chand phir nikla magar tum na aaye song review in marathi
सोज्वळ,नैसर्गिक सौंदर्याची देण लाभलेली नुतन आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला देव आनंदचा romantic comedy सिनेमा १९५७ साली आलेला पेईंग गेस्ट.
सिनेमात देवआनंद (रमेश)पेईंग गेस्ट आणि नूतन (शांती) घरमालकाची मुलगी दाखवली.
याच सिनेमातील ‘चाँद फिर निकला’ हे गीत.
मजरूह सुल्तानपुरीने विरहाची भावना शब्दात उतरवली आहे.एस.डी.बर्मनने स्वरसाज देऊन दुःखाची छटा गहरी केली.लता मंगेशकरच्या आवाजात हे गाणे ऐकतांना नूतन तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि चाँद डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
आजही चंद्र उगवला.पण तिच्या मनात सतत असणारा तिचा प्रियकर मात्र कुठेही दिसत नाही आहे.चंद्राच्या साक्षीने ती तिच्या मनसंवेदना व्यक्त करत आहे.
चाँद फिर निकला, मगर तुम न आये
जला फिर मेरा दिल, करुँ क्या मैं हाय
चाँद फिर निकला…
चंद्र तर रोजच्यासारखा आजही उगवला.
पण तू कुठे आहेस? चंद्राने नभाआडून बाहेर येऊन शितल प्रकाश धरतीला बहाल केला.पण मी काय करु? माझे ह्दय तर तुझ्यासाठी जळत आहे.
ये रात कहती है वो दिन गये तेरे
ये जानता है दिल के तुम नहीं मेरे
खड़ी मैं हूँ फिर भी निगाहें बिछाये
मैं क्या करूँ हाय के तुम याद आये
चाँद फिर निकला…
ही चंद्रप्रकाशात न्हालेली रात्र बघ ना मला हिणवत आहे.आपले दोघांचे प्रणयाचे दिवस सरले याची जाणीव करुन देत आहे. तू आता माझा नाही असे माझे मन सांगात आहे पण तरी मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून उभी आहे.
काय करणार? तुझ्या आठवणी मनातून जात नाही आहेत.
सुलगते सीने से धुंआ सा उठता है
लो अब चले आओ के दम घुटता हैं
जला गये तन को बहारों के साये
मैं क्या करुँ हाय के तुम याद आये
चाँद फिर निकला…
तुझ्या विरहात जळणारे मन थकले आता. ये आता लवकर.तुझ्याशिवाय जीव गुदमरतोय आता.
बहरण्याचा ऋतू आला. फुले उमलली,धरती सजली पण तुझ्याविना ह्या बहराने माझ्या देहाचा दाह होतोय.
तुझ्या आठवणी छळताहेत.मी काय करु?
चंद्र पुन्हा उगवला रोजच्यासारखा……..
….प्रिती…









छान
Wah
सुंदर
Mast
खूपच मस्त रसग्रहण