे असणारे मित्र
एक पुढे निघून जातो
एक मात्र बराच मागे
मागे राहणाऱ्याला मित्र खूप पुढे गेला हे मनात सलणारे शल्य चेहऱ्यावर नाही आणता येत.
म्हातारपणी मुले समजून घेत नाही
याचे दुःख मुलांना वाईट वाटेल म्हणून कुणासमोर चेहऱ्यावर उघड करता येत नाही.
बाहेर सामाजिक पत असणारा नवरा घरात बायकोचा सतत अपमान करतो पण नवऱ्याची इभ्रत जपायची म्हणून बायकोला आनंदी चेहऱ्यानेच वावरावे लागते.
आयुष्यभर अभिनयच करतो आपण सगळे.
आपल्यालाही खरा चेहरा बघायचा नसतो.
मुखवट्यामागचा चेहरा बाहेर कधी येईल?
खरा चेहरा बघायला कधी मिळेल?
कदाचित् कधीही नाही.
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










मुखवट्या मागील खरा चेहरा ओळखणे खरंच कठीण आहे छान लिहिले
सुंदर …लिखाण
कटू सत्य मस्तच g
मनाच्या भीडणारे लिखाण
Wah khup chan🌹🌹🌹
अतिशय सुंदर,👍👍
रंगीत मुखवट्या मागे दडलंय काय????
अप्रतिम
म्हटलं तर साधा म्हटलं तर गहन विषय अगदी छान पणे घेतलाय
अगदी सत्य, मुखवटे घालून जग़नारे लोकच जास्त आहेत उत्तम लिखान व चागंला विषय
धन्यवाद