९ आभास हा छळतो मला
९ आभास हा छळतो मला

९ आभास हा छळतो मला

९ आभास हा छळतो मला

 सुखदा- तुम्ही जर सतत चित्रकार मानसबद्दल अपशब्द बोलत असणार तर मी कुणाशीही बोलणार नाही.
एकदा जेवतांना वसुधाताईंनी सुखदाच्या लग्नाचा विषय काढला.
सुखा, तुझ्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न झाले.तू कधी करणार?
सुखदाने धमकावले आईला,
यानंतर माझ्या  लग्नाचा विषय काढला तर मी संपवेन स्वतःला.
तेव्हापासून मनोहरराव आणि वसुधाताई लग्नाचा विषय काढायला धजावले नाही. पण दोघेही सुखदाच्या काळजीत झुरत होते.काय करावे काही सुचत नव्हते.सुखदा मानसला विसरायला तयार नव्हती आणि मानस सुखदाशी ओळखही कबूल करत नव्हता.
 शाश्वत आणि संपदाने एकदा पुन्हा मानसला भेटण्याचे ठरवले. ते दोघे घरी गेले.दुपारी गेले चौकीदार नव्हता. दार मानसनेच उघडले.ह्या दोघांना बघून त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या.त्याने दारातच विचारले,

 

काय काम आहे आता?
संपदाने Please दोन मिनिटे आम्हाला बोलू द्या.
 अशी विनंती केली. मानसने त्यांना घरात घेतले. पुन्हा संपदा,शाश्वतने तेच सांगायला सुरुवात केली. मानसने परत अनभिज्ञता दाखवली. मानसने हात जोडून विनंती केली,
 मी तुमची व्यथा समजतो पण खरेच मी नाही ओळखत सुखदाला.हे नावही मी कधी ऐकले नाही.
 तुम्ही तिला आॕफिसमध्ये भेटायला नाही जात?
संपदाने विचारले.
 ती कुठल्या आॕफिसमध्ये काम करते हे सुद्धा माहीत नाही मला.
शाश्वत,संपदाला मानसवर विश्वास ठेवणे कठीण जात होते पण ते काही करुही शकत नव्हते.
घरी येऊन संपदाने सुखदाला विचारले,
 सुखा तुजजवळ एखादा पुरावा आहे का मानसच्या प्रेमाचा.
नाही ग आम्हाला कशाला  हवा पुरावा?
एवढ्यात कधी भेटली सुखदा तू त्याला?
.परवाच तर भेटली. त्याच्या  गाडीने long drive ला गेलो होतो.बाहेर पावसाची रिमझिम आणि गाडीत चित्रकार मानसच्या आवडीची गाणी सुरु होती..
सुखा काही पुरावा असेल तर देना ग.तू मानसला भेटतेस त्याचा.एखादा फोटो काहीतरी तर असेल.मानसचे पत्र.तुम्ही एवढ्यात कुठे भेटले? काहीतरी सांग सुखा.त्याशिवाय मानस कबूल करणार नाही.

 

फोटो  खूप  आहेत ग पण सगळे मानसजवळआहेत. त्या फोटोंवरुनच तर तो  माझे चित्र काढतो ना.
उद्या कुठे  भेटणार तुम्ही?
मी आणि शाश्वत येतो तिथे.
 उद्या नाही भेटणार आहोत आम्ही.
कधी भेटणार ते ठरले कि सांग आम्हाला सुखा.
 सुखदा काही न बोलता खोलीत निघून गेली.
संपदा आणि शाश्वतला सुखदा काहीही सांगणार नाही हे लक्षात आले होते. मानसला रंगेहाथ पकडण्यासाठी त्यांनी आता सुखदाचा पाठलाग करायचे ठरवले.दोघेही आपापल्या आॕफिसमधून लवकर निघायचे आणि   संध्याकाळी सुखदाच्या आॕफिसच्या बाजूला उभे राहून तिच्यावर पाळत ठेवायचे. एक दोन तीन……आठ दिवस गेले. एकही दिवस मानस त्यांना दिसला नाही
मानसला आपला डाव लक्षात तर नसेल आला संपदा?
शाश्वततने विचारले.
क्रमशः

पुढील भाग वाचण्यासाठी कृपया  खालील लिंक बघा.

भाग-१० ची लिंक

https://marathi.shabdaparna.in/१०आभास

प्रिती गजभिये
कथामालिका कशी वाटत आहे.अवश्य सांगा.
तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!