मराठी रहस्यकथा- घात मैत्रीचा
सुमन..नावाप्रमाने सुंदर ..प्रेमळ ..सर्वांच्या आवडीची.
गोड स्वभावाने तिने खूप मैत्रिणी जोडल्या होत्या.
तिची सर्वात गोड मैत्रीण होती..नयना.. दोघी लहानपणीच्या जीवलग मैत्रिणी .योगायोगाने लग्नानंतर दोघी एकाच गावात आल्या.दोघींची मैत्री सगळीकडे प्रसिध्द होती.
लहानपणापासून दोघी एकत्र वाढल्या.घरे जवळजवळ
सुमन श्रीमंत..तर नयना गरीब सतत पैशाची चनचन.वडिल व्यसनी..आई कसेबसे घर चालवायची. सुमन अभ्यासात हुशार होती.शाळेत सुमन तिला मदत करित राहायची. अडचणीत पैशाची मदत करायची.नयनाला लहानपणी एवढे कळायचे नाही पण हळूहळू तिला या गोष्टींची चिड यायला लागली.आपण कुणाच्यातरी उपकाराखाली दबतोय याची जाणीव तिला दुःख देत होती.पण या सर्व गोष्टींचा त्यांच्या मैत्री वर काहीच फरक पडला नाही.
दोघी अभ्यासात हुशार.सुमन नयनाला खूप जीव लावायची.पण नयनाच्या मनात काहीतरी सुरू असायचे.
माझ्याच वाट्याला या सर्व गोष्टी का आल्या? याचा विचार ती करत राहायची..बाकी मुलींचे आयुष्य बघायची किती साधे सरळ कशाची काळजी नाही.मस्त मजेत होत्या त्या.
ती तिचे दुःख सुमन जवळच सांगायची.माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येतील.?.कधी मनसोक्त जगायला मिळेल? सारे..सारे ..अनुत्तरीत प्रश्न.या सर्व प्रश्नांची उत्तर सुमन द्यायची.नेहमीच तिला धीर द्यायचे काम करायची.
होईल ग ठीक सर्व ..मी आहे नयना तुझ्या सोबत..तुझी सोबत मी कधीच सोडणार नाही.
नयनाला सुमनचे आपल्यावर किती प्रेम आहे हे कळत होते.सुमनचे आई..बाबा पण नयनाला मुलीसारखे सांभाळायचे.बघता बघता दोघी काॕलेजला जायला लागल्या.तिथेही त्यांची मैत्री प्रसिध्द झाली.काॕलेजमधला सुंदर मुलगा म्हणजे पराग…. त्याच्या प्रेमात मुली पडायच्या.नयनाला तो आवडायचा.पण त्याला सुमन.पुन्हा नयना नाराज झाली.मनात एक सल राहून गेली.तिने या गोष्टींचा उल्लेख कधीही कुणाजवळ केला नाही.अशाच किती तरी गोष्टी अपुऱ्या राहिल्या होत्या तिच्या.देव प्रत्येक वेळी मलाच का शिक्षा देतो हे कोड तर तिचा पाठलाग सोडत नव्हते.पण सुमनच्या आंनदात ती खूष होती.पराग आणि सुमनचे लग्न जुळले.
आता बराच वेळ नयना सुमनकडेच असायची.तिचे कपडे …दागिने …भारी..भारी..महागड्या साड्या नयना तर बघतच राहायची. पाच पदरी मोहनमाळ बघून तर नयना थक्कच झाली. तिच्या आईच्या अंगावर एक फुटका मणी नव्हता.खरच काय नसीब असते नं कोणाचे.देव कसे भरभरून देतो खूप काही. आपली तर दोन वेळी जेवणाची भ्रांत. नोकरी करून चार पैसे कमवायचे म्हटले तरी तिथेही वसीला.कुठून पैसे आणायचे?आई मात्र मेहनत करून खूष असते.जे भोग आहेत ते भोगावेच लागणार यावर ती ठाम. कधी कुणावर राग नाही.लग्नाची खरेदी जोरात सुरू होती.लग्नाचा दिवस उजाडला.लग्न
खूप थाटामाटात पार पडले.नयना एकटी पडली.सुमन सारखी तिला फोन करायची.काही हवे…नको ते बघायची.
इकडे नयनासाठी मुले बघणे सुरू होते.हुंड्याअभावी बरेचसे स्थळ हातातून गेले.सुमनच्या शेजारी ललीत राहायचा.दिसायला सुंदर.चांगली नोकरी ..स्वभावाने चांगला. नयनाचे ललीतसोबत लग्न झाले तर किती छान होईल नं या विचाराने सुमन सुखावली. ललीतला नयना आवडली दोंघाचे लग्न झाले.दोघींचा सुखाचा संसार सुरू होता.सुमनला छान मुलगा झाला. पण नयनाच्या संसारात काही ठीक नव्हते.ललीतला दारूचे व्यसन लागले.हळूहळू सर्व उध्वस्त झाले.नयना..परागने ललीतला सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही.पुन्हा तेच जुने दिवस नशीबी आले नयनाच्या.मुल झाले नाही.ललीतची तब्येत ढासळली.एक दिवस तो नयनाला सोडून कायमचा निघून गेला.जांताना भले मोठे कर्ज करून गेला.सुमनने खूप मदत केली.
