मानवीच्या वडिलांनी सागरच्या घरी कळवले.सागर सहित त्याचे आई वडिल लगेच मानवी कडे येऊन पोहचले …,
सागरला तेथे बघून मानवीच्या मैत्रीणींना आश्चर्याचा धक्का बसला … ..पण त्यां काहीच सांगू शकत नव्हत्या…
अंत्यविधी आटोपून घरी येऊन पोहचत नाही तोच पोलिस तेथे आले व त्यांनी एक चेन मधील लाॅकेट दाखवले …
” हे तर आम्ही सागर रावांना कुंकवाच्या कार्यक्रमात दिले होते.” मानवी चे वडिल लगेच म्हणाले..,
सागरच्या चेहऱ्याचा रंग उडाला , दरदरून घाम फुटला..तो आत जाण्यास निघाला तेवढ्यात पोलिसांनी त्याला थांबवले…
” ये थांब तुला आमच्या बरोबर यावं लागेल .”
सागर थरथरत म्हणाला ,”मी …मी कशासाठी?”
पोलिसांनी सागरला पकडून नेले.त्याला विचारपूस केली पण तो काहीही सांगत नव्हता .तीन चार दिवस रिमांड वर घेतल्या वरही सागर कडून हवी ती माहिती मिळत नव्हती.
अचानक सर्वत्र खळबळ निर्माण होते .सागर वर प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न होतो….
जेल मधील सर्व कॅमेरे चेक केले असता….. हल्ला करणारा लक्षात आला आणि त्याला रिमांड वर घेतल्या गेलं…….
तो हल्लेखोर बोलतो...”मारू नका ,थांबा..थांबा मी सांगतो.”
“आपल्या गावच्या पाटलांच्या पोरानी.”
पोलिस अरेस्ट वॉरंट घेऊन पाटलांच्या घरी पोहचतात आणि “साहेबराव आहेत का? आम्ही त्यांना अरेस्ट करायला आलो.” असे सांगताच ,जना आजी विचारतात“कसला गुन्हा केला साहेबरावांनी?”( साहेबराव जना आजीचा नातू )
पाटलांना जावून पंचवीस वर्षे झाली असतील.तेव्हापासून संपूर्ण कारभार त्यांच्या पत्नी जनाबाई (कोपळी गावातील छोटे मोठे जना आजी म्हणत ) यांच्या हाती होता…
गोरगरीबांना मदत करणे, गरजूंच्या गरजा पुरवणे,गावात कुणीही दुःखी नको यावर लक्ष ठेवणे …
जना आजी म्हणजे गावातल्या लोकांसाठी जणू देव…
जना आजी पोलिसांना खूप प्रेमात घेऊन साहेब रावाला अरेस्ट होण्या पासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करते पण यावेळी पोलिस काहीच चालू देत नाही…
इकडे सावीला मानवीच्या निर्घृण हत्ये बद्दल खूप वाईट वाटते .तीला वाटते मानवीच्या ह्या अवस्थेला मीही जबाबदार आहे….ती मनाशीच बोलते,”सागर बरोबर पाठवण्याचा प्लॅन मध्ये मीही सामील होते पण हे इतके भयंकर काही घडेल याचा विचारही माझ्या मनात आला नाही.काका किती बरोबर होता कि लग्ना आधी त्या दोघांनी बाहेर जाण्यासाठी विरोध केला होता.”
सावी ला आता राहवत नाही…..
सावी काका जवळ सांगते
,”हा प्लॅन सागरचा होता ,तुम्ही दोघांना जायला नकार दिला तर त्याने आम्हा सर्व मैत्रीणी मिळून तिथेच या मग मी व मानवी दिवसभर सोबत राहू ,असे ठरले पण ती दोघे तेथून गेले .मग काही वेळा नंतर आम्ही फोन केला तर लागत नव्हता . तेथून पुढे काय झाले ते आम्हाला काहीच माहित नाही.तुम्ही रागवाल म्हणून सांगितले नाही….माफ करा काका .”असे म्हणत सावी ओक्साबोक्सी रडते ….
इकडे पोलिस साहेबरावला विचारपूस सुरू करतात.साहेबराव सारखा एकच वाक्य बोलत असतो,”मी आदेशाचे पालन केले.” पण आदेश कुणाचा हे काही सांगायला तयार होत नव्हता….
जना आजी साहेबरावच्या जामीनासाठी अर्ज देते पण तो खारीज केल्या जातो …
जना आजी आता खूप विचारात पडते पोलिसांना पैशाचं आमिष दाखवून साहेबराव ची सुटका करून घ्यावी असे ठरवते पण त्यातही जना आजीला यश मिळत नाही…
जना आजी आता हतबल होऊन जाते सर्व मार्ग तिला बंद दिसतात….
