Tum aaye to aaya muze song- review in marathi
Tum aaye to aaya muze song- review in marathi

Tum aaye to aaya muze song- review in marathi

Tum aaye to aaya muze song- review in marathi
तुम आये तो आया मुझे याद
समाजाला अमान्य असलेलं दोन वेगवेगळ्या  जातीतील प्रेम. समाजापासून लपून झालेला विवाह.
त्याच्या आईच्या नकारामुळे दोघे ना सोबत राहू शकतात ना सोबत संसार करु शकतात. ती आणि  मुलगा दोघेच राहतात. कधीतरी तो भेटायला येतो.
दोघांमधील प्रेम सोबत न राहल्यामुळे,रोज न भेटल्यामुळे कमी होते कि कधीतरीच ता भेटतात म्हणून  ओसंडून वाहते.
जोवर मने जुळलेली असतात,तोवर प्रेमाची जादू शरीरात अंतर आले म्हणून कमी होत नाहीच.
भेटीतील अंतर वाढत जाते,मिलनाची आतुरता पराकोटीली पोहचते.
जख्म चित्रपटातील आनंद बक्षीने लिहिलेले या सुंदर प्रेमगीताला तेवढाच मोहक स्वरसाज चढवला आहे एम.एम.करीम यांनी .
अलका याज्ञिकने गाण्यात शब्दानुरुप   भाव टाकून गाणे अजून सौंदर्य बहाल केले  आहे.
हिंदूमुस्लीम समाजातील अंतरावर बेतलेल्या चित्रपटात पुजा भटच्या(चित्रपटात पुजाच्या नावाचा उल्लेख नाही.)
प्रेमात पडलेल्या  करणचे (नागार्जून)तिच्यासोबत  विवाहबाह्य संबंध असतात.
दोघांचा मुलगा अजय(कुणाल खेमू) आईवर नितांत प्रेम करणारा,तिच्या वेदना समजून घेणारा,परिस्थितीमुळे वयापेक्षा अधिक समंजस बनतो.
वडिलांनी आज त्याला भेटण्याचे वचन दिले असते.खिडकीतून त्याला कधीतरीच भेटायला येणारे वडील दिसतात.आनंदलेला अजय आईला सांगण्यापेक्षा  ग्रामोफोनजवळ जाऊन रेकाॕर्ड लावतो आणि सुरु होते श्रवणीय गीत.
तुम आये तो……गाणे ऐकून पुजा दार उघडते.समोर तिचा ‘चाँद’ उभा असतो.

ग्रामोफोनवर गाणे सुरु,तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याइतपत पुजाचा सशक्त अभिनय. ज्याची वाट बघण्यातच दिवसरात्र जात आहेत तो प्रियकर  समोर दिसल्यावर तिचे एकटेपणाचे दुःख  डोळ्यातून वाहते. आईचे दुःख  दुःखी नजरेने टिपणारा अजय आणि  तिच्या दुःखामुळे करणच्या चेहऱ्याला आलेली अपराधभावनेची छटा…सगळेच मती गुंग करणारे.

कधी कधीच ढगांआडून उगवणारा चंद्र तिला आठवतो.
खूप दिवसानंतर भेटायला येणारा प्रियकर ढगांआड चंद्र  दडतो तसाच गायब होता. पण आज तो आला आणि आनंदाची लहर सर्वत्र वाहायला लागली.
जर मी आज झोपली असती तर…
उगवलेला चंद्र मला न दिसताच नजरेआड गेला असता.
पुन्हा तो खूप दिवसांसाठी अंतरला असता.
तो आला. तिची काया,तिचे मन सगळे त्याच्या स्वाधीन. एकदा त्याच्या स्वाधीन झाल्यावर पुढे काय झाले  हे आठवण्याइतपत भानावर ती नसतेच.
तो आला.तो तिच्याजवळ असल्यावर ती तिची राहत नाही.तिची काया,तिचे मन सगळे त्याच्या स्वाधीन. एकदा त्याच्या स्वाधीन झाल्यावर पुढे काय झाले  हे आठवण्याइतपत भानावर ती नसतेच मुळी.
त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली ती देहभान विसरुन जाते.
 त्याच्या रुपात आज ‘चाँद’ अवतरला असतो.त्यात तिला विरघळून जायचे आहे.
तुम आये तो आया मुझे याद
गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला
गली में आज चाँद निकला
तुम आये तो आया मुझे याद
गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला
गली में आज चाँद निकला
आज की रात जो मैं सो जाती
खुलती आँख सुबह हो जाती
मैं तो हो जाती बस बरबाद
मैं तो हो जाती बस बरबाद
गली में आज चाँद निकला
गली में आज चाँद निकला
गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला
मैने तुम को आते देखा
अपनी जान को जाते देखा
जाने फिर क्या हुआ नहीं याद
जाने फिर क्या हुआ नहीं याद
गली में आज चाँद निकला
गली में आज चाँद निकला
गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला
प्रिती….

7 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!