पावसातील थरार
पावसातील थरार

पावसातील थरार

पाऊस कथा क्र.2
पावसातील थरार
आज सकाळपासून पाऊस पडतच होता. कधी जोरदार तर कधी रिमझिम, थोडावेळ उघडायचा पण खूप मोठी उघडीप अशी काही नव्हती.
अभय आणि दिपाली शासकीय निवासात राहत होते. दिपाली फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये सेवेत होती. तर अभय BSF मध्ये कार्यरत होता. 6 महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. दिपालीला मिळालेल्या निवासस्थानी ते राहत होते.ते घर जंगला जवळ होते.
तशातच पाऊस सुरू झाला होता. त्यांच्या दृष्टीने ही तशी रोमँटिक पर्वणी होती.
ते दुपारीच बाहेर पडले होते. छान भिजून, गरम चहा घेऊन, ते भटकंती करत होते. तसे निमित्ता पुरतेच काहीतरी काम हातात घेऊन निघाले होते. पण ते तेवढ्या पुरतेच. बाकी मूळ हेतू पावसात छान, रोमँटिक भटकंती करणे, एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणे हाच होता.दुपारी उशिरा भुकेची जाणीव झाल्यावर त्यांनी एका छोट्या झोपडीवजा हॉटेल मध्ये भाजी भाकरी वर ताव मारला, आणी परत जंगलाच्या दिशेने गेले.
रात्र झाली तसे ते घराकडे परतु लागले.
दिपाली सध्या वाघ आणि बिबट्या यांची गणना करण्याच्या कामात होती. त्यामुळे तिला जंगलात खूप फिरावे लागायचे. तिला वाघांच्या अणि बिबट्यांच्या पाणी पिण्याच्या, लपण्याच्या जागा माहीत होत्या. ते परत येताना अशाच एका ठिकाणापासून जात होते, दिपाली म्हणाली, चल तुला वाघ, बिबट्या दाखवते, दोघेही तरुण, अणि उत्साही, त्यामुळे तो ही असे धाडस करायला तयार होताच.
ते सावधगिरी बाळगून हळूहळू पुढे सरकत होते.ते योग्य त्या ठिकाणी येऊन थांबले आणी निरीक्षण करू लागले. दिपालीच्या माहिती नुसार तिथे दोन तरी बिबटे असायला पाहिजे होते. अभय म्हणाला, तुझ्याकडे service revolver, अथवा तसे कोणतेही हत्यार नाही जर आपल्यावर बिबट्याने हल्ला केला तर गंभीर प्रसंग ओढावेल. तसे ती मिस्कीलपणे म्हणाली, अरे तू तर मिलिटरी चा असून घाबरायला लागला, कसे होणार देशाचे!!!!!
ते खूप वेळ तिथे थांबले पण बिबट्या काही दिसला नाही, पाऊस ही खूप जोरात सुरू झाला. वातावरण तसे खूप भितीदायक झाले होते. त्याने तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला ती कसली घाबरते….पण त्याचा रोमँटिक मूड तिच्या लक्षात आला….ती ही त्याला बिलगली घाबरण्याचे नाटक करून!!! पानातून पडणारे पाणी चेहर्‍यावर घ्यावे म्हणुन तिने तोंड वर केले…..तर भीतीने खरच तिची गाळण उडाली…..वर बघताच 2 बिबट्याचे 4 डोळे अंधारात एकदम लकाकले, तिने त्याला लगेच सावध केले, दोन्ही बिबटे त्यांच्या अंगावर झेप घेण्याच्या तयारीत होते. त्यांच्या झाडीत हे शिरले होते त्यामुळे बिबट्याला ते शिकारी वाटले अणि म्हणुनच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
दोघे ही सावध होण्याच्या आत बिबटय़ाने त्यांच्या अंगावर झेप टाकली.
दोन बिबटे अणि दोन माणसे यांचे समोरासमोर युद्ध!!!!! कितीही प्रशिक्षित असली तरी माणसेच ती….घाबरणारच,
पहिली झेप तर त्यांनी चुकवली,……आणि एकमेकांपासून लांब गेले, एकेका बिबट्याने एकेकाला सावज केले, त्यांच्या डरकाळ्या जंगलात घुमू लागल्या, झेप चुकवताना ते पडले होते त्यावेळेस त्यांच्या हाताला तिथलेच एक दांडके लागले….ते घेऊन त्यांनी प्रतिकार सुरु केला, दांडक्याचा धाक दाखवत बिबट्याला दूर ठेवत होते…..आणि गोल पाउले टाकत होते, त्यामुळे ते परत एकमेका जवळ आले,
आता दांडक्यासह हे दोघे एका बाजूला आणि दोन बिबटे समोरच्या बाजूला अशी आमनेसामने गाठ पडली, बिबट्याने परत एक दोनदा झेप टाकल्या पण ह्यांनी त्या परतवून लावल्या, एकवेळ ह्यांना वाटले की आपण आता वाचू शकतो….पण तितक्यात घात झाला….पायाखाली…एक मोठा नाग फणा काढून उभा!!!!!
आता 3 vs 2 असा सामना होणार होता….नाग नक्की कुणाचा शत्रू????? बिबट्या चा की माणसाचा????
हे दोघे…मध्ये नाग….त्यापुढे बिबट्या….असे चित्र होते,
दिपाली जोरजोरात ओरडत हाका मारत होती…काही मदत मिळवण्यासाठी, पण त्या हाका पावसाच्या आवाजात हवेतच विरून जात होत्या….नागाला टाळत एक बिबट्या 2 पाउले पुढे आला…..अभय ने ही त्याच्या वर दांडके उगारले…बिबट्याने जीव खाऊन झेप टाकली.अभय ने प्राणपणाने त्याच्यावर दांडक्याचा प्रहार केला.पण नशीबाचे फासे उलटे पडले.नेमकी झाडाची एक फांदी आड आली अणि बिबट्याला घाव बसला नाही….तिथेच नियतीने डाव साधला.बिबट्या ने अभय ला गाठले.त्यावर पंजे मारू लागला….निःशस्त्र अभय किती वेळ तग धरणार…..हे पाहून दिपाली त्याच्या मदतीला धावली, पण तिचा पाय नागावर पडला…..तसा नागाने तिला चावा घेतला, ती त्याच क्षणी मुर्च्छित होऊन पडली.
इकडे बिबट्याने अभय चा गळा घोटला होताच, आणि तिकडे नागाने दिपाली चा…..

सकाळी वन कर्मचारी ज्यावेळेस राऊंड वर आले त्यावेळेस त्यांना ह्या दोघांचे मृतदेह आढळून आले…..सोबतच झटापटीच्या खुणाही….त्यावरून त्यांनी काय झाले असेल याचा अंदाज बांधला…

पण आता काही उपयोग नव्हता…एक तरुण जोडपे…..जंगली श्वापदांच्या भक्ष्यस्थानी पडले होते…..
चूक नक्की कोणाची होती?????

वैशाली जोशी खोडवे

(तुम्हीही तुमचे लिखाण marathi.shabdaparna.in साईटवर  वर पाठवू शकता.)

12 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!