पर्यावरणाची चाहूल
पावसाळा सुरू पण झाला…यावेळी करोना च्या संकटामुळे उन्हाळा आला कसा अन गेला कसा कळल पण नाही….लाॅकडाऊन मुळे घरात कसे सर्व चिडीचूप..पण जिभेचे लाड तर झालेच असतील..मस्त रस पुरी चा बेत..निरनिराळ्या फळांचा शेक…अजुन बरेच काही चाखायला मिळाले असेल….फळांचा स्वाद तर आपण घेतला..मग फळांच्या बिया ,आंब्याची कोय डस्टबिन मध्ये फेकून दिली की काय?…..बर ज्यांनी पर्यावरण चे मुख्य स्त्रोत म्हणजेच बिया फेकल्या असतील… तर आता बिया फेकून न देता जमा करा… ज्यांना पर्यावरणाचे महत्व माहीती आहे त्यांनी बिया जमा करून ठेवल्या असतीलच…
तर चला आपण एक लहाणपणी खेळलेला एक खेळ खेळुया…..
तुम्ही विचार करत असाल येडा की खुळा झाला हा…. फेकायच्या वस्तु जमा करायला सांगतो…हो मि खुळाच..पण मला खुळा कुणी बनवलं …सन राईज शाळेच्या इवल्याशा मुलांनी….मागल्या वर्षी काय ती वृक्ष दिंडी,काय ते पर्यावरण च पथ नाट्य..काय ते लहान मुलांच पर्यावरणा वरील भाषण….मी तर पार येडाच झालो…म्हणलं आपल्या पेक्षा ही बारकी पोरं बरी…वातावरण शुध्द कसं राहावं याचा ईचार तरी करतात….अण आपण लई शहाणे पण तरी म्याडच…आपण फक्त आपलाच ईचार करतो अन हे बारके पोट्टे साऱ्याचा ईचार करतेत, मंग सांगा हुशार कोण…..आपण की ते बारके पोट्टे…..मग खेळता का माझ्या सोबत खेळ……
जसं विविध खाद्य पदार्थ बनवायला रेसीपी असते तसंच पर्यावरण रक्षणासाठी पण रेसीपी असते..एक घमेलं माती,थोड शेणखत,एक लहान बादली पाणी… लोकांना निरूपयोगी असलेल्या पण पर्यावरण करीता महत्वाचे म्हणजेच तुम्ही जमवलेल्या विविध फळांच्या बिया….अस साहीत्य जमा करा…माती, शेणखत, पाणी यांच मिश्रण तयार करून कणकी साठी पीठ मळतो तस मळून घ्या..त्याचे लहान लहान गोळे करा…..त्या मातीच्या गोळ्यात एक एक बी टाका….लाडू सारखं बांधून ते मातीचे गोळे उन्हात ठेवा….झाले न तुमचे **सिड्स बाॅल** तयार…
आता काय करायचं…जिथे जिथे फिरायला जाल तेव्हा निर्जन जागा,खुली पहाडी जागा पाहून सिड्स बाॅल तेथे टाकून दया…तुम्ही म्हणाल खरंच म्याड झाला हा बुवा….फेकायचे होते तर कायले करायले लावले…
तर ऐका न मजा सांगतो… पाऊस पडला की ते गोळे मातीत ईरधळन ….अन बी जमिनीत धसन….अन त्या बी ले येईन न कोंब…मंग ते कोंब वाढीन…अन एक झाड हुईनं तयार…
जेवढे सिड्स बाॅल तयार करून फेकाल….तेवढे लागतीनं झाड…
झाडे वाढली तर आपण प्रदुषण मुक्त होवू …सावली मिळेल…..आपली पुढील पिढी फळं चाखतील….. निसर्गाची कृपा होईल…आहे की नाही मज्जा…तर चला आपण सर्व प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती करीता शपथ घेवून या पर्यावरणा चे कार्यात सहभागी होवू या……
झाडे लावूया…,झाडे जगवू या……
{अरविंद सराफ }
{सेवानिवृत्त पोलीस अधिकारी }
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा