उलटे पडले फासे
खूनाचा तिढा-Marathi suspence story
मानकर सर,खूनाचा तिढा सोडवू शकतात का….वाचा खालील भागात
राहूल-विनय थांब.तुला त्रास होत असेल तर नंतर सांग.
आपण बोलू नंतर.
विनय शांत झाला.
राहूल जड अंतःकरणाने बाहेर पडला.विनयच्या घराच्या शेजारी फोन केला.विनयच्या पत्नीशी बोलला.
तिला बोलवून घेतले. त्याच्या घराचा पत्ता दिला.
ती दुसऱ्या दिवशी येणार होती.
राहूल घरी आला.आता अर्पिताला सगळे सांगणे आवश्यक होते. कारण विनयची पत्नी येणार होती.
राहूलने अर्पिताला विनयसोबत घडलेले सगळे सांगितले.
दुसरा दिवस उजाडला. राहूल तयार झाला आणि बसस्टँण्डवर विनयच्या पत्नीला आणायला गेला. काल फोनवर त्याने युनीफाॕर्ममध्ये येणार असे सांगितले होते.शिवाय तिचे नाव रमा हे राहूलला माहीत होते तिच्यासोबत पाच वर्षाचे बाळही होते.त्यामुळे लवकरच त्यांनी एकमेकांना ओळखले.
राहूल रमाला घरी घेऊन आला. गरीबी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. घरी आल्यावर अर्पिताशी ओळख करुन दिली
विनय-रमाचे बाळ चुणचुणीत होते.
विनयची बुद्धिमत्ता झळकत होती त्याच्यात.
बाळा तुझे नाव काय? अर्पिताने विचारले.
संस्कार.
वहिनी उद्या आपण विनयला भेटायला जाऊ असे रमाला सांगून राहूल ड्युटीवर निघाला.
अर्पिताने थोडक्यात जे झाले ते रमाला सांगितले. विनयच्या संसाराला तिच्यापरीने हातभार लावत होती. पण तिचा हातभार पुरेसा नव्हता.
जागोजागी फाटलेल्या वस्त्राला किती ठिगळ लावणार?
अर्पिताला वाईट वाटले तिने सांगितलेले ऐकून.
मानकरसर पोलीसस्टेशनला पोहचले.
मानकर सरांचा प्रवेश नेहमीच्याच रुबाबात झाला.
कोणीतरी एक मुलगा त्यांची वाट बघत बसलेला दिसला.मानकरसर दिसल्याबरोबर त्याने सरांना नमस्कार केला. अरे कोण तू? मी ओळखले नाही तुला.
सर, मी प्रल्हाद. माझे वडील चोरीच्या गुन्ह्यात अडकल्यानंतर तुम्ही माझ्या शिक्षणाचा खर्च उचलला तोच मी.प्रल्हाद.
तुमच्या मदतीमुळे ग्रॕज्युएट झालो आणि बॕकेची परीक्षा दिली.कालच बॕकेत रुजू होण्याची आॕर्डर मिळाली.साहेब सगळे तुमच्या मदतीमुळे.
प्रल्हाद तुला मदत केल्याचे चीज केले तू.
आपल्याला शक्य असेल तेवढी मदत दुसऱ्यांना नक्की करावी.
हो साहेब मीही हे कायम लक्षात ठेवेल.
येतो साहेब.असे म्हणून प्रल्हादने मानकरसरांना वाकून नमास्कार केला आणि तो निघून गेला.
साळूंकेने फाईल काढून तयार ठेवली होती.
साळूंके आज काय गुन्हे झालेत?
साळूंकेने फाईल पुढे केली. मानकरसरांनी त्यावरुन झरकन् नजर फिरवली.
साळूंके एका रात्रीत किती गुन्हे वाढतात.
हो सर.
बेरोजगारी आणि त्यामुळे आलेली गरिबीच याला कारणीभूत आहे.
साळूंकेला मानकरसरांनी गुन्ह्याचे केलेले समर्थन ऐकून साळूंकेला आश्चर्य वाटले. मानकरसरांची रोजची ड्यूटी संपली.त्यांनी साळूंकेला विनय मनोहर मोरेची फाईल मागितली आणि साळूंकेला जायला सांगितले.
साळूंकेने फाईल दिली आणि सरांशी ह्या मोरेचा काहीतरी संबंध नक्की आहे असे पुटपुटत साळुंके बाहेर पडले.
