Hindi Song-रिम झिम रिम झिम
नाटकाची रिहर्सल सुरु असते.तिच्या प्रेमात बुडालेला तो रिहर्सल करतांना चुकून तिचे नाव घेतो.लटक्या रागाने ती तिथून बाहेर पडते. तोही तिच्या मागोमाग येतो.
प्यार की नुमाईश करना जरुरी है क्या
नुमाईश नही वो सच था रज्जो
तुम्हारे बगैर मै जिंदा नही रह सकता रज्जो
रज्जो मुझसे शादी करोगी?
नंतर स्तब्धता.तिच्या मौनात तिचा होकार असतो.ती लाजून घराच्या आत जाते आणि पाठोपाठ तो.
दोघांच्या मध्ये काचेचे दार.तो दार उघडून आत जातो कुमार शानूचे सुरेल स्वर ऐकू येतात
रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम
१९९४ मध्ये आलेला Lovstory १९४२ सिनेमातील हे मधाळ,प्रणयरम्य गीत.
१९४२ च्या उठावावर आधारित हा सिनेमा आहे.
तिचे वडील स्वातंत्र्यसैनिक.देशासाठी ब्रिटिशांविरोधात प्राणपणाने लढणारे.त्याचे वडील ब्रिटिशांच्या सेवेत.
अशी विरोधी पार्श्वभूमी असलेले दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.दोघांच्याही घरुन परवानगी मिळणे दुरापास्त.
१९४२ चा काळ.लाजरेबुजरे,अव्यक्तातून व्यक्त होणारे प्रेम.
मनिषा कोईराला खूप सुंदर तर दिसतेच पण गाण्यात तिच्या चेहऱ्यावरील भाव अगदीच लाजवाब आहेत. तिचे निखळ,मोहक सौंदर्य लक्ष वेधून घेते.अनिल कपूरचा नेहमीसारखाच दर्जेदार अभिनय.
रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम
भीगी भीगी रुत में तुम हम हम तुम
चलते हैं चलते हैं
बजता है जलतरंग टीन की छत पे जब
मोतियों जैसा जल बरसाए
बूँदों की ये झड़ी लाई है वो घड़ी
जिसके लिये हम तरसे, हो हो हो रिम झिम रिम झिम
बादल की चादरें ओढ़े हैं वादियां
सारी दिशायें सोई हैं
सपनों के गाओं में भीगी सी छाँव में
दो आत्माएं खोई हैं
आई हैं देखने झीलों के आइने
बालों को खोले घटाएं
राहें धुआँ धुआँ जाएंगे हम कहाँ
आओ यहीं रह जाएं
गाण्याचे सुरुवातीचे शब्दच खूप आकर्षक,मोहक आहेत.
एखादी तरुणीच्या नाजूक पायातील पैंजण रुणझूण आवाज करत आहेत असे वाटण्याइतपत गाण्यात मधूरता आहे.
रिमझिम पाऊस पडत आहे.सगळीकडे पावसाची ओल पसरली.अशा ओल्यावेळी तिथे ती दोघेच आहोत.
छतावर पावसाचे टप टप थेंब पडत आहेत.मोत्यासारखा शुभ्र पाऊस पडत आहे.तो ती मोत्यांची थेंबे ती तिच्या पदरात झेलत आहे.
एवढे दिवस ज्याची वाट बघत होतो ते त्यांच्या भेटीचे क्षण या जलधारांनी आणली.
आभाळात मेघांची गर्दी झाली.डोंगरदरींवर मेघांचे आच्छादन पसरले. मेघांनी सुर्याला लपवले.सगळ्या दिशा झाकोळल्या.
अशा स्वप्नाच्या गावी ओल्या सावलीत आपल्यासारखे दोन प्रेमीजीव प्रेमात मग्न झाले.
आभाळातून ढग खाली खोल दरीत उतरले .पावसाने तयार केलेल्या तलावात जणू ते प्रतिबिंब न्याहळत आहेत.
ढगांमुळे सगळे धूसर,अंधूक झाले आहे.अशावेळी ती दोघे कुठे जाणार…
इथेच थांबणार या सुंदर,प्रेममय वातावरणात….
विधू विनोद चोप्राने दिग्दर्शन केलेल्या सिनेमाचे तरल गीते जावेद अख्तरने लिहिली आहेत.संगीत R,D. बर्मनचे.R,D,चा शेवटचा सिनेमा.जाता जाता काय सुंदर संगीत दिले.
कुमार शानू आणि कविता कृष्णमुर्तीने गाण्याचे शब्द,संगीतासारखेच मधाळ गायले.
कुमार शानूच्या रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम ओळीनंतर कविता कृष्णमुर्तीचे ला ला….गाणे अगदीच दिलखेच वाटते.
या गाण्यात कॕमेऱ्याने टिपलेले सौंदर्य गाण्याचा दर्जा उंचावते.
बादल की चादरें ओढ़े हैं वादियां या कडव्याचे अतिशय सुंदर चित्रीकरण आहे.
धुसर प्रकाश,लाल पिवळी फुले,हिरवी पाने,पानावरुन पावसाचे पडणारे मौक्तिक सगळेच सपनोके गाॕवमें सारखे.
या सिनेमाने १९९४ चे जवळपास सगळेच फिल्मफेअर अवार्ड जिंकले.
नव्वदच्या दशकात खूप सुंदर,अर्थपूर्ण,लोकप्रिय गाणी आली.ह्दयाच्या गाभ्यातून निघालेले,मनप्रसन्न करणारे कर्णमधुर संगीत आणि तेवढ्याच ताकदीने गाणारे गायक
गाण्यातील शब्द,सूर,स्वर सगळेच आता हरवल्यासारखे वाटते. हो ना…
हे गाणे तुम्ही आमच्या you tube channel वर खालील लिंकवर श्रुती दाणीच्या मधुर आवाजात ऐकू शकता.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा