बोलके चित्र-वैशाली जोशी ..खोडवे
बोलके चित्र-वैशाली जोशी ..खोडवे

बोलके चित्र-वैशाली जोशी ..खोडवे

मुखवटे-बोलके चित्र

बोलके चित्र

ह्या चित्राकडे बघताना पटकन मनात विचार चमकून गेले कि  हे चित्र  नक्की कोणत्या विचाराने काढले असेल,
‘मुखवटे आणि चेहरे’ की ‘स्त्री चि दोन रूपे’,  की आपल्याच ‘मनाचे रुपक,’ की  ‘आभास आणि वास्तव’
पण एक मात्र नक्की की ज्याने कोणी हे चित्र  काढले  त्याला चित्राच्या  दोन बाजू नक्कीच दाखवून द्यायच्या आहेत.
जर मुखवटे आणि चेहरे ह्या दृष्टीने विचार केला तर, पांढरा रंग आपले सर्वां समोर असलेले व्यक्तीमत्व दिसते. तो एक मुखवटाच आपण धारण केलेला असतो.जसे अनेक प्रसंगी आपण आपल्या मनाला मुरड घालून बर्‍याच गोष्टी स्वीकारत  असतो. पण जगाला आपल्या मनातले खरे सांगू शकत नाही,व्यक्त होऊ शकत नाही.
पण तसे जगाला दाखवता येत नाही. वरून हसतच रहावे लागते, मनात कितीही सल असली तरीही….
स्त्रीची दोन रूपे इथे मला वेगळ्या प्रकारे मांडायची आहेत, एकी कडे पुरोगामी  विचारसरणी,आणि दुसरीकडे प्रतिगामी विचारात अडकलेली. जसे निरक्षरता,हुंडाबळी जातपंचायत, कौमार्य चाचणी ईत्यादी,हे सुशिक्षित समाजातही आढळून येते. अशा विचित्र अवस्थेत असलेली आजची स्त्री… हे ही ह्यातून जाणवते.
तसेच हे चित्र आपल्याच मनाची दोन रूपे /द्विधा मनस्थिती दाखवते. एखादी गोष्ट करू की नको?,  जमेल का?लोक काय म्हणतील? एक ना दोन अनेक गोष्टीत आपला झालेला ‘अर्जुन’ ह्या मानसिक द्वंद्वातच उभे आयुष्य सरून जाते.
तिसरा एक अर्थ जाणवतो, आभास आणि वास्तव
आज आपण किमान 50%आयुष्य हे आभासी दुनियेत काढत असतो. सोशल मिडीया, सिनेमे, मालिका,ह्यात गर्क झालेलो असतो.
आणि वास्तवाचे भान हरवलेले असते.
ह्याच दोन दुनियेची सरमिसळ आपल्याला प्रत्यक्षात पहायला मिळते
मला ह्या चित्रातून अशा भावना प्रकट होताना दिसतात. तुम्हाला काय वाटते जरूर कळवा.
रंगकल्लोळ-बोलके चित्र

हे चित्र तसे पाहिल्यास रंगसंगतीचा एक खूप छान आविष्कार आहे असे मला वाटते
तसेच त्यात रंगा बरोबरच, वेगवेगळ्या गतींचे ही दर्शन होते.
जसे वावटळी प्रमाणे फिरणारे ढग, वेगाने अस्ताला जाणारा सूर्य, धबाबा कोसळत असलेला धबधबा….आणि अतीशय खोल आणि संथ असलेला डोह….

मला हे सगळेच कुठेतरी आपल्याशी आपल्याच भावनिक कल्लोळाशी साधर्म्य सांगणारे वाटते.
म्हणजे…आपल्या आयुष्यात येणारी संकटे, त्यामुळे बुद्धी अगदी वावटळीत सापडलेल्या कस्पटा प्रमाणे भिरभिरू लागते….दिशांचे भोवरे होणे….असेच काहीतरी….त्यात काही क्षणी दिसणारा एक आशेचा किरण…तोही वेगात….आपल्या आवाक्या बाहेर जात असल्याची जाणीव होते….संकटातून/ परिस्थितीतून बाहेर पडण्याचे आपले आटोकाट प्रयत्न चालु असतात…
आणि एका क्षणी वाट सापडते…..आपली सगळी शक्ती एकवटून आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडतो…अगदी त्या कोसळणार्‍या धबधब्या प्रमाणे…डोंगर फोडून स्वतः ची वाट तयार करतो……

आणि मग मिळते त्या अथांग पण संथ डोहाप्रमाणे एक स्थिर मन, किंवा एक स्थिर अवस्था….
बर हे स्थैर्य तरी कायम टिकणारे आहे का?…….हा एक अनुत्तरीत प्रश्न ते डोहावर उठणारे तरंग …सुचित करतात….

का कोणास ठाऊक हे चित्र पाहिल्यावर….त्यातील कलात्मकता…रंगसंगती…..नजरेत भरण्याआधी….
हेच विचार माझ्या मनात कल्लोळ करू लागले….त्या ढगांप्रमाणे

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

https://marathi.shabdaparna.in/प्रेमकथा

 

15 Comments

  1. Mohini1408

    खूप छान
    मला वाटते प्रत्येकाचे दोन चेहरे असतात. प्रसंगानुरूप कोणता समोर आणायचा, कोणता लपवायचा हे ठरवावे लागते, युग विचित्र आहे, त्यामुळे मनात नसतांना असे करावे लागते. तरच जगता येईल.

Comments are closed.

error: Content is protected !!