११-उलटे पडले फासे-रहस्यकथा
प्रिय वाचक,आतापर्यत आपण वाचले, विनय,राहूल,मनिष होस्टेलमध्ये भेटतात.एकाच रुममध्ये राहत असल्यामुळे तिघांची घट्ट मैत्री होते.संस्कारी,हूशार,मेहनती विनय आणि अभ्यासाची आवड नसलेले राहूल,मनिष.विनय खूप पुढे जाणार ही सर्वांनाच खात्री.पण नशिबाचे उलटे फासे पडतात आणि सगळेच विपरीत घडत जाते.पोलीस इन्सपेक्टर बनलेल्या राहूलला विनयने चोरी केल्याचे समजते.राहूल आणि मनिषसाठी हे धक्कादायक असते.ते विनयला भेटतात.आता पुढे वाचा….
marathi suspence story
उलटे पडले फासे
भाग-११
दुसऱ्या दिवशी पुन्हा राहूल विनयला भेटायला गेला.
विनय वाटच बघत होता.
नशीब माणसाला कुठल्याकुठे घेऊन जाते.
ज्या राहूलबद्दल विनयला काळजी वाटायची कि मोठा झाल्यावर चोर बनला तर….
तोच राहूल आज पोलीसआधिकारी बनून त्याच्यापुढे उभा आहे.आणि ज्या विनयबद्दल सगळ्यांना खूप अपेक्षा होत्या तो विनय आज चोरी आणि खूनाच्या आरोपाखाली गजाआड होता. विनयच्या डोळ्यात राहूलला बघून पाणी तरळले. राहूल पासून त्याचे अश्रू लपले नाही.
राहूल विनयला धीर देत म्हणाला, विनय हिंमत ठेव . सर्व ठीक होईल.
किती हिंमत ठेवायची राहूल? शाळा सुटल्यापासून तेच करतोय. राहूल एक काम कर.माझ्या घरी फोन करुन सांग मी ठीक असल्याचे.आई आणि रमा वाट बघत असतील. मी शेजाऱ्यांचा नंबर देतो तुला.
बरं दे नंबर. रमा कोण रे?
हं. आले लक्षात.तुला लहानपणापासून आवडणारीतुझ्या मामाची मुलगी.
हो.तुला कसे माहित?
आम्हाला सगळे माहित आहे. तुझ्या डायरीने सांगितले.
डायरीत असलेली रमा आता माझी पत्नी आहे.
वाटलेच मला.राहूल हसत उत्तरला.
राहूल तुला आणि मनिषला खूप विचारायचे असेल नं माझ्या गतआयुष्याबद्दल. माझा हुशार मुलगा ते गजाआड गेलेल्या माणसाचा प्रवास जाणून घेण्याची उत्सुकता असेलच तुम्हाला.
राहूल- हो मित्रा पण तुला योग्य वाटेल तेव्हाच तू सांग.
विनय- तुम्ही मित्र आहात माझे. जाणून घेण्याचा अधिकार आहे तुम्हाला.
बाबा गेले आणि सगळे संपले रे राहूल. एका दिवसात आयुष्य पुर्णतः बदलले आमचे.
उघड्यावर येणे ,नातेवाईकांनी तोंड फिरवणे,नशिबाने साथ सोडणे,कोणी कुणाचा नसणे….या सगळ्या गोष्टींचा अर्थ बाबा गेल्यानंतर लक्षात आला.
प्रामाणिक आणि तत्वांशी कधीही तडजोड न करणारे बाबा खोटा आरोप सहन करु शकले नाहीत.
त्यांच्या तत्वांची ताकद खोट्या आणि भ्रष्ट जगात कमी पडली. बाबांपाठोपाठ आजीही गेली.
नेहमी आमचे कौतुक करणारे सगळे नातेवाईकही दुरावले.
आई बाबांची बदनामी सहन करु शकली नाही.मोजकेच सामान घेऊन आम्ही गाव सोडला.
गावाबरोबर आमची जगण्याचा आधार बनलेली स्वप्नेही सुटली. मी आणि विणा जन्मल्यापासून आईबाबांनी जी स्वप्ने बघितली त्याचा मागमुसही या नव्या,भकास आयुष्यात नव्हता.
एका दूरच्या नातेवाईकाच्या आधाराने आम्ही इथे आलो.
साधारण मोठ्या घरात राहायची सवय असलेल्या आम्हाला इथे भाड्याच्या एका खोलीत राहण्याशिवाय गत्यंतर नव्हती.आम्हाला दोघांना जगवण्यासाठी आईला धुणीभांड्यांची कामे करावी लागली. मीही इंजिनिअर बनण्याचे स्वप्न मनाच्या एका कप्प्यात ढकलून एका गॕरेजमध्ये काम करायला लागलो.
शिक्षण संपले कि गाडी घ्यायचे,आई-बाबांना गाडीत बसवून फिरवण्याची स्वप्न बघणारा मी लोकांच्या गाड्या दुरुस्त करतो आता.
डाॕक्टर बनण्याची मनिषा बाळगणाऱ्या विणाने शिवणक्लास लावला. दुसऱ्यांचे कपडे शिवून ती तिचा संसार चालवत आहे.
किती जलदतेने आमचे आयुष्य आमुलाग्र बदलले होते.
बाबांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आम्ही आयुष्यभर भोगतो आहोत.
विनयला हे सर्व सांगतांना खूप त्रास होत होता. त्याच्या डोळ्यातून अविरत धारा वाहत होत्या.
राहूलने त्याला थांबवले.
राहूल-विनय थांब.तुला त्रास होत असेल तर नंतर सांग.
आपण बोलू नंतर.
विनय शांत झाला.
राहूल जड अंतःकरणाने बाहेर पडला.विनयच्या घराच्या शेजारी फोन केला.विनयच्या पत्नीशी बोलला.
तिला बोलवून घेतले. त्याच्या घराचा पत्ता दिला.
ती दुसऱ्या दिवशी येणार होती.
राहूल घरी आला.आता अर्पिताला सगळे सांगणे आवश्यक होते. कारण विनयची पत्नी येणार होती.
राहूलने अर्पिताला विनयसोबत घडलेले सगळे सांगितले.
क्रमशः
दुसऱ्या दिवशी रमा आल्यानंतर काय होते…..वाचा पुढील भागात.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
Previous Part
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा





नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे
छान कथा
खूप आभार