सावज होण्याआधी सावध व्हा-लेख
झटपट श्रीमंतीचा हव्यास हे एक प्रकारचे व्यसनच.ते व्यसन कोणत्या मार्गाला नेईल याचा नेम नसतो.दुर्देवाने आजच्या तरूणांना या व्यसनाने पछाडलेले आहे.त्यामुळे हे तरूण श्रीमंत होण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला मागेपुढे पाहत नाहीत….मग तो खुन करणे असो,चोरी,दरोडेखोरी,लुटमार, बलात्कार असो….पण या पापाचा घडा कधी ना कधी भरतो…गुन्हे करणारे यांनी कितीही चलाखी केली तरी एखादा सुगावा हाती लागतोच…नव्हे तो शोधून काढलाच जातो…..आणि स्वंय घोषीत डाॅन म्हणविणारे कुख्यात गुन्हेगार सुध्दा ते या जगाच्या पाठीवर कुठेही दडले असोत त्यांना बेड्या घातल्या जातात…..हे आपल्या पोलीसांनी बरेच वेळा सिद्ध करून दाखविलेले आहे.. त्यातच सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घालून पोलीसांना आवाहन देणे सुरू केले आहे..
सायबर क्षेत्रातील प्रगतीमुळे ऑनलाईन व्यवहार हे आजच्या दैनंदिन व्यवहाराची गरज झाली आहे..प्रत्यक्ष रोखीचा व्यवहार न करता ऑनलाईन व्यवहारावर भर दिल्या जावून मोठमोठे आर्थिक व्यवहारही केले जात आहेत…..नेमका याच बाबीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत….त्याविषयी सावधगिरी बाळगण्यासाठी हा लाल कंदिल…..
असाच एक कटू अनुभव सावनेर तालुक्यातील कळमेश्वर येथील रहिवासी विनोद यांना आला………. ” बँक मे से मॅनेजर बोल रहा हूँ,….आपके अकाऊंटका, एटीएम का व्हेरीफीकेशन करना है…वरना आपका अकाऊंट ब्लाॅक हो सकता है..असा फोन एका अनोळखी व्यक्तीचा त्यांना आला होता…कोणतीही शहानिशा न करता विनोद यांनी लगेच उत्साहाच्या भरात आपल्या ऑनलाईन व्यवहाराची सगळी गोपनीय माहीती त्या अनोळखी इसमास दिली…..चोराच्या हाती चाब्या देण्यासारखा हा प्रकार ठरला..काही क्षणातच त्यांच्या मोबाईलवर एकामागोमाग एक एसएमएस धडकणे सुरू झाले होते….बँकेतून त्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर ऑनलाईन पध्दतीने इतर खात्यात वळती झाल्याचा व त्यांच्या खात्यात काहीच रक्कम शिल्लक राहिली नसल्याचे बघून ते हादरले….आपण तर पैसे काढले नाहीत…किंवा पैशाचा ऑनलाईन व्यवहार पण केला नाही….मग खात्यातून रक्कम काढली कुणी ?… या चिंतेत त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली..
काही क्षणातच ते लगबगीने बँकेत धडकले…तो पर्यंत त्यांच्या खात्यातून होती नव्हती तेवढी सर्व रक्कम साफ झाली होती….बँकेने त्यांना पोलीसात तक्रार करण्याचे फर्मावले…तसे ते पोलीस ठाण्यात गेले…तक्रार नोंदवली…..सदरचा गुन्हा तांत्रिक पध्दतीचा असलेने तत्कालीन पोलिस अधीक्षक डाॅ.आरती सिंग यांनी सायबर सेल कडे तपास देवून एक टीम गठीत केली…..या टीमने अनोळखी आरोपीने केलेला मोबाईल काॅल,आरोपीने केलेले ऑनलाईन ट्रान्जिक्शन डिटेल्स,बँक अकाऊंट डिटेल्स अशा तांत्रिक पध्दतीचा उपयोग करून आरोपींचा शोध घेवून एकोणाविस ते वीस वयोगटातील तिन आरोपींना बिहार व झारखंड येथील जामतरा येथून अटक करून त्यांच्या मुसक्या बांधल्या…यांना शोधून त्यांच्या मुसक्या बांधण्यात सायबर सेल टीमला शर्थीचे प्रयत्न करावे लागले…..सायबर गुन्हा उघडकीस आणल्यावर दक्षता मासिकाने ही याची नोंद घेवून तपास प्रकाशित केलेला होता….
*काय आहे जामतरा*
—————
तुम्हाला बॅंकेकडून फसवणूकीचे जे फोन येतात ते मुख्यतःजामतरा याच गावातून येत असतात.जामतरा झारखंड राज्यातील भाग आहे. नावाचाच जिल्हा आहे. एका तालुक्याच्या गावापेक्षा सुध्दा कमी लोकसंख्या असलेलं छोटं गाव आहे.चोहो बाजूंनी घनदाट अरण्य,दुथडी वाहणार्या नद्या,सगळीकडे नुसती दलदल,लहान लहान टेकड्या असा हा अती दुर्गम भाग. या भागात अशिक्षीतांचे प्रमाण खुप जास्त पण देशभरातल्या एकूण सायबर क्राईम पैकी ८० टक्के सायबर क्राईम करणारे सायबर गुन्हेगार येथीलच असतात.