दिवस चालले होते.सुमन नयनाला खूप आधार देत होती.त्या नेहमीच फिरायला जात होत्या .त्यांचा मैत्रीणींचा छान समुह होता. कधी बाहेरगावी फिरायला जायच्या.एक दिवस त्यांचा बाहेरगावी जाण्याचा प्लॕन ठरला.रेल्वेने जायचे ठरले.सुमन खूप आंनदात होती.दोन दिवस छान फिरल्या आणि तिसऱ्या दिवसी वाईट घटना घडली.सुमन रेल्वे मधून खाली पडली.सकाळी पोलीसांना तिचा मृतदेह रूळावर आढळला. चौकशी सुरू झाली. नयना तर एकूणच बेहोश झाली. रात्रीच्या वेळेला कुणालाच काही कळले नाही
.काय झाले असेल?कुणी धक्का दिला असेल का ? काही कळायला मार्ग नव्हता.झोपेत कदाचित पाय घसरला असेल असा अंदाज पोलीस काढत होते.पराग तर सुमनच्या आठवणीत वेडा झाला होता. सुमनच्या सामानाची उकल करण्यात आली.पण विशेष काही आढळून आले नाही. घरी चौकशी करण्यात आली. नोकर..चाकर सर्वांची विचारपूस करण्यात आली.सर्व सुमनबद्दल चांगले बोलत होते. परागचे बाहेर काही प्रेम …प्रकरण सर्व चौकशी झाली. नयना तर काही उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हती.
पोलीस सर्व दिशेने माहिती गोळा करत होते पण हातात काही येत नव्हते.सुमनचे दागिने व्यवस्थित ठेवून होते फक्त मोहनमाळ दिसत नव्हती.मोहनमाळ सुमन घरी ठेवायची.
माहेरचा दागिना म्हणून तिचा जास्तच जीव होता.त्या दिवशी पराग बाहेरगावी होता त्याच्या माघारी सुमन घरातून निघाली होती.मोहनमाळ घरात शोधून काढली पण नाही मिळाली.दिवस चालले होते.नयना सुमनच्या आठवणीत अश्रू ढाळायची.काही दिवसांनी ती भाच्याकडे राहायला जाते असे सांगून दुसऱ्या गावाला निघून गेली.सहा महिने उलटून गेले.पराग रोज पोलिस स्टेशनला जात होता.
आणि अचानक एक दिवस आरोपी सापडला.सोनाराच्या दुकानात मोहनमाळ विकायला आला होता.सोनारानी लगेच पोलीसांना फोन केला.आरोपी जाळ्यात अडकला होता.तो खूप घाबरला होता.
मला मारू नका मी सांगतो सर्व
अशी विनंती करू लागला.
मला काहीच माहित नाही.ही मोहनमाळ मला आत्याने दिली होती.आणि कुठेही विकायची नाही असे बजावले होते.पण दारूने माझ्यावर भलेमोठे कर्ज झाले.ही मोहनमाळ विकून ते फेडायचे असे मी ठरविले होते.
चल आत्याकडे..
.पोलिस ओरडले.
आरोपीला घेऊन पोलीस घरी आले.आत्या..आत्या आवाज देताच नयनाने दार उघडले.पोलिसांना खरा खुनी सापडला होता.
सर्व आश्चर्याने बघत राहिले.सुमनची जिवलग मैत्रीण असे करू शकते यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता.
सांगा ..बोला मॕडम
नयना सांगू लागली..
लहानपणापासून माझ्या मनात एक आकस निर्माण झाला होता.माझ्या बाबतच नेहमी असे का घडते याचे उत्तर मला सापडत नव्हते. सुमन माझी जिवलग मैत्रीण पण आतून मी तिचा खूप हेवा करायची.देव मला कशाची शिक्षा देतो आहे हेच कळत नव्हते. माझ्या बाबतच हे सर्व का?लग्न झाले पण कोणतेही सुख मिळाले नाही. मी सुमनलाच दोष देऊ लागले. माझ्या प्रत्येक अपयशाला तिला कारणीभूत ठरवत गेली मी.आयुष्यात कधी सुखाची सावली मिळालीच नाही , ते मिळविण्यासाठी उगीचच हट्ट धरून बसले होते मी.सुमनच्या उपकाराखाली जीव गुदमरून गेला होता.
त्या दिवसी ती मोहनमाळ तिने माझ्याकडे ठेवायला दिली.प्रवासात छान मजा केली.रात्री सर्व झोपल्या.सुमन आणि मी जागी होतो. बाहेर सुंदर चांदनी रात्र दिसत होती.आम्ही दाराजवळ उभ्या होतो. सुमन बाहेर बघण्यात गुंग होती.माझ्या मनात वेगळाच गोंधळ सुरू होता.लहानपणापासून प्रत्येक गोष्ट आठवायला लागली.
मला काहीच मिळाले नाही …याची खंत तीव्र होऊ लागली.सुमनचा हेवा वाटतच होता पण त्या क्षणाला तो जास्तच वाटू लागला.मी हळूच तिला धक्का दिला.ती पडली.मला असूरी आंनद मिळाला.
संशय येऊ नये म्हणून गाव सोडले.
चला मॕडम..गुन्हा हा कधीच लपत नसतो.
ज्योती रामटेके
बापरे!
अप्रतिम
छान कथा
रोंगटे उभे करणारे कथानक
Khup chan
खूप मस्त
बापरे खरचं खुपच सुंदर तितकेच मन हेलावुन टाकणारे व रोंगटे उभे करणारे कथानक …