अरे जा रे हट नटखट..
By-सौ. दर्शना भुरे
चित्रपट नवरंग .. नवरंग नावाप्रमाणे नऊ रंगाची उधळण दाखवत
अरे जा रे हट नटखट.. या गाण्यावर
थिरकणारी अभिनेत्री संध्या पाहिली की अवघा प्रेक्षकवर्ग मंत्रमुग्ध होऊन जातो..
या गीतात होलिकोत्सवाचे संपूर्ण वर्णन दाखविले आहे.
गीताचे बोल भरत व्यास यांचे आहे.स्वरसाज सी.रामचंद्र आणि महेंद्र कपूर,आशा भोसले यांचा सुरेल आवाज.सोबत संध्याचे नृत्य…
माझ्या मते तरी या गीताला भारतीय संस्कृतील इतिहास घडविणारे गीत असे म्हणायला काहीच हरकत नाही.
नृत्यशैलील पारंगत प्रतिभावंत अभिनेत्री संध्या…
चल जा रे हट नटखट.. म्हणत गाण्याच्या शेवटी वाद्यातील प्रत्येक धुनवर ठेका धरीत दोन्ही हाताने रंगाची उधळण करीत अक्षरशः धमाल उडवित प्रेक्षकांना जागेवरच खिळवून ठेवते..
अटक-अटक झटपट पनघट पर
चटक मटक इक नार नवेली
गोरी-गोरी ग्वालन की छोरी चली
चोरी चोरी मुख मोरी मोरी मुसकाये अलबेली
कँकरी गले में मारी कंकरी कन्हैये ने
पकरी बाँह और की अटखेली
भरी पिचकारी मारी (सारारारारा)
भोली पनिहारी बोली
गोरी गोरी नाजूक गवळ्याची पोर गालातल्या गालात हसत थोडीशी लाजत मुरडत नजर चुकवत लगबगीने जात असताना नटखट कन्हैया वाटेत तिला हळूच छोटासा दगड मारून अडवतो आणि हातातील पिचकारीची धार तिच्यावर सोडीत
रंगाची उधळण करू लागतो..
अरे जा रे हट नटखट
ना छू रे मेरा घूँघट
पलट के दूँगी आज तुझे गाली रे
अरे जा रे हट नटखट…
मुझे समझो न तुम भोली-भाली रे
तेव्हा गवळण कान्हावर नाराजी दर्शवत म्हणते
दूर हो मला असा वाटेत छेडू नको.. तुझ्या खोड्या न समजण्या इतपत मी नक्कीच भोळी नाही.तुझ्या खोड्या थांबव नाहीतर मी पण रागवेल बरं
आया होली का त्यौहार
उड़े रंग की बौछार
तू है नार नखरेदार मतवाली रे
आज मीठी लगे है तेरी गाली रे
अरे नखरेवाली…होळीचा सण आला आहे.. सर्व दिशांना रंगानी उधळण होत आहे. त्यामुळे आज मी खूप खूष आहे. तेव्हा तू रागवून दिलेली शिवीही गोडच वाटेल.
तक-तक ना मार पिचकारी की धार
कोमल बदन सह सके ना ये मार
तू है अनाड़ी, बड़ा ही गँवार
कजरे में तूने अबीर दिया डार
तेरी झकझोरी से, बाज़ आयी होरी से
चोर तेरी चोरी निराली रे
मुझे समझो ना तुम भोली-भाली रे
अरे जा रे हट नटखट…
गवळण म्हणते अरे अनाडी
तुझ्या पिचकारीची सततची धार आता माझे कोमल शरीर घायाळ करत आहे..तुला कसे काहीच कळत नाही.
माझ्या काजळात तू गुलाल टाकला.आता खरेच तुझ्या या छेडण्यापायी हरले मी.
कान्हा,तू,तुझा खाट्याळपणा,तुझी चोरी सगाळेच वेगळे आहे कान्हा.
धरती है लाल आज, अम्बर है लाल
उड़ने दे गोरी गालों का गुलाल
मत लाज का आज घूँघट निकाल
दे दिल की धड़कन पे, धिनक धिनक ताल
झाँझ बजे चंग बजे, संग में मृदंग बजे
अंग में उमंग खुशियाली रे
आज मीठी लगे है तेरी गाली रे
अरे जा रे हट नटखट…
कान्हा म्हणतो आज धरती आकाश लाल झाले.. तेव्हा तुपण
लाजेचा घुंगट सोडून माझ्या सोबतच रंगात रंगून जा.तुझ्या गालावर गुलाल लावू दे.
माझ्या ह्दयातील ठोक्यांसोबत ताल धर. तुझ्या गालावरील लाली साऱ्या आसमंतात उडू दे. चारी दिशांनी सगळीकडे तालमृदंग वाजत आहेत.. सारा आसमंत उत्साहाने डोलत आहे..
प्रिय वाचक,रंगपंचमीच्या या गाण्याचे रसग्रहण कसे वाटले जरुर कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुम्हाला आवडणाऱ्या गीताचे रसग्रहण शब्दपर्णवर पाठवू शकता.
मस्त
अप्रतिम
Wah
सुरेख रसग्रहण