बाहेरच त्यांना सुर्वे भेटले.
आपल्या मानकरसरांनी किती लोकांचे आयुष्य बदलवले यार.
आज प्रल्हाद आला होता मिठाई घेऊन.तो रे त्याच्या वडिलांना चोरीच्या आरोपाखाली जेल झाली होती.तुझ्या शेजारीच तर राहायचा तो .बॕकेत नौकरी मिळाली त्याला.साळूंकेने सुर्वेला बातमी दिली.
अरे वा! चांगले झाले रे.खूप वाईट दिवस आले होते
त्यांच्यावर.
खरयं मानकरसर खूप जणांना आयुष्यात उभे राहायला मदत करतात.मानकरसरांच्या दिलदारपणाच्या गप्पा करत दोघेही निघून गेले.
मानकरसरांनी विनयची फाईल पुन्हा एकदा न्याहळली.
कालच्यापेक्षा आज काही वेगळे दिसते का हे परत परत तपासले.पण हाती काहीही लागत नव्हते.शहरात श्रीमंत म्हणून प्रसिध्द असलेल्या मयंक अग्रवालच्या खूनाचा आरोप विनयवर होता.
घटनास्थळी विनय पुराव्यासहीत सापडला होता.
खूनाचा तिढा सोडवण्यात पटाईत असलेल्या मानकर सरांची मती इथे मात्र काम करेनाशी झाली.
विनयने खून केला नाही असे तो सांगत आहे म्हणजे त्याने खून केला नाही हे नक्की होते.
पण मग खूनी कोण असेल?तो कसा सापडेल? सकृतदर्शनी पुरावे विनयच्या विरोधात आहे.
मानकरसर हवालदिल होऊन जरा वेळ बसून राहीले.आणि मनात काहीतरी ठरवून तिथून निघाले.
दुसऱ्या दिवशी मानकर सर सकाळीच मयंक अग्रवालच्या कंपनीत गेले.तिथे काहीतरी हाती लागेल या आशेने.पण तिथे कोणी काही बोलायलाच तयार नव्हते.कंपनीचे सुत्र मयंकची पत्नी शिखाच्या हाती आले होते.
शिखाची सध्याची मनःस्थिती आॕफिसमध्ये येऊन काम करण्याची नव्हती.मयंक तिला सोडून गेला या धक्क्यातून ती अजून बाहेर आली नव्हती.
मयंकचा खून झाला तेव्हा ती आईबाबांकडे होती याचेही तिला खूप वाईट वाटत होते.ती घरी असती तर कदाचित् असे होणे टळू शकले असते. सध्यातरी ती घरुनच काम बघत होती.ती आईवडिलांकडे जायची. पण त्यांचे आणि तिचा भाऊ शेखरचे तिच्याकडे कमी येणेजाणे होते.त्यामुळे त्यांची चौकशी करणे मानकरसरांना गरजेचे वाटले नाही.
तिला विचारलेल्या प्रश्नांची ती अगदीच जुजबी उत्तरे देत होती.
मानकरसरही सध्या तिला जास्त प्रश्न विचारणे योग्य नाही असे समजून तिथून निघाले.
मानकर सर तिथून सरळ पोलीसस्टेशनला आले.
तिथे मिडियावाले त्यांच्याआधीच येऊन बसून होते त्यांची वाट बघत.
मानकर सर दिसल्याबरोबर त्यांच्यातील एक बोलायला लागला
सर,खुनी तर त्याच दिवशी पुराव्यासह मिळाला. मग तुम्ही उघडपणे काही सांगत का नाही?पंधरा दिवस झाले मयंक अग्रवालचा खून होऊन.खूनाचे कारणही अजून कळले नाही.
तुम्हाला कोणी सांगितले खूनी सापडल्याचे?
ज्याला पकडले त्याच्यावरील गुन्हा अजून सिद्ध झाला नाही. योग्य वेळ आल्यावर आम्ही सांगूच. या आता तुम्ही.मानकरसर जरा रागातच बोलले.
मयंक अग्रवाल नावाजलेला बिझनेसमॕन असल्यामुळे त्याच्या केसकडे मिडियाचे लक्ष राहणारच होते.
क्रमशः
.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
Next Part
Previous Part
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा




खूप छान.. कथा गुंतवून ठेवणारी.
खूप आभार
उत्सुकता कायम