सेकंड इनिंग-मराठी स्त्री कथा
सौदामिनीने आज कपाट आवरायला घेतले.हल्ली वेळच मिळत नाही. आधी पटापट कामे करून निवांत वेळ मिळायचा. आता तर संपूर्ण दिवस कामात.पूर्वीसारखे कामे नाही उरकत आता.मनाची उभारी आहे पण शरीर तर थकत आहे नं.आजकाल थकायला होते. मुले अधुनमधून सांगत असतात,
आई पन्नाशीच्या झाल्या तुम्ही.
हो.. रे बाबा, माहिती आहे मला, अरे आता मला रिटायर करा बरे. आता पुढील महिन्यात बाबा रिटायर होत आहेत. मी पण होते,मग काय मजाच.
कोण रिटायर होतोय
सासुबाई आल्याच..
काही नाही हो आई गंमत सुरू आहे आमची. हल्ली मला पण थकायला होते. कमी वयात आजार मागे लागलेत.डायबिटीजने तर शरिरातील त्राण गेल्यासारखे वाटते.
अग.. बाई काय धाड भरली तुला. खाते पिते. सर्व मनासारखे आहे.साधे डोके दुखले तरी माझा पोरगा दवाखान्यात नेतो तुला.अर्ध पेन्शन तर डाॅक्टरच खावून घेतो.
तो बिचारा महागाईत पिचून गेला. तुझ्या कपाटात साड्या ठेवायला जागा नाही. कपाट उघडले कि अंगावर पडतात. एवढ्या साड्या आहेत तरीही काल लग्नाचा वाढदिवस म्हणून त्याने आणलीच साडी.
बराच वेळ सासुबाईच्या तोंडाचा पट्टा सुरु होता.
सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याकडे पण आता आपणच अशा व्यर्थ गोष्टी सोडून द्यायला हव्यात… सौदामिनी हसली. तसेही आता सर्व दुर्लक्षित करून जगणे सुरु आहे.हा काय म्हणतोय.. तो काय म्हणतोय हे तर मी केव्हाच सोडून दिले आहे. जगून घ्यायचे मस्त मोकळेपणाने, तर कधी लहरीपणाने अगदीच लहान बनून.लग्न झाले तेव्हा काय वय होते.
प्रतिष्ठित घराणे मुलगा नोकरीवर बाबा खूष होते.
घरी आल्यावर घरातला पोकळपणा कळला.सासुबाईचा फक्त दिखावा होता. शेतीवाडी विकून त्या केव्हाच मोकळ्या झाल्या होत्या. मुले असण्याचा अभिमान होता, किंबहुना गर्व अधिक होता. मला काय मुलगी आहे मान खाली जायला.. मुले आहेत मुले असे शब्द कानावर पडायचे.
संसार सुरू होता.घरात तीन दिर,त्यांचे शिक्षण खर्च..
नंतर मुले.नोकरी लागताच सर्वांनी आपापली घरटी शोधली.
सासुबाईला न्यायला कुणीही तयार झाले नाही.
तेव्हाच मी माझा मार्ग निवडला. आता पूरे झाले. आता फक्त आणि फक्त स्वतःच्याच इच्छा बघायच्या.
माझ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य कळतात मला. आता सातच्या आत घरात मी मुलीला सांगते पण मला आठ वाजले तरी चालेल कि.. नवरोजीला थोडी तरी मी कशी वाट बघत असते याची जाणीव होईल.
आता सेकंड इनिंग सुरू झाली. आयुष्य कसे सरले कळलेच नाही. कुणाला माहित किती श्वास बाकी आहेत, कदाचित सहा महिने..सात महिने.. बापरे किती अपुरा वेळ आहे आपल्या जवळ. आपण उगाच काळाला बांधून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. फक्त आज आपल्या हातात आहे.आपण उगाचच भावनिक गुंतागुंत वाढवित राहतो.सतत मुलांची काळजी.
मी आयुष्यभर त्यांना नाही जपू शकणार, पंख फुटले कि ते भरारी घेणार.कळते पण वळत नाही. आपण कधीतरी एकटे.. एकाकी होणार. सर्वांचे भावविश्व निराळे.
फोनच्या रिगंने सौदामिनी भानावर आली.
अग..आई कुठे आहे? आज फोन नाही,बरे आहे न तुला
रेवा विचारत होती.
हो..ग.. मस्त आहे मी सौदामिनी हसली.
रेवा.. माझ्याकरिता छान जीन्स घेऊन ठेव.
अग आई तुला वेड लागले कि काय.सतत साडी, खांद्यावर पदर आणि अचानक जीन्स . साधा गाऊन घातला नाही तू.
सतत नातेवाईक, शेजारी काय म्हणतील हा विचार.
अग रेवा,मी फिरायला चालली आहे मैत्रीणीसोबत. खूप मजा करणार..तिथे साडी थोडीच घालणार.
अग बाई.. माझ्या पोराला सोडून ही बया.. फिरायला जाणार.
नेहमीप्रमाणे सासुबाई आल्या.
सौदामिनी हसत होती..
प्रिय वाचक, कथा आवडल्यास नक्की Like,Share करा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाणmarathi.shabdaparna.in वर पाठवू शकता
email-shabdaparnamarathi@gmail.com
whatsapp-9867408400
https://www.facebook.com/








सौदामिनीसारखी सेकंड इनिंग जमायला हवी.
आपल्यालाही जमायला हवे
Wah sundr