स्वर सम्राज्ञी स्वर्गीय.. लता मंगेशकर
यांनी महान गायक मोहम्मद रफी सोबत गायलेले..
जीवनाचा तथ्य सांगणारे अतिशय सुंदर असे गाणे…
या गाण्याच्या अर्थपूर्ण आणि अतिशय सुंदर रचने करीता..आनंद बक्शी यांना सर्वश्रेष्ठ गीतकाराचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला.
मनाला शांती देणारी…
अतिशय सुंदर अशी रचना तसेच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या जोडीने दिलेले कर्णप्रिय मधूर संगीत त्यामुळे अजूनच हे गाणे ऐकताना मन प्रसन्न होऊन जाते…
आदमी मुसाफिर है, आता है, जाता है
आते जाते रस्ते में, यादें छोड जाता है
माणूस वाटसरू असतो. आयुष्याच्या प्रवासात येतो आणि जातो. येतांना ,जातांना वाटेत चांगल्या-वाईट,गोड-कटू आठवणी सोडून जातो.
झोंका हवा का, पानी का रेला
मेले में रह जाये जो अकेला
फिर वो अकेला ही रह जाता है
आदमी मुसाफिर है…
तो हवेच्या झुळूकेसारखा शाश्वत नसलेला,पाण्याच्या प्रवाहासारखा संपणाराआहे.जीवनाच्या क्षणिक यात्रेमध्ये हळूहळू तो एकटा पडत जातो.
कब छोड़ता है, ये रोग जी को
दिल भूल जाता है जब किसी को
वो भूलकर भी याद आता है
आदमी मुसाफिर है…
कोणी सोडून गेल्यावर त्याला विसरणे केवळ अशक्य आहे.कितिही विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्याची आठवण येतच राहते.
क्या साथ लाये, क्या तोड़ आये
रस्ते में हम क्या-क्या छोड़ आये
मंजिल पे जा के याद आता है
आदमी मुसाफिर है…
शेवटच्या मुक्कामी निघताना माणसाचे मन
जन्माला आल्यानंतर आपण येताना काय सोबत आणले..
जाताना वाटेत काय सोडून चाललो..याचा हिशोब करत राहते..
जब डोलती है, जीवन की नौका
कोई तो बन जाता है खिवैय्या
कोई किनारे पे ही डूब जाता है
आदमी मुसाफिर है…
जीवनात आलेल्या असंख्य संकटाने जेव्हा जीवनरूपी नाव डगमगू लागते..तेव्हा या संकटातून तारण्यासाठी मजबूत आधाराची गरज असते. हा आधार ज्याला मिळतो.
तो यातून सुखरूप बाहेर पडतो.
ज्याला मिळत नाही तो यातच खोल खोल डुबत राहतो.
ज्येष्ठ चरित्र अभिनेते सुधीर दळवी आणि निवेदिता जोशी यांच्यावर चित्रीत केलेले तसेच जितेंद्र, रीना राॅय, सुलक्षणा पंडित यांच्या विलक्षण अभिनयाने सजलेले…
चित्रपट अपनापन मधील हे दीर्घ कालापर्यंत आठवणीत राहणारे एक गाणे..
गाणे.. आदमी मुसाफिर है…
चित्रपट.. अपनापन
गीतकार.. आनंद बक्शी
संगीतकार… लक्ष्मीकांत प्यारेलाल
गायक.. मोहम्मद रफी, लता . मंगेशकर
दर्शना भुरे हिंगोली









