७-शलाकाची डायरी
आपल्या मुलांपासून हे हसरे क्षण कधीच दुरावले जाऊ नये असेच तिला वाटायचे.
आज स्वानंद येणार म्हणून त्याच्या आवडीचे काही पदार्थ शलाकाने बनवायला घेतले.स्वानंदची नेहमी होस्टेलच्या जेवणाबद्दल तक्रार राहायची. स्वानंद येण्याआधी तिला सर्व तयार करायचे होते.तिचे सगळे होते न् होते तोच स्वानंद मानसबरोबर हजर.मानस मुलांच्या बाबतीत कधीही कर्तव्याला चुकायचा नाही…..पुढे वाचा
भाग-७
चौघेही घरी असले कि घर पूर्ण वाटायचे शलाकाला.
खूप उशिरापर्यत तिघांनी गप्पा मारल्या.मानस थोडावेळ होता त्यांच्यात नंतर अभ्यासिकेत गेला तो.
स्वानंद होस्टेलच्या गमतीजमती सांगत होता. रात्री बराच वेळ गप्पा चालल्या.आज डायरी लिहायला जमलेच नाही तिला.
सकाळी उठून आज स्वानंदबरोबर
टेरिसवर गेली सूर्योदय बघायला.स्वानंदलाही शलाकासारखेच सूर्याच्या छटा बघण्याचे वेड होते.
स्वानंद सोबत आजचा दिवस कसा गेला कळले सुद्धा नाही. रात्री जेवण झाल्यावर स्वानंदने शलाकाला त्याच्या एका मैत्रिणीबद्दल सांगितले.
शलाकाला छोटा वाटणारा स्वानंद प्रेम करण्याच्या वयात पोहचला होता तर.
शलाका तिच्या खोलीत आली.आज डायरी लिहायला पाहिजे.मनात साचलेले शब्दातून उतरवले कि हलके वाटत होते तिला.
दिनांक……
वैभव माझ्या आयुष्यातून निघून गेला. मीही त्याला मिळविण्याचे प्रयत्न करणे सोडले.
मी आता एमटेक साठी अॕडमिशन घेतली.
राजाचे एमटेक झाले. त्याला आता युएसए मध्ये जाऊन पीएचडी करायची होती.त्यासाठी त्याने स्काॕलरशिप मिळवली आणि युएसएला गेला. आईला तो गेल्यामूळे खूप तुटल्यासारखे झाले.तो वापस येईल कि नाही ही भीती तिला वाटत होती.
पण तिला आम्हा तिघांचा आणि स्वतःचाही अभिमान वाटायचा.
आणि का वाटू नये? एकटीच्या बळावर समर्थपणे तिने आम्हाला लायक बनवले होते. माझी खंबीर आई फक्त बाबांसाठी कमजोर बनली होती.
प्रेम माणसातला स्वाभिमान ,ताकद सगळेच हिरावून घेते.पण आता आई बाबांच्या आठवणींशिवाय जगत होती.
बाबांबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती आता.आमच्या आयुष्यातून हद्दपार केले होते आम्ही त्यांना.
बाबा आणि नंतर वैभव यांच्या वागण्यामुळे मी जरा स्वार्थी बनले होते हे खरे.
खूप तडजोडी करत जगण्यात अर्थ नाही असेच माझे मत बनले होते.
मी लहान असतांना बाबांच्या खूप जवळ होती.माझ्यात गोष्टी शेअर करण्याची कला नव्हती.
मी सगळे काही मनातच ठेवायची. पण मनात खूप काही साचले कि त्याच्यातले थोडे मी बाबांना सांगायची.
आधी बाबांच्या जेवढी जवळ होते तेवढीच नंतर दूर गेले. बाबा गेल्यानंतर खूप कोंडमारा झालाय माझ्या मनाचा.कितीतरी गोष्टी मनातल्या मनात विरत गेल्या.
घरी आईबद्दल मला खूप वाईट वाटायचे .
तिचे दुःख मी कल्पनेत अनुभवायची पण त्यावर तिच्याशी मला बोलता आले नाही कधी. त्यामुळे सईशी तिचे जे नाते होते तसे माझ्याशी नव्हते.मी तिला समजून घेऊ शकते असे तिला वाटायचे नाही.
बाबानंतर मी वैभवशी शेअर करायची माझे मन. तो मला समजून घेतो असा समज होता.
आता पुन्हा सर्व गोष्टी मनात पचवणे सुरु झाले.
काॕलेज सुरु झाले.मी स्वतःला रमवले काॕलेजमध्ये. कधीकधी वैभवची खूप आठवण यायची.मन कासावीस व्हायचे. त्याचे स्पर्श आठवायचे. मला झालेला पहिला पुरुषस्पर्श त्याचाच होता. माझे मन,शरीर अतृप्त ठेवून सोडून गेला वैभव. चीड,संताप,प्रेम सगळ्याच भावनांचा कडेलोट व्हायचा.
आई,आई
स्वानंदच्या आवाजाने शलाका उठली
.अग,मला जायचे आहे आज.
स्वानंद बॕग भरुन तयार होता. शलाका घाईघाईने झोपेतून उठली. स्वानंदला निरोप द्यायला दारापर्यंत आली.
मानस बरोबर स्वानंद निघून गेला.
स्वानंद गेल्यावर शलाका परत खोलीत आली.रात्री वैभवच्या आठवणींनी आलेली अस्वस्थता तशीच होती. वैभवसोबत तिनच वर्षांचा सहवास पण त्याच्या आठवणी आजही मन हेलावून टाकतात.
आयुष्यात काही दिवसांसाठी आलेले काहीजण जन्मभर असतात आपल्यासोबत. त्यांच्या आठवणी दबा धरुन बसलेल्या असतात मनात.
कुठे असेल वैभव? कसा दिसत असेल? आताही तेवढाच गंभीर असेल? शलाकाच्या डोळ्यात आसवे जमा झाली. शलाका परत लिहायला बसली.
दिनांक…
एमटेकचे काॕलेज सुरु झाले. पहिले वर्ष संपले.
घरी आई आणि मी दोघीच असायचो. त्यामुळे मन रमायचे नाही घरात.
आईला आता माझ्या लग्नाची घाई झाली होती. बाबांमुळे माझे लग्न जमेल कि नाही याची तिला काळजी वाटत होती. तिने माझ्यासाठी स्थळ बघणे सुरु केले.नातेवाईकांमध्ये बाबांचे माहीत असल्यामुळे ते स्थळ आणत नव्हते.आईने विवाहमंडळात नाव नोंदवले.तिथूनच मानसचे स्थळ आले. मानस अतिशय कुशाग्र बुद्धीचा. त्याचे एमटेक झाले होते. काॕलेजमध्ये लेक्चरर होता.सोबत पीएचडी पण करणार होता. बघण्याचा कार्यक्रम झाला.त्याला आई नव्हती. वडील आणि एक लहान भाऊ एवढेच कुटुंब. त्याला मी आवडल्याचे त्याने सांगितले.जास्त काही त्याने चौकशी केली नाही.आईला तर तो फार आवडला. लग्न फायनल झाल्यानंतर करायचे ठरवले.
शलाका आणि मानसचे लग्न झाल्यानंतर काय होते पुढे वाचत रहा शलाकाची डायरी
क्रमशः
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
सुंदर
खुप छान
स्त्रियांच्या आयुष्यात जोडीदाराचे वेगवेगळे अनुभव छान लिहिले