अक्षम्य -भाग-११
अक्षम्य -भाग-११

अक्षम्य -भाग-११

काही गुन्हे अक्षम्य असतात.
अस्मिता श्रीकांतसोबत राहायला तयार होते का…वाचा
अक्षम्य -भाग-११
केस कोर्टात गेली.अस्मिता आता सोबत राहणार नाही याची पवारांना खात्री पटली.ते mutual divorce ला तयार झाले.
घटस्फोट झाला.
अस्मिता मॕडमने काॕलेजजवळच एक छोटे घर घेतले.त्या तिथे राहायला आल्या. ज्या बाईला सोडून श्रीकांत पवार अस्मिताबरोबर राहणार होते तिच्याशी त्यांनी लग्न केले.
अस्मिता मॕडम आधीही एकट्या होत्या आणि  आताही एकट्याच राहू लागल्या. फरक एवढाच कि आधी लग्नाचे बंधन होते. आता त्या बंधमुक्त होत्या.
आनंद शलाकाने त्यांना दुसरे लग्न करण्याविषयी समजवले .पण त्या तयार होत नव्हत्या.त्या श्रीकांत सोबत  राहू शकत नव्हत्या पण विसरुही शकत नव्हत्या.त्यांनी दोघांनाही सांगितले 
श्रीकांतने फसवल्याची सल मनात आहे  पण त्याच्यावरचे प्रेम कमी झाले नाही.
शलाका म्हणाली,प्रेम आंधळे असते हेच खरे.
नक्षत्राचे बी.ए. चे पहिले वर्ष संपले.
चांगल्या गुणांनी पास झाली.
नक्षत्रा शलाकाला भेटायला आली कि नेहमी आनंदसरांचे गुण गायची. आनंदसर खूप जणांना काॕलेजमध्ये मदत करायचे.सगळ्यांचे लाडके सर असा त्यांचा लौकिक होता.
नौकरी लागल्यानंतर त्यांचे माजी विद्यार्थी काॕलेजमध्ये त्यांना भेटायला यायचे. आनंदसरांनी  त्यांना कधी फी भरुन तर कधी होस्टेलमध्ये अॕडमिशन अशी मदत केली होती.
नक्षत्राचे बोलणे ऐकले कि तिला आनंदबद्दल वाटणारा अभिमान अजून वाढायचा.तिचे बाबाही गरजू विद्यार्थ्यांना अशीच मदत करायचे.
तिने नक्षत्राला सांगितले,मी फायनल इयरला असतांना आनंदसर  काॕलेजमध्ये रुजू झाले. शलाकाचे बाबा तेव्हा तिथे प्राचार्य होते.
आनंदही त्याच काॕलेजमध्ये शिकला होता.
आनंदसर काॕलेजमध्ये रुजू झाले तेव्हापासूनच सर्वांचे आवडते बनले.त्यांच्या व्यक्तीमत्वातच मोहकता आहे.
मुलींमध्ये तर तेव्हा ते विशेष प्रिय होते.
शलाका नेहमी आनंदला म्हणतही असते,
आनंद तू  मनुष्य चुंबक आहेस.सगळे आकर्षित होतात तुझ्याकडे.
 सगळे माझ्याकडे आकर्षित होतात आणि मी मात्र फक्त तुझ्याकडे आकर्षित झालो.
हे आठवून शलाकाला हसू आले.
मुक्ताचा वाढदिवस म्हणजे कुटूंबियांना आनंदाची पर्वणीच.
संध्याकाळी सगळे मित्र मंडळ ,नक्षत्रा,शलाकाची आई जमले.आनंदचे मित्र मोहित,राजा,शलाकाच्या मैत्रिणी 
विभा, मेधा आल्या.
सगळे मुक्ताचे कमी आणि आनंद-शलाकाचे जास्त कौतुक  करत होते.
शेवटी आनंदने सगळ्यांना सांगितले
अरे,मुक्ताचा दिवस आहे. सगळ्यांनी माझ्या लेकीचे कौतुक करा. 
मुक्ताचा चवथा वाढदिवस.
दोन्ही आज्यांच्या नजरेतून मुक्ताबद्दलचे कौतुक  ओसंडत होते.
शलाका तुला सांगतो, मोहित  सुरु झाला.
हा काॕलेजमध्ये एवढा matured नव्हता यार.
तू त्याच्या आयुष्यात आली नि सुधरला आमचा मित्र.
 ए काही नको सांगू तिला.
 हमारे maturity पें लडकियाॕ मरती थी.
 अस्स का? सांगू का ती गोष्ट 
 कोणती? सांग रे मोहित.
 शलाकाचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागले.
 बघ,शलाकाचा विश्वास नाही तुझ्यावर.
