मौसम ( ऋतु ) नेहमी बदलत राहणारा.
आपले आयुष्यही तसेच अस्थिर.मौसम सारखे बदलत जाणारे.
गुलजार दिग्दर्शित १९७५ साली आलेला मौसम.संजीवकुमार,शर्मिला यांचा अभिनय,मदन मोहनचे संगीत.
सिनेमाची कथा गाणी आणि गुलजारची.
दिल ढूँढता है…..हे गाणे सिनेमात दोनदा दाखवले.
एकदा लता आणि भूपिंदर सिंगने गायले आणि एकदा एकट्या भूपिंदर सिंगने. एकट्या भूपिंदर सिंगने गायलेले गाणे मनाला जास्त भावते.
जवळपास पंचवीस वर्षांनी दार्जीलिंगला आलेला नायक ह्या गाण्यात पंचवीस वर्षापूर्वीचे दिवस शोधतांना दिसतो. (तसव्वुर ए जाना – प्रेयसीची आठवण(खयाल)
पंचवीस वर्षापूर्वी चंदाच्या प्रेमात पडलेला अमरनाथ पंचवीस वर्षानंतर तिच्यासोबतच्या आठवणी कुठे सापडतात का ते शोधण्याच्या प्रयत्न
प्रेयसीसोबत घालवलेले ते क्षण फिरुन आयुष्यात कसे येणार?
पण त्याचे अंतःकरण तेच आनंदाचे क्षण वेचायला बघते.
उन्हाळ्यातील ती उन्ह आणि कोवळ्या उन्हात अंगणातील झाडाखाली तिच्या पदराची सावली डोळ्यावर ओढून पडून राहणे,(कल्पनाच किती मोहक)
रात्रीची वेळ, वर आभाळाकडे बघत चांदण्या बघत राहायचे दिवस विरले आता.
पहाडावर सगळीकडे बर्फ पडलेला,बाजूला असलेली दरी,त्या निर्जन वातावरणातील स्तब्धता. निःशब्द उदास शांततेचा आवाज ऐकत राहणे
आणि अश्रुंनी भिजलेले आठवणीतील क्षण घेऊन अमरनाथचे मन ते
निवांत दिवस शोधत आहे.
गुलजारचे गाणे,त्याची शब्दरचना गाण्याचे शब्द अंतःकरणाचा ठाव न घेतील तरच नवल.
दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए
दिल ढूँढता है…
जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर
आँखों पे खींचकर तेरे आँचल (दामन) के साये को
औंधे पड़े रहें कभी करवट लिये हुए
दिल ढूँढता है…
या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए
दिल ढूँढता है…
बर्फ़ीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए
दिल ढूँढता है…
पूर्ण गाण्यात अमरनाथ बनलेला संजीवकुमार जंगलभर चंदाच्या(शर्मिला) आठवणी शोधत अस्वस्थपणे भटकत आहे. पण आठवणीतील चंदा आता फक्त आठवणीत असणार आहे.










Wah
खूप छान
खुप छान !हा मूवी पण खुप छान आहे
Wahh