कुटुंब आणि करिअर
” हर जलते दिये तले अंधेरा होता है…
हर रात के पीछे एक सवेरा होता है….
लोग डर जाते है,मुश्किलो को देखकर …..
पर हर मुश्किल के पीछे ,
सफलता का सवेरा होता है….! “
माझा विवाह एका नामांकित शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या कला शिक्षकासोबत 1987 ला झाला. मी जेमतेम बारावीची परीक्षा दिली होती. माझं घर पाट्यांच मी पहिल्यांदाच पाट्यांच घर बघितलं होत. मला पहायला आलेल हे पहिलं स्थळ होतं.
आई – वडिलांनी घर बघून नाही, तर मुलगा बघून मला दिल
कारण
निर्व्यसनी, मेहनती, स्वकष्टाने उभा राहणारा आणि
त्यांच्याबद्दल सर्वजण मुलगा खूप चांगला आहे असं सांगत होते.
स्वकर्तृत्वाने आपले आई व भाऊंचा परिवार घेऊन सर्वजण सोबत या छोट्याशा घरात राहत होते. त्यावेळेस मला एवढं कळत नव्हतं.
माझा स्वभाव आज्ञाधारक खरा आणि स्पष्ट,
प्रामाणिकपणा व इमोशनल असल्याकारणाने मला पसंत केलं होतं, घराबद्दल माझी नाराजी होती,
परंतु आई-बाबांनी समजून सांगितले घर काय आज नाही उद्या होणारच. परंतु मुलगा असा मिळणार नाही, मला पटले आणि मग मी होकार दिला.
लग्न करून सासरी पदार्पण केले.
माहेरी मी सर्वांचे लाडके, माहेरी सर्व सुख सोयी होत्या, कशाचीच कमी नव्हती, मला स्वयंपाक सुद्धा यायचा नाही,
तरीही त्यांनी मला स्वीकारले.
बैठकीत झालेल्या प्रश्न उत्तरावर हे खूप खुश झाले होते.
लग्न होऊन घरी आल्यावरच आणि पहिल्याच दिवशी मला घरातील कुटुंबाविषयी संपूर्ण कल्पना दिली, माझ्या एकट्याच्या भरवशावर घर आहे. कुटुंब माझ्या मागे आहे, त्यासाठी, माझी इच्छा आहे कि तू शिकावे.
तू शिकली व नोकरी केली तर आपलं घर होईल, व आपल्याला होणाऱ्या संततीला चांगले शिक्षण देता येईल, तुझ्यावर अवलंबून आहे विचार कर,आणि मला सांग,
कारण यांचे बालपणआणि शिक्षणासाठी केलेला संघर्ष हा खूप भयानक होता, ऐकूनच मी खूप दुःखी झाले खूप मेहनती, स्वावलंबी, कर्तृत्ववान, जिद्द व चिकाटी आणि शिस्तप्रिय कुणालाही अभिमान वाटावा असे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेली धडपड ऐकून दुःख झाले होते,
पुढील संघर्षावर मात करण्यासाठी मला तुझी गरज आहे आणि तुला करावेच लागेल असं सांगून मोकळे झाले मी खूप विचार केला इकडे आड तिकडे विहीर अशी माझी गती झाली होती विवाहानंतर माझी सुरूवातच स्वयंपाक शिकण्यापासून झाली, तर टायपिंग संगीत नृत्य आणि चित्रकला असे अनेक कलागुणांना वाव मिळाला, मी लग्न झाल्यावर घरी जेव्हा आले तेव्हा अनेक विद्यार्थी चित्रकलेचे शिक्षण घेत होते, मला त्यांच्यासोबत क्लास मध्ये बसण्याचा आग्रह धरायचे माझ्यात धीटपणा नव्हता.
घाबरत क्लास करायची. मला चित्र रेखाटन कम्पल्सरी होतं.
नाही तर माझ्याशी बोलायचे नाही, मी कुटुंबाला पहिलं प्राधान्य दिलं होतं, घरातील सर्व कामातच माझा पूर्ण वेळ जायचा कधीकधी चित्रासाठी वेळ मिळायचा नाही,
हे घरी आल्यावर पहिले विचारायचे दाखवा आज काय केलं?..
स्वभाव कडक असल्यामुळे घरी सगळे म्हणायचे कामे आटपून तू चित्र काढून त्याला दाखवत जा, मला कळून चुकले होते घरातील मंडळीची अपेक्षा, मीच कामे केली पाहिजे, कामात पण स्वतःला वेळ दिला पाहिजे, या मध्ये अडकले होते, काय करावं सुचत नव्हतं, नाही शिकाव तर मला माहेरी सोडणार, सायंकाळी मी यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला तर हे काही ऐकून घेत नसत.
आणि तूला काय करायचे ते तू ठरव यावर मी काही बोलणार नाही.