आहे. आहे.पूर्ण  विश्वासस आहे माझा.
ठीक आहे सांगतोच मग.ती होती ना रे काॕलेजमध्ये आपल्या?
अरे कोण? सांग ना पटकन.शलाकाने विचारले.
मिळाला मिळाला पुरावा. शलाकादेवी  तुमचा आनंदवर विश्वास नसल्याचा पुरावा मिळाला.
काहीही  हं मोहित.
चला केक कापायची वेळ झाली. मुक्ताच्या आजोबांनी आवाज दिला. मुक्ताने केक कापला. सगळ्यांचे जेवणे झाली. मुक्ता आजी-आजोबांबरोबर झोपायला गेली.
मित्र मंडळी जायच्या तयारीत नव्हते.सगळ्यांनी कराओकेवर गाणे गायचा आग्रह धरला.
सगळ्यांची गाणी गाता गाता पहाट झाली.
आनंद-शलाकाच्या घरची पार्टी अशीच असायची.त्यामुळे सगळ्यांना आवडायची.
पहाटे पहाटे सगाळे परत गेले.
सगळ्यांचा निरोप घेऊन आनंद -शलाका अंगणातच थांबले जरावेळ.
रात्रीच्या नभी चमकणाऱ्या  चांदण्या आणि चंद्राची जागा आता रविकिरणे घेऊ पाहत होते.हळूवार शीतल चंद्र सूर्याच्या प्रखरतेमुळे काढता पाय घेण्याच्या तयारीत होता.
शलाका पहाट होत आहे बघ. मित्रांसोबत रात्र कशी सरली कळलेच नाही.
हो ना. चंद्रही निरोप घ्यायच्या तयारीत आहे.
सूर्य  किरणांच्या दाहकतेत त्याची शितलता हरवणार आता.
आनंद तुला एक सांगायचे आहे रे.
अग सांग ना.
खूप  दिवसांपासून,वर्षांपासून म्हणजे आपल्या लग्नापासूनच तुला खूप  महत्वाचे सांगायचे आहे.
सांग ना शलाका. तुझ्यात नि माझ्यात काही अंतर आहे का?आपल्या नात्यात तेवढा मोकळेपणा आहेच.
त्याचीच तर भीती आहे आनंद.
आता नसलेले अंतर मी सांगितलेले गुपीत ऐकून निर्माण झाले तर.
आता असलेला मोकळेपणा नंतर नाहीसा झाला तर. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे आपले नातेच संपले तर.तुझ्याशिवाय मी राहू नाही शकणार. आणि तीच वेळ माझ्यावर आली तर.
मला सांगायचे तर आहेत पण तुझा दुरावा होण्याची भीती आहे मला.
अग मी इतका immature वाटतो का तुला कि तुझ्या मनात वर्षानुवर्षे  दडलेली खळबळ समजू नाही शकणार.
नाही रे.पण गोष्टच तशी आहे.
बरं तुला सांगायला त्रास होत असेल तर नंतर सांग.
 मी कोणत्याही परिस्थितीत तुझा हात सोडणार नाही.
चल झोपू या जरा वेळ.
शलाका झोपली लगेच.
आनंद विचारात पडला. शलाकाला तीच गोष्ट सांगायची आहे याची खात्री होतीच त्याला.
ती सांगू नाही शकत आहे आणि त्यापुढचे मी तिला सांगितले तर…. विचारानेच त्याचे शरीर घामाने डबडबले.
मी कधी सांगू शकणार शलाकाला मला सलणारी बोच? आतल्याआत वाहणारी जखम तिला कधी दाखवू शकणार?
तिला सांगितल्यावर जखम भरेल कि अजून भळभळा वाहणार?
कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नाही.
रात्रभर झोप झाली नव्हती पण त्याहीपेक्षा ह्या अंतर्मनातील वेदनांनी त्याची झोप उडवली होती.तो उठला.बाहेर अंगणात आला.बाहेर मोकळी हवा होती. पण मन मोकळे नव्हते. भूतकाळातील त्याच्या  एका चुकीने मन सदा काळवंडले होते.आभाळात मेघ जमा झाल्यावर जसे दिसते तसे.पण आभाळातील मेघ पावसाच्या धारा बनून कोसळल्या कि आभाळ निरभ्र होते.
आनंदचे तसे होत नव्हते.वर्षानुवर्षे मेघ दाटलेच होते.ते मनातून बाहेर पडल्याशिवाय मन स्वच्छ होणार तरी कसे?
तो अंगणातून आत आला.
ब्लाॕग लिहायला घेतला.
अंतर्मनातील गुढ हे शिर्षक दिले कथेला. पण पुढे  काय?
क्रमशः 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!