ओ साथी रे-मुक्कद्दर का सिकंदर
१९७८ साली आलेल्या..
मुक्कद्दर का सिकंदर चित्रपटातील
ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना… या गाण्याला पडद्यावर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून किशोरदा आणि आशा भोसलेने गायलेले ओ साथी रे..
हे गाणे या चित्रपटातील iconic गाणे ठरले आहे.अतिशय सुंदर प्रेममय बोल असणारे असे हे गाणे या संपूर्ण चित्रपटांमध्ये दोन तीन वेळा चित्रीत करण्यात आले आहे.
खरे तर आजवर प्रेमावर अनेक गाणी बनली आहेत आणि बनत ही आहेत प्रेमींजिवांच्या गुलाबी क्षणांचा साक्षीदार असलेल्या
या गाण्याची गोष्ट अलगच आहे. प्रेमींजोडप्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या या गाण्याने
प्रेमाच्या बाबतीत इतिहास रचला असं म्हणायला काहीच हरकत नाही.
याची रचना करताना
गीतकार अंजान यांनी अतिशय प्रेममय शब्द वापरले आहेत.आनंदजी विरजी शाह आणि कल्याण जी विरजी शाह यांनी संगीत दिलेले ..
ओ साथी रे.. चे स्वर कानावर पडले अवघा प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध होऊन जातो.
आयुष्यामध्ये खरं प्रेम सर्वांनाच मिळते असे नाही ते कोणाला मिळते तर कोणाला मिळत नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी व्यक्ती
ज्याच्या जवळ असते. तो या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती असतो.
प्रेम ही एक उदात्त भावना असते ती
खऱ्या प्रेमाला वयाचे जातीपातीचे गरीबी श्रीमंतीचे कशाचेही बंधन नसते.ते कोणावरही जडू शकते.
कथेच्या नायक सिकंदर (अमिताभ बच्चन) च्या बाबतीत ही काहीसे असेच घडले.
अनाथ सिकंदर ला सेठ रामनाथ त्याच्या छोट्या मुलीच्या कामनाच्या आग्रहास्तव घरकामाला ठेवतो. कामनाच्या मनात सिकंदरविषयी सहानुभूती निर्माण होते.ती त्याच्याशी मैत्री करते.
मेमसाहब कडून मिळणाऱ्या आपुलकीने सिकंदर गहिवरून येतो. त्याला तसे पाहून कामना तिच्या आईची आठवण म्हणून ती नेहमी ऐकत असलेली धून
ओ साथी रे ऐकून दाखवते.ती धून ऐकून
तो कामनाच्या प्रेमात पडतो.पण कामना ला याची जराही कल्पना नसते.
सेठ रामनाथ सिकंदर ला चोरीच्या संशयावरून घरातून हाकलून देतात.काळ हळूहळू पुढे सरकतो. कामना सिकंदर जवान होतात. घरातून बाहेर पडलेल्या सिकंदर ला कामना चोर समजून विसरून जाते.पण सिकंदर चे तिच्या वरील प्रेम तसेच कायम रहाते.
कामना ने अनाथ मुलांसाठी आयोजित केलेल्या charity show ची सर्व तिकीटे सिकंदरने विकत घेतली आहेत असे समजताच त्याला स्टेजवर बोलावून कामनाच्या हाताने सन्मानित करतात . तेव्हा तो तिला उद्देशून म्हणतो मी काही जन्मतः कोणी श्रीमंत किंवा महान व्यक्तीमत्व असलेला माणूस नाही मी या मुलांसारखा रस्त्यावर वाढलेला अनाथ मुलगा आहो.मी माझ्या सारख्या अनाथ मुलांना मदत करून काही महान कार्य केले नाही.
माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली होती तिने मला माणूस म्हणून सन्मानाने वागवले मला प्रेम दिले माया दिली.मी जेव्हाही माझ्या आयुष्यात निराश होतो तेव्हा तिने गायलेले गाणे मी गातो हे गाणे माझ्या जगण्याची ताकद आहे माझी प्रेरणा आहे.तेव्हा हे तिला समर्पित असे म्हणून गायला सुरुवात करतो..
आहे.
ओ साथी रे
तेरे बिना भी क्या जीना
ओ साथी रे
तेरे बिना भी क्या जीना
मित्रा तुझ्याविना कसे जगायचे..
फूलों में कलियो में
सपनो की गलियों में
फूलों में कलियो में
सपनो की गलियों में
तेरे बिना कुछ कही ना
मित्रा तू सोबतीला नाही म्हणून मी उदासीन झालो आहे. बागेतल्या फुलां- कळ्यां मध्ये अगदी स्वप्नांच्या गावांमध्येही माझे मन रमत नाही.
तेरे बिना भी क्या जीना
ओ साथी रे
तेरे बिना भी क्या जीना
मित्रा तुझ्याविना कसे जगायचे..
हर धड़कन में प्यास है तेरी
साँसों में तेरी खुशबु है
इस धरती से उस अम्बर तक
मेरी नज़र में तू ही तू है
प्यार ये टूटे न प्यार ये टूटे न
साथ ये छूटे कभी ना
माझ्या हृदयाचा कप्पा नी कप्पा तुझ्या सहवासा साठी आतुरला आहे.माझ्या येणाऱ्या प्रत्येक श्वासात तु सामावली आहेस. धरती पासून ते आकाशापर्यंत
माझ्या नजरेत फक्त तूच आहेस.
तुझ्यावरील माझे प्रेम कधीच संपणार नाही. तुझी साथ ही कधीच सोडणार नाही.
तेरे बिना भी क्या जीना
ओ साथी रे
तेरे बिना भी क्या जीना
मित्रा तुझ्याविना कसे जगायचे
तुझ बिन जोगण मेरी राते
तुझ बिन मेरे दिन बंजारे
मेरा जीवन जलती धूनी
बुझे बुझे मेरे सपने सारे
तुझ्या वाचून माझ्या रात्री विरक्त झाल्या आहेत.आणि दिवस ओसाड झाले आहेत माझी सारी स्वप्न मावळली आहेत. तुझ्याविना मी विरहाच्या आगीत होरपळत आहे.
तेरे बिना मेरी तेरे बिना मेरी
ये ज़िन्दगी ज़िन्दगी न
तेरे बिना भी क्या जीना..
तुझ्या शिवाय माझं आणि माझ्या शिवाय तुझं जगणं हे जगणं नाही एकमेकां शिवाय आपण अधूरे आहोत आपलं जीवन निरर्थक आहे.
ओ साथी रे
तेरे बिना भी क्या जीना
तेरे बिना भी क्या जीना
तेरे बिना भी क्या जीना
अरे मित्रा तुझ्याविना चे जगणे… शक्य नाही…
शक्य नाही…
फिल्म – मुकद्दर का सिकंदर 1978
कलाकार – अमिताभ बच्चन, राखी गुलज़ार, विनोद खन्ना, रेखा
गायक – किशोर कुमार
संगीत निर्देशक – आनंदजी विरजी शाह, कल्याणजी विरजी शाह
गीतकार – अंजान
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
सौ. दर्शना भुरे हिंगोली










ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना-सुंदर समीक्षण
साथी रे, तेरे बिना भी क्या जिना l
छान रसग्रहण
Miss you lot.
वाह
Sundar sa grahan