सिनेमा -Aapki Kasam -आपकी कसम – ज़िन्दगी के सफ़र में
सिनेमा -Aapki Kasam -आपकी कसम – ज़िन्दगी के सफ़र में

सिनेमा -Aapki Kasam -आपकी कसम – ज़िन्दगी के सफ़र में

सिनेमा -Aapki Kasam -आपकी कसम – ज़िन्दगी के सफ़र में

1974 मध्ये आलेला नितांत सुंदर सिनेमा. जे…ओमप्रकाश यांचे दिग्दर्शन .. आर.. डी. बर्मन यांचे कर्णमधुर संगीत .आंनद बक्षी यांचे सुरेल गीते मनाला धुंद करतात. सतत तिचं गाणी कानावर गुंजन करत राहतात…त्या सुरात आंकठ भिजत राहावे.. अशी स्वरांची जादू.
ते स्वर सतत मनाला पावसासारखे चिंब…चिंब भिजवून टाकतात..
सुरात किती जादू असते ..ते कधी हसवतात तर कधी रडवतात…पण सहसा गाणे ऐकताना डोळ्यातील अश्रू गालावर कधी ओघळतात हेच कळत नाही.
आंनद बक्षी…गाण्याच्या जगातील प्रसिध्द नाव.किती तरी सुंदर …भावनाप्रधान गाणी त्यांनी लिहली.त्यांची गाणी कधी स्वप्नांच्या मायावी नगरीत घेऊन जातात… ते कळत नाही.

प्रेमात घेतलेले वचन..शपथा विसरून संशयाचे जाळे मनात जेव्हा घर करते तेव्हा सुखी संसार कसा उध्वस्त होतो याचे नितांत सुंदर चित्रन…

कमल एक स्वाभिमान असलेला युवक.आपल्याच विश्वात रमणारा.
अभ्यास करून चांगले काहीतरी करण्याची जिद्द
काॕलेज तरूणींच्या गळ्यातला ताईत. त्याचा भोळा..भाबळा चेहरा…
चेहऱ्यावर निष्पाप निरागस भाव..कुणीही त्याच्या प्रेमात पडावे..असा लोभस.

मुमताज…तिचे सौंदर्य काय वर्णावे..तिचा भावूक चेहरा.चपटे नाक…गोबरे गाल…कपाळावर रूळणारी केसांची बट ..पुरूषांना नक्कीच घायाळ करत असणार.
जय..जय..शिव शंकर गाणे गात असताना तिची तिरकी..मादक चाल..तिचे लडखडने…डोळ्यावर धुंदी..तिचे..अल्हड..अवखळ हास्य….बघतच राहावे.

किती लोकांच्या काळजात आजही सलत असेल.

आपल्या सुंदर अभिनयाने सुनीता छान रंगवली.. किती सुंदर रंग भरले.. लाडावलेली मुलगी. थोडी जिद्दी हट्टी. पण प्रेमात पडल्यावर त्याला सर्वस्व अर्पण करणारी. कमलच्या प्रेमात स्वतःला हरवून बसते.घरी श्रीमंत..घरापासून दूर होस्टेल मध्ये शिकायला असते.

मोहन कमलचा खास मित्र .. राहतो शेजारीच.हसरा खेळकर..भरभरून आयुष्य जगणारा..सतत दुसऱ्याला आंनद देणारा.स्वतः मात्र ओझ्याखाली दडपलेला.. लग्न झालेला पण ते फक्त नावाला ..बाकी त्या नात्याला प्रेम जिव्हाळा काही नाही.बायको श्रीमंत घरातील.घरात त्याला काही किंमत नाही. पण त्याचे दुःख त्याची यातना..कधीच कुणाला कळत नाही.
तो का हे सारे सहन करतो हे शेवटपर्यंत कळतच नाही.संसार टिकून रहावा ही
त्याची केविलवाणी घडपड चालू राहते..त्याचा काही अपराध नसतानाही केवळ वडिलांनी दिलेला शब्द तो पाळत राहतो.
कमलला जेव्हा त्याचे दुःख उमजते
तेव्हा मोहनचा निर्विकार चेहरा…त्याची काळजातील सल चेहऱ्यावर उमटते. कुठेही त्रागा नाही..भांडण नाही.. शांत..सागरासारखा…कमलला आश्चर्य वाटते.. मोहन शून्यात बघतो.

गम दो तरह के होते है
एक मिल जाते है…
और दुसरा ले लेते है…
मुझे मिल गया
और तुमने ले लिया…
तेव्हा त्याचा कातर आवाज
ह्दय पिळवटून टाकते.

सिनेमाची सुरूवात कमल आणि सुनीता यांच्यातील लाडीक भांडणाने होते..पण दोघे कधी मनाने गुंतले जातात त्यांना कळत नाही..प्रेमाचा बहार सुरू राहतो…
प्रेमात आंकठ डुबलेले दोन जीव….
प्रेमाच्या प्रांतात सर्वस्वी हरवलेले…दोन प्रेमी…
आयुष्यात एकही क्षण दुरावा नको म्हणून लग्नाच्या
पवित्र बंधनात अडकवून घेण्याची ..घाई करतात.
कुठेही विरोध नाही…सर्व ..सोपे..सहज
मुलीला दुखवायचे नाही ..या मतावर आई…वडील ठाम.
स्वप्नांच्या जगात दोंघाचा विजय होतो.आंनदाच्या डोहात स्वप्ने तरंगत राहतात.
कुठे तरी दूर …
करवटे बदलते रहे
सारी रात हम
आपकी कसम

दोघे सुरात…सूर ..आवळून गातात

गालावरची खळी…अजूनच खुलायला लागलीय.
सुखाचा संसार सुरू असतो. टिपूर चांदणे सुखाचा वर्षाव करत होते.आणि अचानक भरल्या संसाराला जणू दृष्ट लागली..सुनीता..मोहनचे मोकळे हसू …कमलला असह्य
होऊ लागले..नकळत संशयाचे बीज मनात दाटू लागले..
त्या जाळ्यात तो पूर्ण अडकला… तो त्यातच कैद झाला.

सुनीताला त्याचे वागणे अनपेक्षित वाटते पण कमलच्या प्रेमात बेधुंद झालेली सुनीताला काही कळतच नाही.ती दुर्लक्ष करते.त्याचा रूक्षपणा… वाढत चाललेला…तिला काहीच कळत नाही.
समुद्राच्या तळातून एखादी बेधुंद लाट ..किनाऱ्यावर येण्यासाठी आसुसली ..पण मध्येच तिने माघारी परताव असेच काहीतरी सुरू राहते .
त्याचा संशयी स्वभाव आता हळूहळू उग्र रूप धारण करत असते….संसाराचा मृदगंध ..संपल्यात जमा असतो.
स्पंदनाचा आवाज हवेत विरत होत जातो.
मनातील कल्लोळ ..बाहेर तिच्यावर निघू लागला.. मनात संशयाने घर केलेले.
मोहन…सुनी

7 Comments

    1. PRAVIN DANI

      खुपच सुंदर बोलके व अप्रतिम समीक्षण आपकी कसम १९७४ चं …ज्योती बेन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!