सावी ने जे सांगितले ते पोलिसांना सांगण्या साठी मानवी चे वडिल पोलिस स्टेशन ला येतात आणि सर्व हकिगत पोलिसांना सांगतात…
पोलिस सागर कडे जातात व सरळ प्रश्न करतात,“का घेऊन गेला होता मानवीला त्या जंगलात व कुणाच्या सांगण्यावरून ? बऱ्या बोलाने सांग नाहीतर……..”
सागर जोरात ओरडतो ,”सांगतो साहेब ,सांगतो ….
“आमचं कुंकू झाल्यानंतर मी मानवीला भेटायला जेव्हा या कोपळी गावात आलो तेव्हा मला साहेबराव ने बाहेरच गाठले माझी भेट एका निर्भिड, चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून वाहणारी,करारी व्यक्तिमत्त्व असलेली अशा आजीबाईशी घालून दिली .त्यांनी आढेवेढे न घेता मला सरळ एक आॕफर दिली .मानवी शी लग्नाला नकार देण्याच्या बदल्यात जर तुला पुण्या सारख्या शहरात मोठ तुझं आॕफिस ज्यात तुझ्या हाताखाली दिडशे_दोनशे लोक काम करतील ….चालेल का तुला ?”
मला जणू लाॅटरीच लागली असे वाटले .माझं स्वप्न होतच माझी स्वतः:चा बिझनेस असावा पण वडिलांच्या जेमतेम पगारात घर चालायचं मग बिझनेस जमवायला पैसा कुठून आणणार .ही आयती संधी चालून आली होती . मी थोडावेळ विचार केला कि मानवी ला मी नाही तर दुसरा कुणी मिळेलच,दोघेही आपआपल्या जीवनात सुखी होऊ…..पण हे एवढे विदारक काही घडेल याची मला किंचीत ही शंका आली नाही…..
मी मानवी सोबत एका तलावा काठी गेलो . छान गप्पां मध्ये रंगलो .तेवढ्यात मागून कुणीतरी दोघांनी आमचे हात पकडले व आमच्या तोंडावर रुमाल पकडले त्या नंतर काय झाले ते मला काहीच आठवत नाही….मला जेव्हा संध्याकाळी शुद्ध आली तेव्हा मी पुणे शहरात सडके किनाऱ्याच्या बाकावर होतो…मी तसाच मानवीला फोन लावला पण तीचा मोबाईल बंद येत होता म्हणून मी साहेबराव ला फोन लावला त्यांनीही उचलला नाही.मग मी घरी गेलो तर पाहतो तर दारात एक लिफाफा पडलेला होता .त्यात माझे आणि मानवी चे संशयास्पद अवस्थेतील फोटो होते फोटो पाहून मला खूप मोठा धक्का बसला आणि त्या सोबत एक चिठ्ठी होती ,”गप गुमान घरात बस नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील….”म्हणून मी चुप होतो.
सागरची विचार पुस संपल्यावर पोलिस सरळ साहेबराव कडे गेले. त्याला रिमांड वर घेतल्या गेलं आणि मग तो ब़ोलु लागला,“मला हे सर्व जना आजी नी करायला सांगितले.”
पोलिस परत विचारतात ,”कारण काय,येवढं काय केलं होतं मानवी ने.”
“अपमान”
“खूप वेळा मानवी कडून अपमान सहन करावा लागला आजीला.गावातल्या मुलींनी,स्रीयांनी जास्त बोलू नये, लवून-दबून राहावं , मुलींनी ढोल वाजवून नये , लेझीम खेळू नये , रस्त्यावरून जाताना साडिचा पदर डोक्यावरून खाली पडू नये ..”पण उच्च शिक्षण घेऊन गावात आली तिला हे आजीचे नियम मान्य नसत.ती जना आजी च्या ह्या विचारांचा सर्वांसमोर विरोध करायची . तेव्हा जनाआजी काही बोलायची नाही हसत तिच्या बोलण्याचा स्वीकार करायची.पण आजी विचार करायला लागली अशा नी गावातील माझी प्रतिष्ठा कमी होईल कि काय ?अशी भिती आजीला वाटू लागली व तीने मानवीला धडा शिकवायचा असे ठरवले.”
पोलिस जना आजी चा अरेस्ट वारंट घेऊन पाटलांच्या घरी जातात आणि जनाबाई ला मानवीच्या खूनाच्या आरोपात अटक करतात….
सर्व गावाला दयाळू भासणारी जना आजी इतकी भयंकर षडयंत्रकारी आहे .तिने या आधी करवलेले खूनही उघड येतात व जना आजी आजन्म गजाआड जाते…….
मनू अतुल
नाशिक
Waah sundr
Thank you Tai🙏
खूप छान कथा
थरारक
Apratim manu 🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद सखींनो🙏