तृष्णा
भाग-१२
आई बनणार…या कल्पनेने मोहरलेली तृष्णा,बाळ येणार म्हणून जबाबदार बनलेला सखा…हे सुखद चित्र असेच राहते कि…..
भाग-१२
विजय आज लवकर आला,सोबत वांगी घेऊन आला.
साहेब आज लवकर आलो.आज बनवू स्वयंपाक इथे.
सोबत त्याने आवश्यक भांडी आणि स्टोव्ह आणला.
स्वयंपाक घरात तृष्णाची भांडी होती,
काही भांडी वापरण्यायोग्य होती.ती अमोलने स्वच्छ केली.तृष्णाची परात,पोळपाट,चम्मच,कढई होतेच.विजयने आणलेली भांडी त्याने तशीच ठेवली.
परातीवर नाव होते कमलकडून चि.सौ.का.तृष्णास सप्रेम भेट.दिनांक मिटली होती.तृष्णाच्या लग्नात आलेली भांडी होती सगळी.अमोलने विजयने आणलेली कणीक परातीत काढून मळली. विजयला त्याने पोळ्या बनवायला सांगितले.तृष्णाचा तवा जंग लागलेला होता.त्याने विजयने आणलेला तवा घेतला.पोळ्या बनवल्या.भाजी अमोलने बनवली. आईकडून बराच स्वयंपाक तो शिकला होता.
दोघांनी जेवण केले.
झोपण्याआधी अमोलने बाबांना फोन केला.
अमोलबेटा दोन तीन दिवसात खरेदी करुन परत ये.
बाबा मी बोललो सकाळी काकांसोबत.
त्यांना घर विकायचे नाही असे सांगितले.
का? का असे बोलला? तू घर विकण्यासाठीचा गेला तिथे.
घर विक आणि परत ये लवकर.
बाबांच्या आवाजात जरब होती.
बाबा मी बाहेर शिक्षण घेण्याचा विचार सध्यातरी काढला डोक्यातून.ज्याच्यासाठी घर विकायचे होते ते कारणच संपल्यावर का विकायचे घर?
अमोल तिथे कोणी राहणार नाही.एवढ्या वर्षात आपण गेलो नाही तिथे.उगाच काय करायचे ठेवून.
बाबा मी काही दिवस राहणार इथे.
अरे तू काय बोलतोस?तुला तिथे कोणती नौकरी मिळेल?
तू ये इथे.आपण ठरवू मग घराबद्दल.
बाबा काही दिवस थांबून येतो.
आता मि.जाधव चिडले.
अमोल तिथे काहीही नाही.तू उद्याच परत यायला हवा.
अमोलने फोन ठेवला.
दिवसभर थकलेला विजय लवकच झोपला.अमोलही झोपायला गेला.
खोलीमधले कपाट अजून त्याने उघडले नव्हते. उद्या ते साफ करायला हवे असा विचार करत तो बेडवर आडवा झाला.
तृष्णा कुठे असेल? तिचे बाळ? हा विचार रोज झोपण्यापूर्वी त्याच्या डोक्यात यायचा.
आता दोनच कॕसेट बघायच्या बाकी होत्या. त्या दोनमध्ये काय असेल?
त्या बघितल्यावर तृष्णाचा शोध लागेल का?
विचार करत अमोल झोपला.
आता अमोलला ह्या गावात नवखेपणा वाटत नव्हता.खूप आधीपासून तो इथेच राहतो असे त्याला वाटत होते.
बाजूचे काका आता घराबद्दल काहीही विचारत नव्हते.
आईबाबा ,अमोली,मुक्ता तो लवकर यावा म्हणून त्याच्या मागे लागत होते.
अमोल बाबांना तुम्ही एकदातरी या बाबा इथे असे सांगायचा.
मध्ये दोन दिवस विजयबरोबर जवळपासची चांगली ठिकाणे फिरुन आला.
दोन दिवसांनी तृष्णाची कॕसेट लावली.
तृष्णाच्या शुटींगचा वेग मंदावला होता. आता आठवड्यातून एकदा शुटींग करत होती.
सखा काळजी घेत आहे माझी पण सतत कसले तरी दडपण वाटते त्याला.काय असेल?
विचारले तर काही सांगत नाही.पण काहीतरी कारण आहे.
लग्न झाल्यापासूनच मला हे जाणवत आहे.त्याच्या वागण्यात कधीच मोकळेपणा नसतो.काय कारण असेल? नवीन लग्नाची ना नवलाई दिसली चेहऱ्यावर ना येणाऱ्या बाळाबद्दलचा उत्साह.
मध्ये सखाबरोबर नदीवर गेले होते. नदीकाठी खेळणारी लहान मुले बघून मी आणि सखा बाळाबरोबर इथे येण्याचे स्वप्न दिसले. मी आई होणार ही कल्पनाच मला स्वर्ग सुख देत आहे.
मी जरा आहेच स्वप्नाळू.
रात्री झोपेत कमी आणि दिवसा जास्त स्वप्न बघणारी.सखा रात्रीही स्वप्ने न बघणारा
आईला आजी होणार असल्याचे सांगितले.
कोण आनंद झाला तिला स्वतःच मला भेटायला येते म्हणाली. सखाला सांगितले.त्याला का कुणास ठाऊक आईचे येणे आवडले नाही.
तृष्णा आपणच जायचे का आईला भेटायला?
पण आता अशा अवस्थेत जायला मी नाही म्हणाले.
तृष्णा— आवाज आला.
कविता आली बहूतेक तृष्णाने शुटींग घाईघाईने बंद केले.
थोड्यावेळाने कॕसेट पुन्हा सुरु झाली.
खूप दिवसांनी आज शुटींग करतेय,
आई आली होती. आठ दिवस थांबली. मला बऱ्याच सुचना दिल्या.खूप खाऊपिऊ घातले.
पण सख्याचे वागणे तिला खटकले.
एकदा दुपारी जेवतांना
जावयाचे मन संसारात कमी दिसते तृष्णा….आई म्हणाली.
त्यांचा स्वभावच तसा आहे आई.
आॕफिसमधूनही उशिरा येतात. दुसरी एखादी स्त्री तर नाही त्यांच्या आयुष्यात.
माझ्या तोंडातला घास तोंडात राहला.
हा विचार कधीही माझ्या मनाला शिवला नव्हता.
आई परत गेली.सोबतीला माझी काळजी घेऊन गेली.
फोनवर बोलते तेव्हाही माझीच काळजी.
तृष्णा मी मुलाची खोलात चौकशी करायला हवी होती.
एकुलता एक.तुला जबाबदारीची,कामाची सवय नव्हती म्हणून हे स्थळ योग्य वाटले होते.पण माझा निर्णय बरोबर नव्हता बाळा.
आईचा आजी होण्याचा आनंद इथे आल्यानंतर कमीच झाला.
क्रमशः
तृष्णाच्या आईला आलेला संशय खरा असेल का? वाचा पुढील भागात
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.






कोण असेल तृष्णा, उत्सुकता कायम