स्त्री कथा-निरंतर हास्य
स्त्री कथा-निरंतर हास्य

स्त्री कथा-निरंतर हास्य

स्त्री कथा-निरंतर हास्य

 

“काय ग परी?”.
“अग तु थकून गेली असशील नं?”.
हो…! ग रात्र भर जागरण
मी तर रात्रभर डाॅक्टर लोकांची नर्सची धावपळ बघत असते.रेवा…आताच दवाखान्यातून घरी आली.पंधरा  दिवस झाले अमीतला भरती  करून …. पण पाहिजे असा आराम नाही.

कसा आराम वाटेल इतक्या लवकर?.
गंभीर मार बसला होता डोक्यावर. पूर्ण शरीर रक्तबंबाळ झाले होते.
फोन आला आणि एकच गोंधळ सुरू झाला. पैशाची सोय….कशीबशी करावी लागणार होतीच.

आई…! आई…! परी ओरडली.

“देवदूत आहेत ते सर्वांसाठी”.
आई आज पण जाणार का ?
अग हा काय वेड्यासारखा प्रश्न?
आटोपून घे लवकर , तुला सोडून मी जाईल काॕलेजला.
परीने रेवाला दवाखान्यात सोडून दिले.
चल परी…”अग बाबांना दुरूनच बघ”. न ऐकताच परी निघून गेली.
रेवा बघतच राहिली….!.
अमीत झोपून होता. चेहरा कालच्या मानाने बरा दिसत होता. हळूहळू होईल सर्व ठीक…रेवा मनातल्या मनात पूटपूटली. अमीतच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता जणू रेवाच्या चेहऱ्यावर दिसू लागली.
“अहो… मॕडम.. आज साहेब बरे आहेत…!”.
मावशीने आवाज दिला.
काही दिवसातच सुट्टी होईल.
हो…का ..मावशी… अग हा सर्व तुमच्या सेवेचा असर आहे.
किती सेवा…रात्रभर जागरण.
काय हवे…काय नको, किती मायेने केले तुम्ही आणि डाॅक्टरने.
हो…ग रेवा…अग ज्या दिवशी अमीतला भरती केले त्या दिवशी तो रात्रभर बडबड करीत होता.
“सारखा आशू…गोलू… हीच नावे घेत होता…मध्ये एकदा त्याने सुमती हे नाव पण घेतले”.
सकाळ झाली आणि मग तो शुध्दीवर आला.
रेवाच्या काळजात धस्स झाले…अंगाची लाही…लाही झाली. किती निष्ठूर झाला अमीत.
इतका कसा बदलला तो, “ताटात पडलेली माशी कुणी अलगद काढावी तसे त्याने मला….मुलांना त्याच्या आयुष्यातून काढून फेकले”.
“काय दोष आमचा?”.
सुखाचा संसार सुरू होता.
काय नव्हते संसारात …फुलांचा सुंगध होता. सर्वत्र मोगरा बहरला होता..सुखाने घर भरले होते.
आंनदाने विहरत होतो आम्ही. चोहीकडे फक्त फुलांचे ताटवे, दुःखाला थारा नव्हता. पैसा होता कमी..पण काही फरक नाही पडला “प्रेमापूढे त्याच मुल्य तरी किती ?”. आणि जगायला अमाप पैसा लागतो असे थोडीच आहे…”कमी पैशात नीटपणे संसार करतच होती मी.
सर्व इच्छा अपेक्षा मनात ठेवून”.

रेवा… मावशीने आवाज दिला ….ती जणू शुध्दीवर आली.
अग सुमती नाही आली अमीतला बघायला?
रेवा बघतच राहिली. “तुला सोडून अमीत तिच्याकडे राहतो का ग?”.
“मावशी हे सारे तुला कसे कळले ?”.
रेवा 30 वर्षे झाली ..खूप लोक बघितली.
मला दुसऱ्या दिवशीच सर्व लक्षात आले.
तुझे त्याच्यावरील वेड्यासारखे प्रेम बघून मी काही विचारले नाही. तुझी धावपळ ..देवाला घातलेले साकडे..चेहऱ्यावर दिसणारे दुःख.. सगळे कळले होते मला.
मावशी खरे आहे तुमचे…ऐका क्षणाला मलाही काही कळलेच नाही. मुले तर सोबत येण्यासाठी पण तयार नव्हते.
त्यांना सर्व कळते आता मोठी झाली.
दहा वर्षापूर्वी तो आम्हाला सोडून सुमती कडे राहायला गेला तेव्हा मुले लहान होती. परी तर सारखी रडायची. नंतर तर ती आजारी पडली. मी तिला कसे त्यामधून बाहेर काढले माझे मलाच माहिती. अमीतला तर कशाचीही पर्वा नव्हती. बेभान झाला होता तो. आमचे सर्व पाश सुमतीच्या प्रेमात त्याने कापून टाकले.
अमीत तिच्यासाठी वेडा झाला होता. ती विधवा पदरात दोन मुले
तिला आधार हवा होता.

