१०-उलटे पडले फासे-  खुनी कोण असेल-रहस्यकथा
१०-उलटे पडले फासे- खुनी कोण असेल-रहस्यकथा

१०-उलटे पडले फासे- खुनी कोण असेल-रहस्यकथा

१०-उलटे पडले फासे
खुनी कोण असेल-रहस्यकथा
राहूल,मनिष,विनय तिघेही मित्र पण नशिबाचे फासे असे पलटले कि तिघांच्याही आयुष्याने अनपेक्षित वळण घेतले.विनयच्या डायरीमुळे मनिष,राहूलचे आयुष्य मार्गी लागले पण विनय? त्याचे काय झाले असेल?तो कुठे  असेल…..राहूलला पडलेल्या प्रश्नांची काय उत्तरे असतील  ….
१०-उलटे पडले फासे-खुनी कोण असेल-रहस्यकथा
आम्ही दोघे वाया जाता जाता विनयमुळे सुधरलो.आणि  विनय मात्र….काय असेल खरे?
अहो…अर्पिताच्या आवाजाने 
राहूल विचारांच्या तंद्रीतून भानावर आला.
तब्येत ठीक आहे ना तुमची,आज जेवलात नाही.
अग मनिषशी भेटून आलो.
मग बाहेरच जेवण झाले कि काय?
नाही ग. 
अर्पिता तुला विनय आठवतो का ग? आपल्या शाळेतला?
हो.विनय कुणाला नाही आठवणार?
 शाळेतील बुद्धीमान  मुलगा.कविता तर जाम फिदा होती त्याच्यावर.तिला खूप  आवडायचा तो.
 राहूल– -काय सांगतेस काय? कविताला  तो आवडायचा. कधी बोलली नाहीस तू.
 अर्पिता- कधी विषयच नाही निघाला.
 ती कुठे  असते ग आता?
  सध्या तर माहित नाही मध्ये पाचएक वर्षापूर्वी नगरला होती. ती नौकरी करते.दोघेही नवराबायको एकाच काॕलेजमध्ये शिकवतात.
  अरे वा!
  पण आज अचानक विनयचा विषय कसा आला तुमच्या डोक्यात?
  अग असेच. मनिष आणि मी भेटलो नं आज.तसेही त्याची आठवण आम्हाला नेहमीच येते.
  राहूलने खरे कारण देणे टाळले.
  कुठे असेल हो विनय? किती शोधले तुम्ही त्याला.
  होस्टेलमधून गेला तो गेलाच. 
  हो ग.
  
