असा बेभान हा वारा
असा बेभान हा वारा

असा बेभान हा वारा

असा बेभान हा वारा

 

तशी तिची अन माझी भेट वर्षभरापूर्वीचीच. शिवाय कामाच्या वेळाही वेगवेगळ्या. पण एक दिवस तिच्या भेटीचा योग आला आणि जगणं कसं बिनधास्त असावं मनमुराद स्वैर उडणाऱ्या फुलपाखरासारखं याचे उत्तम उदाहरण मी पाहिलं .

तिची आणि माझी एक कॉमन मैत्रीण होती तिच्याकडून मी ऐकून होते भेटीचा योग आला आणि कधी आमच्यात नकळत गट्टी झाली कळलंच नाही .

ती धाडधाड जिना चढून लॉबीतून क्लासकडे निघाली कि तिचा खडा आवाज ऐकायला मिळतो.तिच्या एका आवाजात आणि मुलं चिडीचूप होतात.तिची दहशत आहेच तशी.

तडकफडक बोलणे , स्वच्छंदी राहणीमान,मनमोकळा स्वभाव आणि बिनधास्त व्यक्तिमत्व…या सर्वांमुळे ती आम्हा सर्वात लोकप्रिय असलेली एक बिनधास्त व्यक्तिमत्व.

प्रत्येक क्षण भरभरून जगणारी तेवढीच कर्तव्यदक्ष . आईची सासू-सासर्‍यांची सेवेत सारी कर्तव्य पूर्ण केलेली, नव्यानेच ओळख झालेली पण खूप जुनी वाटावी अशी.
कामात सुद्धा अगदी तंतोतंत नियमात बसवली आहे अशीच. आपलं काम मन लावून करणारी समोरच्याला तक्रारीची संधी न देता वेळेत काम पूर्ण करणारी. मग ते पेपर चेकिंग असो बा पालकांसोबत च्या मीटिंग. क्लास मॅनेज करणे पासून ते धडाधड चारशे मुलांची अटेंडन्स पंधरा मिनिटात घेईल .

अशी तिची स्पीड एक्सप्रेस ट्रेनलाही लाजवणारी.
तिची नजर तर इतकी तीक्ष्ण की क्लासमधल्या लैला मजनूच्या जोड्या तिच्या नजरेत येऊ नये याची काळजी घेतात.
ती म्हणजे आमच्या दामिनी पथकाची लिडरच आहे .

वरवर बिनधास्त भासत असली तरी स्वतःच्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवताना मी तिच्यातली हळवी झालेली आई पाहिली आहे.

माणसाचा स्वभाव कधीच बदलत नसतो.
तिचा बाहेर जसा दरारा आहे तसाच,तेवढाच दरारा तिच्या घरट्यातही आहे. तिच्या एका फोन कॉलवर नवरा घाबरून तिच्यासमोर हजर झालेला आम्ही कैकदा पाहिले आहे. याला दहशत म्हणत असावेत.

दिपालीने काॕल केल्याबारोबार
बापरे बाप. ‘ हुकूम मेरे आका ‘ म्हणून संजय दिपाली च्या समोर हजरच……!

सुख आयते कधीच येत नाही त्यामागे अपार कष्ट श्रद्धा आणि अंगमेहनत लागतेच.
तिने योग्य वयात प्रेम विवाह केला खरा पण पुढे किती परीक्षा देत गेली याची आता आठवणही तिला नकोशी वाटते.
एक आठवणीतील किस्सा सांगते, तो तिच्याच तोंडून हावभाव सहित ऐकताना विशेष मजा वाटते.
लग्नाचा पहिला वाढदिवस अवघ्या वीस रुपयात साजरा कसा केला ? पैकी दहा रुपयाची पाणीपुरी खाल्ली आणि पाच रुपयाचा नवऱ्याने प्रेमाने गजरा घेतला आणि पाच रुपये ऑटो रिक्षा ला दिले असा तो आठवणीतला वाढदिवस.
खरच प्रेमाला उपमा नाही.

कुठलाही कार्यक्रम म्हटले की पराकोटीचा उत्साह. उत्सवमूर्ती कोण…असा प्रश्न पडण्याइतपत आमची दिपाली कार्यक्रमात उठून दिसते.

दिपाली म्हणजे चालता-बोलता फॅशन शोच जणु.तिचा मॕचिंगचा हव्यास म्हणजे तर….
ज्वेलरी पासून ते टिकली पर्यंत सगळे मॕचिंग हवेच हा तिचा अट्टाहास असतो.

एका गोष्टीची मात्र गंमत वाटते मला. वाढलेले वजन कमी करण्याचा ती रोज निर्धार करते पण खाण्यावर कंट्रोल?
अशक्य.
सर्व गोष्टी कंट्रोल करणारी दिपाली खाण्यापुढे मात्र हार मानते.
सतत भिशी, पार्ट्या, सेलिब्रेशन्स असे नियोजित कार्यक्रमात व्यस्त . म्हणजे खादाडखाऊ सुरुच राहतो

अगदी ३६५ दिवसातले ६५ दिवस पण घरी जेवते की नाही देव जाणे.मग वजन काही तिची साथ सोडत नाही आणि ती वजनाची.
तुझ्या वाचून करमेनाच प्रकार आहे तिचा आणि वजनाचा.

अशी आमची दिपाली सर्वांची लाडकी आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी.

दीप उजळतो जसा दारी
दिपाली आहेच आमची भारी
बेभान वाऱ्यासारखी उधळणारी
पण नेहमी भान ठेवणारी……

अशीच हसत रहा,हसवत रहा.
हसू पेरत रहा.
हीच सदिच्छा.

……. मोहिनी पाटनुरकर राजे
………विशेष आभार _ सौ प्रियाउदय

 

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

5 Comments

  1. Pradnya

    खूप छान लिहलंय मोहिनी मिस
    खरंच दीपाली मॅडम कडून खूप काही शिकण्यासारखं आहे.
    ❣️🤗

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!