जीवनाचे गणित मोठे विचित्र आहे.
आपण ठरवतो एक आणि होते भलतेच.मनाप्रमाणे ,ठरवल्याप्रमाणे अपेक्षित फासे पडत गेले तर …याहून चांगले काहीही नाही.पण फासे उलटे पडले तर….. ‘उलटे पडले फासे’ तीन मित्रांची ही कथा वाचकांना आवडेल ही अपेक्षा.
१-उलटे पडले फासे
मानकर सर आले. सरांचा दबदबाच असा कि त्यांची गाडी पोलिसस्टेशनच्या आवारात आल्याबरोबर सगळीकडे शांतता पसरायची. पोलीसखात्यात निस्पृह आणि प्रामाणिक इन्सपेक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.
त्यांच्या चालण्यात,बोलण्यात वर्दीचा रुबाब,अभिमान आणि दरारा जाणवायचा.
अरे साळूंके आज कोणकोणत्या केसेस आहेत?
सर काल तुम्ही सुट्टीवर असल्यामूळे दोन दिवसात भरपूर केसेस जमा झाल्या.
बरं आधी कालच्या केसेस दाखव.
अरे बापरे! किती केसेस एका दिवसात?
फार गुन्हे वाढताहेत हल्ली.
सर चिंतेच्या स्वरात बोलले.
आणि साळूंकेने टेबलवर ठेवलेली फाईल बघायला लागले.
फाईलवर असलेल्या एकेका नावावर नजर टाकता टाकता एका नावावर त्याची नजर थबकली.
विनय मनोहर मोरे
एकवार परत त्यांनी वाचले.
इन्सपेक्टर राहूल मानकरची नजर खिळवणारा विनय मनोहर मोरे कोण होता?
भराभर सगळ्या नावांवर पाच मिनिटात नजर फिरवणारे मानकर सर नजर पाच मिनिटे एकाच नावावर नजर रोखून आहेत हे बघून साळूंकेलाही आश्चर्य वाटले.पण सरांच्या धाकामुळे तो चुपचाप उभा राहून बघत होता.
साळूंके
मानकर सरांच्या विचारमग्न चेहऱ्याकडे बघत त्याने विचारले.
काय सर?
ही विनय मनोहर मोरेची काय केस आहे?
इथे बाजूला चोरी आणि खून लिहून आहे.
हो सर.
मोठी चोरी केली त्याने.एका कुलुपबंद असलेल्या घरातून दहा लाखाचे दागिने लंपास केले.
अरे पण कसे शक्य आहे?
सर त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला.
पण हे निव्वळ अशक्य आहे.विनय असे करणे शक्य नाही.
सर तुम्ही ओळखता या चोराला?
साळूंके चोरी सिद्ध झाली नाही अजून.
मानकर सर दरडावणीच्या सुरात बोलले.
sorry सर.साळूंके वरमत बोलला.
मानकर सरांच्या डोक्यात पुन्हा विचारांची आवर्तने सुरु झाली.
विनय आणि चोरी .मी मनात विचारही आणू शकत नाही. एकाच नावाचे दोन व्यक्ती असतील का? पण तिनही नावे जूळत आहेत.
त्याचा फोटो बघतो परत.असे मनाशी बोलत पुन्हा मानकर सरांनी फाईल हातात पकडली. एवढ्या वर्षात खूप बदलला असेल. कसा ओळखू येईल?
हं आठवले.त्याच्या दोन्ही भूवया जूळलेल्या होत्या आणि उजव्या गालावर मोठा तीळ होता.त्याने घाईघाईने फोटो काढून बघितला. सरांना आठवलेल्या दोन्ही गोष्टी फोटोत होत्या. फोटोतल्या विनयच्या भूवया जुळलेल्या होत्या आणि गालावर तीळ होता.
सर विचार करायला लागले.एवढ्या सगळ्या गोष्टी जुळताहेत म्हणजे….
नाही नाही.आमचा आदर्श असलेला विनय असा कसा करेल?
साळूंके बारकाईने सरांचे निरीक्षण करत होता.
कोणीतरी खास माणूस दिसतोय हा विनय…असा विचारही त्याच्या डोक्यात येत होता.
मानकर सर विचारात गढले होते.
विनय मनोहर मोरे
प्रामाणिकपणाचे उदाहरण असलेला विनय असे नाही करु शकणार.नाही मुळीच नाही.परत त्यांनी नाव वाचले.
कितीदाही वाचले तरी नावात बदल होत नव्हता. आणि फोटोवरील खुणाही तशाच होत्या.
विनय मनोहर मोरे.
पुन्हा एकदा चष्मा काढून व्यवस्थित पुसला परत लावून नाव वाचले तरीही तेच नाव.
आता मानकरसरांची खात्री झाली.हा विनय तोच -माझा आणि मनिषचा मित्र,मार्गदर्शक. आमच्या जीवनाला दिशा देणारा.
विनय असे कसे वागू शकतो?
पाच मिनिटे मानकर सर तसेच बसून राहिले.
त्यांना मनिष ठाकरेची तीव्रतेने आठवण झाली.
मनिषशी बोलावेच लागेल. ते मनात पुटपुटले.
मानकर सरांनी घाईघाईने फोन उचलून नंबर डायल केले.
हॕलो मनिष
आज संध्याकाळी भेटतोस का? अर्जंट आहे.
अर्जंट असेल तर सांग ना फोनवर…समोरुन आवाज आला.
नाही नाही फोनवर नको.भेटल्यावरच सांगतो सगळे.
आता मात्र साळूंकेचे डोके चक्रावले.
खाजगी कामासाठी आॕफिसचा फोन कधीही न वापरणारे मानकर सर आज चक्क त्या फोनवरुन बोलत आहेत…..नक्की काहीतरी भानगड आहे.
साळुंके
सरांच्या आवाजाने साळूंकेचे डोके जाग्यावर आले.
काय सर?
आजची फाईल कुठे आहे?
साळूंकेने फाईल पुढे केली.
मानकर सर पटापट फाईलवरुन नजर फिरवत होते. मानकर सरांची नजर फाईलवरुन फिरत होती.पण डोळ्यासमोर एकच नाव येत होते.
विनय मनोहर मोरे.
मानकर सर
साळूंके काही अर्जंट असेल तर फोन कर
असे सांगत पोलीसस्टेशनमधून लवकरच बाहेर पडले.
मनिषला जिथे भेटायला बोलवले तिथे गेले.
मनिष ठाकरे शहरातील नावाजलेले वकील मानकर सरांची वाटच बघत होते.
मनिष जास्त वाट बघावी लागली का रे?
अरे नाही यार.
आताच आलो आणि दोन चहा पण सांगितले.
लंचटाईम संपायच्या आत कोर्टात पोहचावे लागेल मला.
दोन केसेस आहेत.कधीही नंबर येऊ शकतो.
कोण असतो विनय मनोहर मोरे…पुढील भाग वाचत रहा.
पुढील भागाची लिंक
तुमच्या comments अवश्य द्या.






छान
सुरेख