आनलाईन वर्ग सुरू हाये ..
हे पहा पोट्टेहो… सबन काम करून या बर मंग मधातच गायब होता लेकहो…
गन्या ..तुया मोबाईल चार्ज करुन घेत जाय बापा ..आठ दिवसापासुन मधातच गायब होत.. इचारल त त्याचा एकच बहाना.. मोबाईलची एकच कांडी हाये …त कधी लाईनच नसते त्याच्या घरची.. लयच ईलबीस पोट्ट हाये बापा हे..
नीरा जीव कावला मायावाला. शाळेत बर रायते चांगल झोडपता येते.. नाई काय त डस्टर फेकून मारल असत या पोट्ट्याले… पाय अजुन आल नाई ते.. लयच डांबरट हाये ते…
तु काल कुठ होती व सुलु…आली अन दहा मिनटान गायब झाली.तुमाले त काई भेव रायलाच नाई.. उठल का पयाल..काय जमाना आला देवा.. बेज्याच मुजर झाले ना लेकर. अरे आमच्या जमान्यात काय मान राहे गुरूजीचा. दुरून दिसले का आमी दुसऱ्या गल्लीन पयत सुटो. मले शेळके सर होते त्यायचा काय दरारा होता शाळेत. सायकलीन यायचे.. बारा मईने छत्री सोबत राहे.. पांढरेशुभ्र कपडे.. टोपी.. शिकवायचे मस्त. शाळेत त धाक राहाचा मास्तर लोकायचा.. घरी आल्यावर बी तेच राये.. काई बी चुक झाली का .. बाप ..माय जोरात ओरडे … बोलवु कारे गुरजीले..मंग काय बसा लागे मुकाट्यान.. पन त्यायच्या धाकान आयुष्याच सोन झाल.. शिस्त लागली..चांगल वयन लागल.
गावात बी गुरूजीले लय मान राहे.. दहावी झाले लेकर का समोरच सबन काम गुरूजीच्या सल्ल्यान राहे.आता काय रायल बापा नीरा लेकरायच्या मनान घ्या लागते ..त्यायचाच भेव हाये आता.. तुमाले नाई समजत असे बोलत्यात.. आता त्यायले सबन सल्ले तो मोबाईलच देते.. माय बाप आता नीरा पैसे लावन्यापुरते हायेत बापा..
अव सुलु कुठ गेली होती काल सांग बर बाई…
गुरूजी … गुरूजी .. तीले भाऊ झाला न.. गन्या बोबंल्ला
गन्या तुले इचारल का म्या .. बस मुकाट्यान.
अन काव सुलु तुले आधीच तीन बहीनी हाये न..
हो.. गुरूजी आता चवथा भाऊ झाला.. घरात सबन लय खूष हायेत खासकरून आजी अन आई… आमच्याकड दुर्लक्ष सुरू हाये त्यायच.. आजी मले नीरा काम करासाठी आवाज देत रायते.. म्हणून मले ऊठा लागते.त्यायला अभ्यासाच काई बी महत्त्व वाटत नाई.. त्या दोघीसाठी ते पोरग लयच महत्त्वाच हाये आता… बाबा लक्ष ठेवत्यात आमच्यावर …माया वाटनीचे काम करू लागत्यात.
अरे देवा… सुलु तुया मायबापाले समोरचा काईच ईचार नाई काय..तुया बाप काय अंबानी हाये काय? घरात खायची सोय नाई.. कामधंदा ठप हाये.. मागच्या वर्षात पीक पाणी नाई झाल..तुया लहान बहिनीले शाळेचा डरेस नोता.. म्या घेऊन दिला होता..
चार लेकराले जगवन सोप हाये काय.. जुना जमाना गेला आता.. काई लोक हायेत बावा अजुन.. माना लागन बुवा त्यायले..
भीक मागाची पाळी आली त चालते पन पोरग पाहिजे बापा या लोकायले. सुलु तु त्यायच्याकड लक्ष नको देऊ ..साजरा अभ्यास कर..
हो गुरूजी … मले बी पोरी पोरापरीस कमी नसत्यात हे दाखवून द्याच हाये..नेटान अभ्यास करीन मी.
हा लेकाचा गन्या अजुन गायब झाला.
अन त्याचा जिगरी मित्र परशा दोघ बी…गायब हायेत आज.. ऊद्या लावतो दोघाची सोय..बीचारे मायबाप पोटाले चिमटा घेऊन चांगले भारीचे मोबाईल घेउन देत्यात अन हे लेकाचे उंडारत रायतात…
बाबा… बाबा… काय रे …पोरा….
आई म्हनते बस झाला आता तो कलास..गावात साडीचा सेल हाये कुठसा तीथ चालली आई अन तिच्या मैतरनी..
तुमाले तेवढे कपडे दोरीवर टाकाचे सांगुन गेली ते..
अरे काय म्याड खोपडीचा हाये तु अशा गोष्टी अरामात सांगा लागते..नीरा मायवानी बयाड हायेस लेका… तुयी माय त त्या मैतरीनपायी गेली वाया…लगलग फिरत राहते.
या रे पोट्टेहो येळेवर उद्या….
शब्दपर्ण साईटवरील इतर व-हाडी कथा वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा
https://marathi.shabdaparna.











online class ला व-हाडी तडका- हसून हसून पुरेवाट.
Chan
खूप हसवले.. ऑनलाईन वर्गाने छान
On line वर्गाची वर्हाडी मज्जा लई भारी, गुरुजी अन् गण्या तर आपला फेवरेट हाय .