  उद्या भेटायचे का विनयला? भेटावेच लागेल.असा विचार करत त्याने डोळे मिटले पण विनयच्या आठवणी जवळ आणि  झोप त्याच्यापासून दूर गेली होती.
  राहूल सकाळीच उठला. मनिषला फोन केला. डायरी घेऊन त्याला पोलिसस्टेशनवर बोलवले. आणि घरुन निघाला.
राहूलला विनयची जमानत करायची होती.पण खून झालेला असल्याने एवढ्या लवकर जमानत मिळू शकणार नव्हती.
दोघे विनयला जिथे ठेवले तिथे पोहचले.
विनयच्या कस्टडीजवळ गेले.
विनय…
विनयने बंद गजाआड पाठमोरा उभा होता.त्याने मान वळवून बघितले. 
कुठे तो बुद्धीचे तेज असणारा  विनय आणि कुठे हा चोरीआणि खूनाचा आरोप असणारा विनय.काहीच साम्य नव्हते दोन विनयमध्ये. पण हा विनय तोच होता. ,त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा,त्यांचा बालमित्र
विनय त्यांच्या दिशेने चालत आला. आणि  त्यांच्या कडे बघून बोलायला लागला.
साहेब,खरेच सांगतो मी चोरी केली पण खून नाही केला.
खोटा आरोप आहे हा माझ्यावरचा.
तो दोघांनाही ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. 
विनय आम्ही  तुला खास भेटायला आलो.
मनिषने सोबत आणलेली डायरी त्याला दाखवली,
गजाआडून डायरीला हात लावून त्याने आश्चर्याने विचारले
ही डायरी तुमच्याजवळ कशी? 
तुम्ही ?
 आम्हाला ओळख.
नाही साहेब मी कसा ओळखणार तुम्हाला.ही डायरी मी माझ्या होस्टेलमध्ये  विसरलो होतो. माझे मित्र राहूल आणि मनिषला मिळाली असेल नंतर .
साहेब तुम्हाला कशी मिळाली? तुम्ही राहूल,मनिषला ओळखता?
हो. मनिषने उत्तर दिले.
काय? 
कुठे आहेत माझे दोन्ही मित्र.माझी एकदातरी भेट घडवून द्या साहेब. 
इथे याच शहरात राहतात.
साहेब त्यांना सांगा ना मला भेटायला.
वेड्या हा राहूल आणि  मी मनिष.
मनिष ओरडला.
काय?तुम्ही ? कसे शक्य आहे?
मी तर तुम्हाला भेटायची आशाच सोडली होती.
राहूल,मनिष अरे किती वेगळे दिसता तुम्ही..
राहूल तू चोरी करता करता पोलीसअधिकारी बनला.
आनंदाच्या भरात क्षणभर तो जेलमध्ये आहे हे तो विसरला.
हो यार आणि हा नेहमी मला वाचवण्यासाठी खोटे बोलणारा मनिष वकील बनला.
 तुमची आठवण आली कि वाटायचे तुम्हीही माझ्यासारखेच….
बोलतांना आवाज आणि  डोळे भरुन आले. राहूल त्याचा हात पकडत बोलला
विनय तू घाबरु नकोस.मी आणि मनिष नक्कीच तुला वाचवू.
तुमचाच आधार आहे आता  विनय पुटपुटला.
पार दैना झाली रे माझ्या आयुष्याची. पुढे  काय काय वाढून ठेवले नशिबाने कोण जाणे.
तिघेही  बोलत राहिले.
माझी डायरी एवढी वर्ष जपून ठेवली रे तुम्ही.
विनय तू गेला नी आम्हाला फार अपराधी वाटायला लागले.बरे
एवढ्या वर्षांनी भेटले होते.नेमके काय बोलावे सुचत नव्हते किंवा काहीही आणि कितीही बोलले तरी समाधान होत नव्हते.
आम्ही येऊ पुन्हा असे बोलून दोघे निघून गेले.
विनय विचार करु लागला.
योगायोग पण किती जबरदस्त असतात.
राहूल आणि  मनिष विनयला भेटून  वापस निघाले.
विनयला तर ते सांगून आले तुला काही होणार नाही,आम्ही तुला या संकटातून बाहेर काढू……
पण सकृतदर्शनी तरी सगळे कठीणच वाटत होते.
दोघेही तणावात होते. पुढे काय?प्रश्नच होता.
वापस जातांना दोघेही आपापल्या विचारात गढले होते.
मनिष काय वाटते तुला? विनयला आरोपातुन वाचवू शकू का आपण? राहूलने विचारले.
एकंदरीत कठीणच दिसतेयं सगळं. आपला विनय पुराव्यासहीत सापडला. खून झाला तिथेच नेमका सापडला. खूप  प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाला यश येईल याचीही खात्री नाही.
राहूलने मनिषला घरी सोडले आणि  त्याच्या घराकडे निघाला.
कसे वाचवावे विनयला? खून त्याने केला नाही हे नक्की.
मग कोण असेल खूनी? पुरावे कसे जमवावे?
एवढ्या वर्षाच्या नौकरीत प्रथमच त्याला एवढा तणाव आला होता.
आपला मित्र खूनी नाही हे त्याचे मन सांगत होते पण ते सिद्ध करणे आवश्यक होते.
राहूलचे मन विनय खुनी नाही असे सांगत आहे पण खुनी कोण असेल…..

क्रमशः

Next Part

https://marathi.shabdaparna.in/११-उलटे-पडले

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400

Previous Part

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!