५-हरवून गेल्या जाणिवा
५-हरवून गेल्या जाणिवा

५-हरवून गेल्या जाणिवा

५-हरवून गेल्या जाणिवा
दर्शना भुरे
वैकुंठाच्या रत्नाआत्याचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम थाटात करण्याची तयारी सुरु झाली.पुढे…..

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम शेतात करायचे ठरले होते .. घर ते शेत यामधील टोकाचे अंतर लक्षात घेता पाहुण्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होवू नये यादृष्टीने त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था शेतातील मोठ्या प्रशस्त वाडीतच करण्याचे त्यांनी ठरवले होते

त्यामुळे सर्वात आधी घरातील गड्यांसोबत हजर राहून नर्मदा आत्याने स्वतःच्या देखरेखीखाली शेतातील वाड्याची सर्व साफसफाई करून घेतली.. आजूबाजूला वाढलेली तणकटे उपटून भोवतालचा परीसर साफ करून घेतला..वाड्यासमोर मोठा हिरवा मांडव ,त्या मांडवाच्या अगदी मधोमध रत्नाआत्याला बसवण्यासाठी फुलापानांनी सजवलेल्या आकर्षण झुल्याची मांडणी करण्यात आली. विविध फुलांनी सजलेला तो झुला अतिशय मनोहारी दिसत होता.येणाऱ्या जीवाच्या स्वागताची तयारी विविध फुलांच्या सुगंधांनी केली होती.
वाड्याच्या मागच्या बाजूला जेवणाच्या पंगती उठवायच्या असे सर्वांच्या सहमतीने ठरविले..
आमरस, पुरी, श्रीखंड असा जेवणाचा बेत ठरला..
सर्व कामे अगदी नियोजनानुसार पार पडत होती..
डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दोन दिवसांवर येवून ठेपला..
आणि घरात पाहुणे मंडळी जमा होवू लागली.. पाहुण्यांच्या स्वागतात घरातील वडिलधारी मंडळी गुंतली..
कपडा खरेदी सोडून
गर्भवती च्या ओटभरणाची जवळपास सर्व तयारी झाली होती.
उमरगाव अतिशय छोटे गाव असल्याने गावातील लोकांना कुठल्याही छोट्या मोठ्या खरेदीसाठी तालुक्याला जावे लागत होते..त्यामुळे
कापड खरेदीसाठी घरच्या बैलगाडीतूनच तालुक्याला जाण्याची व्यवस्था केली..
घरात एवढा मोठा कार्यक्रम होणार म्हणून घरातील बच्चे मंडळी तर हरखून गेलीच पणा मोठ्यांच्या उत्साहालाही पारावार उरला नाही. वैकुंठाची तर सारखीच लुडबुड चालू होती.

ती मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ आता शेतातील वाडीतच रमू लागली..आपल्या हसतमुख आणि लाघवी स्वभावाने लवकर कोणातही मिसळणाऱ्या वैकुंठाला शेवंता, वंदना या जुन्या मैत्रिणींसोबत घरी पाहुणी म्हणून आलेली अजून नवीन मित्र मंडळी मिळाली..
खोडकर विनायकला सोडून इतर मुलींसोबत तिची लगेच गट्टी जमली.. रत्नाआत्याच्या नणंदेचा मुलगा म्हणून रत्नाआत्याने विनायकला सोबतच आणले होते..

वैकुंठाला नटण्या मुरडण्याची आधीच आवड असल्यामुळे तिने तिच्या आवडीच्या हिरव्या रंगाची परकर पोलकेच आपण हळदी कुंकवाचा दिवशी घालणार असल्याचे आईला ठणकावून सांगितले.. हातावर मेहंदी रंगवण्यासाठी दुसऱ्या दिवशी पहाटेलाच उठून मैत्रिणींसोबत मेहंदीच्या झाडांची पाने तोडून आणण्याचा बेत पण आखला..
पण खोडकर विनायक तिच्या कामात सारखा अडथळे आणत होता.. म्हणून वैकुंठाची आणि त्याची चांगलीच जुंपली होती. तिला तो मुळीच आवडला नाही.

विनायक,वैकुंठाचे आयुष्य पुढे काय वळण घेते…वाचत रहा

हरवून गेल्या जाणिवा

https://marathi.shabdaparna.in/६-हरवून

क्रमशः

 

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!