एक दिवस यांच्या शाळेत शिक्षण मंत्री चंद्रिका केनिया यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होते, ह्यांची इच्छा होती कि माझ्या बायकोने माझं कौतुक पाहण्यासाठी यायला हवं होत, आणि नेमके त्याचं वेळेत घरी पाहुणे आल्यामुळे मी त्यांच्या सरबराईत लागली, मी कुटुंबाला प्राधान्य दिले,
संस्कारच असे होते की, आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य स्वागत करावं, माझे शाळेत जाणं झालं नाही. मग काय?… घरी रागात आले माझ्यावर खूप संतप्त झाले, शाळेतील असा मोठा कार्यक्रम असा कौतुकाचा प्रसंग परत येणार आहे का?
माझ्या चित्रप्रदर्शनीचे उदघाटन माझ्या बायकोने बघावं असं मला वाटत होतं, तुला काही महत्त्व नाही, जेवणावर वर राग काढून झोपी गेले, मला खूप वाईट वाटत होतं, अण्णा म्हणाले, अगं पोरी त्याच बरोबर आहे.
माझ्या मनावर खूप दडपण यायला लागलं मला समजत नव्हतं.
एकीकडे करिअर विषयी चिंता करायचे घरच्या लोकांचा विरोध होता शिकवण्यासाठी
तुझी परिस्थिती नाही, तर कशाला शिकवायचं हे शांतपणे ऐकून घेत,
आणि मग मला समजावून सांगायचे मला असं वाटतं की तू शिकावं आणि घरच्या लोकांना वाटतं की तू घरातील सर्व कामे तूच करावे या दोन्ही मधून जर मुक्त व्हायचं असेल आणि करिअर घडवायचे असेल तर तुला वेळेचे नियोजन करून चित्राचा सराव करावा लागेल, मला सावित्रीबाईंचा जीवनपट समजावून सांगितला प्रेरणादायक गोष्टी माझ्या मनावर बिंबविल्या आणि माझी मानसिक तयारी सुरू केली.
” शिक्षणाचा हा मंत्र जपू या मनो-मनी…!
लेखणी घेऊन हाती अंधार दूर करूनी.. !”
*”कुटुंब आणि करिअर—- एक आव्हान….!”*
वाटत होतं.
त्यांचं मन जिंकण्यासाठी मी तयारी दाखवली.
घरातील सर्वांची मने सांभाळून व कामे करून वेळ काढून रोजची पाच चित्र काढण्यास मला सक्ती होती, जीवाची ओढाताण होत,होती जणू तारेवरची सर्कस मला वाटत होती.
मी मनाशी ठामपणे निश्चय केला
” नव्या वाटा नव्या दिशा
मार्ग आपला शोधूया
पुरती करूयात आकांक्षांची
भविष्य सुंदर घडवूया…..!!”
आता नियमितपणे मी रोज चित्रांचा सराव करण्यास सुरुवात केली, माझ्या मध्ये झालेले परिवर्तन पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं.
” इच्छा असेल तर मार्ग सापडतो
हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. ”
” आयुष्याच्या वळणावर
साजना साथ तुझी लाभली
नवे स्वप्न रंगवून अशी
जगण्यासाठी दिशा मिळाली…!!
माझ्या कलागुणांना वाव मिळत गेला टायपिंग संगीत नृत्य अशा विविध गुणांचा विकास सर्व कलागुणांचे गुंफुनी माला स्वकर्तृत्वाने कलेच्या क्षेत्रात पदार्पण केले. आर्ट टीचर डिप्लोमा दोन वर्षाचा पूर्ण केला, विविध प्रकारचे क्लासेस सजावटीचे काम, नृत्य क्लास, बालभवन संस्कार केंद्र, चित्रकलेची शिकवण्याचे वर्ग, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, त्यासोबतच इतर कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले शहरातील प्रतिष्ठित वर्गांकडे जाऊन मुलांच्या शिकवणी घ्यायची नवरात्री उत्सव गणपती उत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धा यांचे परीक्षण करणे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करणे, यामुळे माझी समाजात चांगली ओळख झाली होती, 1992 ला कला शिक्षीकेची नोकरी मला मिळाली,
“सतत कार्यरत राहून
अस्तित्वासाठी लढाई केली
स्वतःच्या संघर्षातून उभी
जीवनाची वाट मोकळी झाली..!”
नोकरीमुळे खुप मोठी जबाबदारी अंगावर येऊन पडली होती, वेळेत सर्व काम करणे आणि कामावर वेळेवर पोहोचणे यांनी सासूबाईंना समजावून सांगितले आता तुम्हाला तिला वेळ द्यावा लागेल, आणि खरंच माझ्या सासूबाईंनी सुद्धा मला समजून घेतलं शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून दिलं
“कर्तव्यदक्ष राहून
दोन्ही घरी प्रकाश रे
कुटुंबाची करी सेवा
तीच घराची शान रे…..!!”
हळूहळू दिवस पालटले घरात आर्थिक चणचण दूर झाली कुटुंबाच्या गरजा सहज भागवत गेले,घरातील आनंदाचं वातावरण,
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समाधान वाटत होते,
एकीकडे माझी तारेवरची सर्कस निश्चित होती.
