प्रार्थना- लेख
आताच आपण गणेशोत्सव साजरा केला आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे उत्सव आहेत त्यातलाच एक म्हणजे गणेशोत्सव म्हणजे जणूकाही भक्तीचा उत्सव उत्सव देवावरच्या विश्वासाचा उत्सव गणेश तत्वाचा आणि मानवाचा एकमेकांशी असलेल्या अतूट नात्याचा उत्सव गणपती आपल्या घरी आले दहा दिवस राहिले आपण सर्वांनी त्यांना रोज सकाळ-संध्याकाळ प्रार्थना केली मनात विचार आला प्रार्थना किती छोटा शब्द पण अर्थ दृष्टीने आपण विचार केला तर किती मोठा आहे. मानवी जीवनात प्रार्थना या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मला वाटते अगदी अनादी काळापासून मानव जात कुठल्या ना कुठल्या प्रकारात प्रार्थना करत असावी प्रार्थना म्हणजे मानवाच्या सुह्यदयाचे प्रतीक असते. त्याच्या मनातील आत्म्यात असलेल्या मांगल्याच्या भावनेचे प्रतीक असते .प्रार्थना माणसाला अधिक संवेदनशील बनवते. आत्मा परमात्म्याला साकडे घालतो म्हणजेच प्रार्थना संपूर्ण जगात प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे मग तो जात किंवा धर्म कुठलाही असो की करायचे प्रकार भिन्न असेल पण प्रार्थनेचा भाव एकच असतो घरामध्ये सकाळी सकाळी आपण प्रार्थना करतो तेव्हा घरभर प्रसन्न तेचा दरवळतपसरत असतो दिवसभर आपल्याला प्रसन्न वाटते .संध्याकाळी जेव्हा आपल्याला प्रार्थना करायची तेव्हा जणू काही आपण आपल्या दिवसभराचे कृतीच्या आत्मचिंतन करत असतो जणू काही आपण आत्मपरीक्षण करत असतो जणू काही आपण देवाला सांगत असतो अपवित्रमं पवित्र करीत अशी प्रार्थना आपण रोज करून आपले शरीर मन बुद्धी आत्मा शुद्ध करून घ्यावा प्रार्थना या सुखासाठी असते तसेच दुःखासाठी असते आपल्याला सगळ्या गोष्टी शाळेत शिकायला मिळत असते असे नाही जगात अनेक प्रकारचे संस्कार होत असतात अशी की प्रार्थना ही माणसाच्या मनावर संस्कार करण्याचे काम करतात मानवी नैतिक मूल्य सुसंस्कृत करण्याचे काम प्रार्थना करते. प्रार्थना करतांना प्रथम आपल्याला दोन्ही हात जोडले जातात प्रथम आपण देवाला शरण जातो आपण नम्र होतो तो किती साधी सोपी कृती पण ती आपल्याला अंतर्बाह्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य तीच्यात असते म्हणून म्हणावेसे वाटते देवा तुझी प्रार्थना करण्याची संधी मला नित्यनियमाने मिळू दे आदिमानवाने ही वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना केली असणार कारण तो निसर्गात राहायचा निसर्ग म्हणजे चमत्कार आणि चमत्कार म्हणजे देव आहे अशा देवाला शरण जाऊन आपण आपले जगणे सुसह्य होण्यासाठी निश्चितत्याने प्रार्थना केल्या असतील असे म्हणतात सर्व काही परमेश्वराने दिलेअसते प्रार्थना अशी गोष्ट आहे जी मनापासून केली तर देवालाही पुन्हा लिहायला भाग पडते प्रार्थना आपले मन अंतकरण शुद्ध करण्याचे काम करते.
सिंधु व्हटकर सोनवणे
छानच
वाह