इथल्या घरा घरात तरूण मुलं लॅपटाॅप व मोबाईल वर हा खेळ खेळतात. संपुर्ण कुटूंब या फ्रॉड करण्याच्या बिझनेस मध्ये गुंतलेले असतात.यांचे जवळ मोठ्या प्रमाणात विविध कंपन्याचे बोगस सिमकार्ड असतात व त्या कार्डचाच हे वापर वेगवेगळ्या मोबाईल मध्ये करीत असतात.पुर्वी घरात बसूनच काम केलं जात होतं.पण हे गाव पोलीसांच्या रडारवर आल्यानंतर दोन-चार जणांच्या टोळक्याने जंगलात बसून हे सायबर गुन्हेगारी कृत्य करणे सुरू केले. पोलीस शोधायला आलेत तर जंगलात लपता येतं.बोगस सिम,वेगवेगळे मोबाईल,घनदाट जंगलाचा वापर व संघटीत गुन्हे करण्याची पध्दत यामुळे इथले गुन्हेगार कधीच पोलीसांच्या तावडीत सापडत नव्हते. त्यामुळेच कितीही शोध घेतला तरी यांचा हा गुन्हेगारी खेळ निर्धास्तपणे सुरू असायचा नव्हे अजूनही सुरूच आहे.
*गुन्हे करण्याची पध्दत*
—————-
विविध कंपन्याचे सिरीज नुसार नंतरचे पाच नंबर अॅटरॅन्डम लावून मोबाईल वरुन फोन केला जातो. आपल्याला देखील अनेकदा फोन आला असेल की,आपलं सिम कार्ड ब्लॉक झालं आहे. सुरू करायचे असल्यास आम्ही सांगतो त्या त्या गोष्टी करा.आपण” हो ” म्हणताच आपल्या एटीएम कार्डवरील नंबर विचारला जातो… त्यानंतर CVV नंबर मागितला जातो. २०१४ व त्यापुर्वी अर्थात ऑनलाईन ट्रान्सेक्शन करण्यासाठी टू फॅक्टर सिस्टिम नव्हती.
म्हणजे तुम्ही कन्फर्मेशन देण्यासाठी तेव्हा मोबाईलवर OTP क्रमांक येत नव्हता. अशा काळात या प्रकारे फक्त कार्डचे डिटेल्स घेवून तुमच्या नावाने पैसे काढले जात होते. त्यानंतर OTP सांगा असे म्हणतात.बॅंकेतून फोन आहे म्हटल्यावर आपण बिनधास्त पणे नंबर सांगून मोकळे होतो. आणि काही क्षणात तुमच्या खात्यातील सर्व रक्कम दुसर्याचे खात्यात वळती केली जाते व तुमचे खात्यात काहीच रक्कम शिल्लक राहिली नसल्याचे कळते.
*त्यानंतर हे पैसे कुठे जातात.*
———————
तुम्हाला फसवून वळते करण्यात आलेले पैसे जामतरा गावातल्या फ्रॉड व्यक्तिच्या अकाऊंटवर जमा होतात.पण ते थेट जात नाहीत.असा फोन करणारे आपला अकाऊंट नंबर देत नाहीत.ते काय करतात तर तेथीलच दुसर्या व्यक्तीसोबत कमिशन बेसिसवर त्याचे बँक अकाऊंट भाड्याने घेतात. त्यांच्या अकाऊंटवर पैसे वळते करतात. त्याला वीस टक्के कमीशन देतात व स्वतः ८० टक्के घेतात. दूसऱ्याच्या अकाऊंटचा वापर पोलीस आपल्या पर्यन्त पोहचू नये म्हणून करतात.
*जामताडा पॅटर्न कधी अस्तित्वात आला.*
——————————
प्रत्यक्षात इथे ही गुन्हेगारी कधीपासून सुरू झाली हे ठामपणे सांगता येणार नाही. पण मागील सहा ते सात वर्षांपासून हे सगळं उघड झाले.मंडल नावाच्या दोन सख्या भावांनी ऑनलाईन फ्रॉड करण्याची ही टेक्निक शोधून काढली. एकाला धरून दूसरा आणि दूसऱ्याला धरून तिसरा असं करत संपुर्ण परिसर यात गुंतला.एक गुन्हेगार दिवसाला दिडशे ते दोनशे फोन करतो. दिवसाला कधी पाच दहा लाख पण मिळून जातात.यातून यांना झटपट श्रीमंतीचे वेध लागलेत व यांनी लोकांना फसविणे सुरू केले. विशेष म्हणजे यात लिप्त असणारी सगळी मुलं अठरा ते पंचवीस वयाची असून ही दहावी नापास असणारी मुलं आहेत. तरी ती ऑनलाईन फसवणुकी मध्ये मास्टर म्हणून ओळखली जातात.
*इतकं सगळं असून मग पोलीस काय करतात*
तांत्रिक पध्दतीचा तपास करून या आरोपींना हूडकून काढतात.पण शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे.
*आत्ता यापासून कस वाचाचं.*
———————– “सावज होण्याआधीच व्हा सावध ” असा निर्वाणीचा सल्ला पोलीसांनी दिला आहे. त्याचे आपण पालन तर कराच व इतर लोकांना ही सावध राहायला सांगा…. बँकानी आपले व्हिजील्नस सायबर सेल सेंटर उघडून ग्राहकांचा डेटा सिक्युर्ड करा.ग्राहकांना व पोलीसांना सहकार्य करा जेणे करून व्हायलेट मधून फसवणुकीची रक्कम सायबर गुन्हेगांराच्या खात्यात वळती होणार नाही व ती ग्राहकांना परत कशी मिळू शकेल या साठी प्रयत्न करा…जास्तीत जास्त जनजागृती करा.ग्राहकांना समाधान मिळेल व त्याचा विश्वास कायम राहील असे उपक्रम राबवा….हीच आपली जनसेवा देशसेवा..
अरविंद सराफ.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










खूपच मस्त 👌
छान.
जागरुक होणे गरजेचे.
हो ना. सुशिक्षीतच खुप फसतात.
Thanks
छान लिहिले ..सर
धन्यवाद बेटा