झडीचे दिवस-लेख
कालपासून ..सतत पाऊस पडतोय …वातावरण पण कुंद झालय …सध्या कोरोना मुळे आधीच सगळीकडे ..निराशा दाटुन आली आहेत्यात …या सततच्या पावसामुळे पण ..वातावरण उदासवाणे झाल्या सारखे वाटतेय …
कधी कधी वाटतं …वय वाढले कि ..आपले जगण्याचे ..सगळे संदर्भच बदलतात कि काय …?आनंदाच्या संकल्पना पण …जशा बदलतात तशा …
लहानपणी ..पावसाळा म्हणजे ..माझा आवडता ऋतु होता …शाळा नुकतीच सुरु .. झालेली असायची
…नवीन वर्ग …नवीन पुस्तके ..आणि …त्यासोबतीने ..येणारा ..तो पावसाळा ….सगळेच कसे …सुंदर ..दिवस होते ते …त्यात …तो पाऊस म्हणजे पण …साधासुधा नसायचा …चांगली आठ ..आठ ..दिवसांची ..झड ..लागायची … आजच्या पिढीला कदाचित ..झड हा शब्द पण माहिती नसेल कदाचित …( झड म्हणजे … सलग ..चार,पाच दिवस न् थांबता ..पाऊस येणे …) आपल्या पैकी बऱ्याच जणांनी …ही झड ..अनुभवली असेल …माझे ..बालपण ..एका छोट्या गावातले ..आणि ..त्यात आमचा ..मोठा वाडा …आणी आजूबाजूला ..मोठमोठे वडापिंपळाचे झाडं …त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा ..जोरजोरात वारा सुटायचा .
..तेव्हा त्या.आवाजाने रात्री ..खूप भिती ..वाटायची …झडीच्या दिवसातले ..सगळेच कसे ..आनंददायी ..असायचे ..
एकतर ..शाळेला ..सुट्टी असायची …त्यामुळे आम्ही बहिण.. भावंडं .आणि आजूबाजूच्या ..सगळ्या मैत्रिणी ..दिवसभर…अगदी धमाल करायचो ….पावसांत भिजणे ….सगळ्यांनी मिळून मग ..घरच्यांना न् सांगता …गावच्या नदीला आलेला पुर….बघायला जाणे …त्यात नेमके मग ….गावातल्या कोणीतरी ..ते घरी जाऊन सांगणे …आणि त्यानंतरची ..मग ..भर पावसात आमची जी धुलाई व्हायची ….त्याचे वर्णन आम्ही काय …करावे…त्या दिवसातल्या रात्रींची मजा तर अजुनच वेगळी ….छोटे गाव असल्याने …लाईट फक्त ..कधी कधीच असायचे …आम्ही सगळेजण मस्त ..खाली गाद्या टाकून …झोपायचो ..आणि मग .कुणीतरी ..भुतांच्या गोष्टी सांगणे सुरु करायचे …
जोरात वारा सुटलेला …लाईट गेलेले …मुसळधार पाऊस …सगळेच कसे अगदी ..हाँरर फिल्म मधल्यासारखे ..वातावरण तयार व्हायचे ….भिती आणि मजा ..दोन्हीं गोष्टी एकदमच ..अनुभव ..एकदमच यायचा ..आणि ते सगळे ..होताना .कधी गाढ झोप लागायची ..ते कळायचेच नाही ..
दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर .. पाऊस संपून ..स्वच्छ ऊन पडलेले असायचे…
आज शाळेत जावे लागेल ..म्हणून थोडी नाराजी असायची ..पण ह्या झडीच्या दिवसांत आम्ही काय काय मजा केली . हे मैत्रिणींना सांगता येईल ..म्हणून परत एकदा शाळेत जाण्याचा उत्साह पण असायचा ..अशी ही लहानपणीच्या झडीच्या आठवणी…..
जसे वय वाढत गेले तसे, झडीची मजा आणि गमती बदलत गेल्या…
तारुण्यात झडीच्या आठवणी तर काही औरच……ज्यांनी अनुभवल्या त्यांनाच माहित……..
त्या नंतर मग…छान गरम वाफाळणारा चहा…सोबत आवडी चे एखादे पुस्तक………तो एक वेगळाच अनुभव…..अगदी मनापासून आवडणारा…
सध्याच्या संकटातून बाहेर पडून….परत एकदा प्रत्येकजण आपापल्या वयाप्रमाणे झडीची मजा मनमुरादपणे घेऊ शकेल हीच इच्छा…
वैशाली जोशी खोडवे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा











सुंदर
खूप सुंदर 👌👌👌
Good