पण अमीतला तर माझा भक्कम आधार होता तरीही तो भरकटला..त्याने तिच्यासोबत तिच्या मुलांचा स्वीकार केला.
मी रडली..पडली पण तो ठाम होता.
“तुटलेल्या मनाच्या ठिनग्या मी तरी काय सांभाळनार ?”.
मी त्याला सर्व बंधनातून मोकळे केले. माझ्या आयुष्यातून त्याच्या सर्व पाऊलखूणा नाहीशा केल्या मी. हळूहळू मुले मोठी झाली..त्याचा राग करू लागली.
मी मात्र अधांतरी …
त्याच्यावर अजूनही तसेच निष्पाप प्रेम. मी नाही विसरू शकली त्याला.
“तो विसरला असेल का ?”.
“कधीतरी ओठावर माझे नाव येत असेल का?”.
कितीतरी अनुत्तरित प्रश्न…घरातील छोटा…मोठा निर्णय घेणारा अमित इतका चुकीचा निर्णय घेऊ शकतो. याचे तर …
मला आजही नवल वाटते. भावनेने घेतलेले निर्णय चुकीचा असूनही तो आंनदी होता.
मध्ये दोनदा येऊन गेला…शेती विकायची होती त्याला पण नाही विकू शकला.
त्याच्या आजीची शेती होती.
त्यांची शेवटच्या काळात मी खूप सेवा केली होती.
म्हणून….!
आजीने ती शेती माझ्या नावावर केली होती.
“अमीतचा डोळा होता त्या शेतावर”. त्याला वाटले मी सहजच सही देईल …पण तसे झाले नाही.
रागाने निघून गेला.
“त्याने आखून दिलेल्या चौकटीत मी जगले पण बस झाले आता”.
“मी पण निर्णय घेऊ शकते”.
त्यानंतर तो आला नाही…अपघात झाला तेव्हा कुणाचातरी फोन आला. मी सर्व विसरून वेड्यासारखी धावत आली. “सुमती कशी येणार ..लोक काय म्हणतील ही भिती..नातेवाईक आपला किती राग करतात हे तिला कळत होते”.
तिला त्याचा फक्त पैसा हवा..जबाबदारी नको.

रेवा…तिकडे बघ डाॕक्टर येत आहेत… मावशीने तिला भानावर आणले.
अहो मॅडम, “तुमच्या पतीला उद्या सुट्टी होणार आहे डाॅक्टर हसत बोलले”.
रेवा उगीचच हसली.
दिवस उजाडला …अमीतला सुट्टी झाली.
दोघे गेटजवळ आलीत..
आता पुन्हा दोघांच्या वाटा वेगवेगळ्या होणार.
“कुठे सोडायच तुम्हाला?” रेवाने विचारले.
कुठे जाणार मी?
मला आता तुमच्या सोबत राहायचे.
पण मुले काय म्हणतील ?.
मी कदाचित तुम्हाला माफ करेल पण मुले …शक्यच नाही.
रेवा… अशी नको म्हणू ग.
“करतील ते मला माफ”.

मुले अमीतला टाळायचे पण रेवाने तर दिवस..रात्र त्याची सेवा केली. तब्येत चांगली झाली. दोन…तीन वेळा त्याने शेती विकण्याचा विचार रेवाला सांगितला पण तिचा नकार होता.

रेवा खूष होती…नियतीने तिला तिचा अमीत परत दिला.
काहीतरी निमित्त पाहिजे होते एकत्र येण्याला.
कालच कामवाली म्हणत होती
बाई, “तुमी लय नसीबवान…देवान तुमच सौभाग्य तुमाले वापस केल”. रेवा हसली..!

अमीत चालू… फिरू लागला…बाहेर जाऊ लागला.एक दिवस उशीरा आला.
रेवा वाट बघत होती.
रेवाने त्याची बॅग त्याच्या हातात दिली.
अमीत …मी मूर्ख होती रे..तुझ्यावर किती विश्वास ठेवला. तोच डाव पुन्हा खेळला.
फक्त शेतीसाठी …नाटक केले…चालता हो इथून ..काल मी तुझ्या मागेच होती.. तु सुमतीच्या घरात होता..आता पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नको…चुकले मी विश्वास ठेऊन. अमीत निघून गेला.

रेवाला काही सुचत नव्हते …ती पेटुन ऊठली. स्वतःचे अस्तित्व शोधू लागली. आतापर्यंत एखाद्या वेलीसारखी अमीतमध्ये गुंतलेली होती. पण आता बस…
शेती विकली. हाॅटेल टाकले. स्वयंपाकाची खूप आवड.
जिद्द ठेवली…
आता ती नव्याने जगत आहे…स्वच्छंदी…आंनदी.
जुन्या पाऊलखूणा केव्हाच
पायदळी तुडविल्या कळलेच नाही.
आता “निरंतर हास्य उधळायचे आयुष्यात वेल बनून नाही…तर वटवृक्ष सारखे राहायचे”.
“जो कधीही झुकणार नाही”.

ज्योती रामटेके

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

5 Comments

  1. Parvin Dani

    खरचं कडु गोड आठवणींचे रेवाचे सुंदर व्यक्तीचित्र रेखाटले ….वेला पेक्षा वटवृक्ष खुपच महान व भक्कम असतो हे प्रत्येक भारतीय स्रि ला जेव्हा उमगेल नं तेव्हा ह्या भारताचे नंदनवनचं होईल बघं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!