पण एक मात्र शिकले “इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मनुष्य काहीही करू शकतो
म्हणून मला असं वाटतं”
” दृढ करू संकल्प
हाती लेखणी घेऊन
जगू स्वाभिमानाने
गगनीचे पण घेऊ…
सांगू या जगाला ! आत्मविश्वास घेऊन,….!
कर्तव्यदक्ष होई, आत्मनिर्भर होऊन……!”.
घरामध्ये आनंदाचं वातावरण राहत असल्यामुळे कामाचा थकवा जाणवत नव्हता मन प्रसन्न वाटत होतं कुठलेही काम अगदी आनंदाने करायचे कुटुंबाचा व्यवस्थित सांभाळ करत नोकरीची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होती, पाहता-पाहता दोन मुलांची आई आणखीनच जबाबदारी वाढत गेली, मुलांचे संगोपन त्यांचे शिक्षण त्याने मात्र हार मानली नाही, त्या व्यतिरिक्त समाजात राहुन अनेक कार्यात सहभाग घ्यायची, अनेक समजउपयोगी संघटनेमध्ये सक्रिय झाली,
विविध क्षेत्रात सुद्धा काम करण्याचा आगळावेगळा अनुभव मला मिळत गेला, सतत काहीना काही शिकायला मिळालं शाळेत सतत कार्यरत राहायचे विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय कार्य व सामाजिक कार्य यात अग्रेसर असते आता माझी ओळख लेखिका म्हणून कवयित्री म्हणून त्या गुणांमध्ये भर पडली मी तिची ओळख निर्माण झाली प्रतिष्ठा मान सन्मान सर्वकाही मिळवल.
जगती स्वाभीमानाने पंखात बळ भरुनी…..,
घे भरारी आकाशी सन्मानाने राहुनी…. !
सावित्रीच्या यशाच्या मागे ज्योतिबा होता अगदी तसाच माझ्या यशाच्या मागे माझे पती आहे.. कुटुंबाची उत्तम साथ मिळाल्यामुळे मी अनेक कार्य सहजपणे करु शकत आहे आज आदर्श कला शिक्षिका पुरस्काराने सन्मानित असे सात पुरस्कार मला मिळाले आहे
माझा परिवार बागे सारखा फुलला आहे मोठा मुलगा सून बाई दोन नाते नाती एक मुलगा आर्किटेक्ट. मी खूप समाधानी आहे, हे सर्व करत असतानाच ईश्वराची कृपा भरभरून मिळाली आहे, आणि मिळत राहणार.
म्हणून मी माझ्या पतीचे माझ्या परिवाराचे ऋणी आहे.
“अशक्य ते शक्य करून
जिद्द चिकाटी परिश्रमाने
माणुसकीचे नाते जपता
मधुर वाणीतून बोलून…..!!”
आज मी माझ्या पतीचे स्वप्न पूर्ण करू शकली. आज माझं स्वतःचं कॉलेज आहे मोगरे चित्रकला महाविद्यालय पुसद येथे स्वतःचा सुंदरस घर आहे कलेच्या क्षेत्रात आज आम्ही नाव कमावले आहे.
एकमेकांच्या साथीने केली
कलेच्या विश्वाची सृष्टी उभी
त्याच चित्रातील राजाराणी
पाखरासवे ही झेप नवी.
स्पष्ट आणि निश्चिती असलेला
माणूस अतिशय खडतर रस्त्यावर….
सुद्धा प्रगती करेल…
.ध्येय शून्य माणूस रस्ता कितीही गुळगुळीत
असला तरी कुठेही पोहोचणार नाही..….
सौ सुरेखा गजानन मोगरे,
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
Khupch chan
अतिशय खडतर संघर्षमय जीवन प्रवास..
.सुरेख वर्णन👌👌👌
वाह…खूपच सुरेख
व्वा…किती संघर्ष …
खरे आहे, आपली जिद्द आणि प्रिय जनांची साथ मिळाली तर धेय्य साध्य होते.
अप्रतिम लेख..अशाच यशवंत व्हा
अप्रतिम
खूप छान मोगरे ताई असेच परीश्रम व ईश्वरी साथ ह्यामुळेच हे यश तुम्हाला मिळाले विशेष सरांचे पाठबळ खूप छान लिहिले 👌👌
Proud of you Mumma!
I’m so lucky to be your son😊
Thankyou for everything.
सुरेख . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🌹
खूपच सुंदर,,, शब्दांकित केले सुरेखा…….
अशीच उत्तरोत्तर उंच भरारी घे
👍👍
खूपच सुंदर 👌
मोगरे सरांची मी पण एक विद्यार्थिनी आहे.
वास्तवदर्शी जीवन गाथा जिद्द मेहनत चिकाटी यशप्राप्ती करिता केलेले परीश्रम यांची सुंदर शब्दात केलेली गुंफण म्हणजे ही जीवनगाथा होय
खूप खूप सुंदर लेख