१-अपराध कथा-अपराधी कोण?
१-अपराध कथा-अपराधी कोण?

१-अपराध कथा-अपराधी कोण?

१-अपराधी कोण?
अपराध कथा
निवडणूकीतील उमेदवारांचा प्रचार थांबला.
बरेच जण निवडणूकीमध्ये उभे असले तरी खरा सामना ओमप्रकाश तिवारी आणि गजानन राऊत यांच्यात होता.
वर्षानुवर्षे तिवारीकडे असलेली आमदारकीची खुर्ची या निवडणूकीत डगमगायला लागली.
याला कारण म्हणजे ओमप्रकाशच्या मुलाची गुन्हेगारी वृत्ती.
ओमप्रकाशचे कुटूंब मोठे होते.दोन भाऊ,ओमप्रकाश.तिनही भाऊ सोबत राहत होते.पेट्रोल पंप,ट्रॕव्हलस् कंपनी,बांधकाम व्यवसाय,वडिलोपार्जित संपत्ती अशी कुटूंबात बरीच मालमत्ता होती.
मोठा भाऊ जगमोहनला दोन मुली,सत्यप्रकाशाला एक मुलगा,एक मुलगी.
 ओमप्रकाशला एक मुलगा विक्रांत.
 विक्रांतचे चुलतभाऊ विक्रमसोबतही जमत नव्हते.
वडिलांच्या सत्तेचा कैफ चढलेला विक्रांत कुणालाही जुमानत नव्हता.त्याच्या रगेल आणि  रंगेल वृत्तीमुळे ओमप्रकाश तिवारीही वैतागला होता.विक्रांतमुळे ओमप्रकाशची लोकप्रियता कमी झाली.त्याचा फायदा गजानन तिवारीने उचलला. ओमप्रकाशची खात्रीची मते यावेळी बेलगाम विक्रांतमुळे गजानन तिवारीकडे वळली.
प्रचार थंडावला.निवडणूका दोन दिवसांवर आल्या.
आणि  पेपरमध्ये बातमी झळकली.बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक होती.
विक्रांत तिवारीचा खून.खुनी फरार.
या बातमीने पूर्ण शहरात खळबळ उडाली.तिनदा निवडून आलेल्या आमदाराचा मुलगा विक्रांत मागच्याच महिन्यात बलात्काराच्या आरोपातून सुटला होता.
तिवारीच्या बंगल्यात फटाके वाजवून त्याचे स्वागत झाले होते.
विक्रांत तिवारीही स्वतःच्या निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र घेऊन प्रचारात सहभागी झाला होता.
आणि आज अचानक……
पूर्ण पोलीसखाते खून्याचा  शोध घेत होते.राजकारणात असूनही  ओमप्रकाश तिवारीचे शत्रु कमी होते.सगळ्यांसोबत मित्रत्व जपण्याचा ओमप्रकाशचा प्रयत्न असायचा.बरीच वर्ष  राजकारणात असलेल्या ओमप्रकाशची सत्ताधारी पक्षात वट होती. पण विक्रांतच्या
खुन्याचा  एकही धागा मिळत नव्हता. पोलिसांवर राजकीय  दबाव वाढत होता.
निवडणुका संपल्या. यावेळी ओमप्रकाश तिवारी अगदी मोजक्या मतांनी निवडून आला.
विक्रांतचा खुनी कोण असेल…तपास सुरु होता.
ज्या मुलीवर विक्रांतने बलात्कार केल्याचा आरोप होता तिथेही पोलीस जाऊन आले.पण दोन वेळ पोट भरण्याची भ्रांत असलेले कुटुंब असे काही करणार नाही याची पोलिसांना त्यांना खात्री पटली.
गजानन राऊत?
नव्यानेच राजकारणात उदयास आलेला राऊत तर नसेल खुनामागे? पोलिसांनी त्या दिशेने तपासाची सुत्रे फिरवली.
राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेला  गजानन राऊत
खूप परिश्रमाने इथवर पोहचला होता.
ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत त्याला जिंकायची होती पण बाजी ओमप्रकाशच्या हातात गेली.आता गजानन राऊत पुढील  निवडणूकीची तयारी करण्यात व्यस्त झाला.
त्याचा राजकीय शत्रू ओमप्रकाश होता.विक्रांतला संपवण्यात त्याचा काय  फायदा होता…त्याने संपवले असेल का विक्रांतला?
ओमप्रकाशने बऱ्याच व्यवसायात जम बसवला होतो.त्याच्या  त्या व्यवसायातील स्पर्धकाचीही कसून चौकशी झाली पण काही सुगावा लागत नव्हता.
 पोलिसखाते चक्रावले.वरुन दबाव येत होता. तपास सुरुच होता.
हळूहळू वातावरण शांत झाले.
पोलिसांचा तपास सुरु होता पण वेग मंदावला.
एक महिन्यात शहरात अजून एक खून झाला.महेंद्र पांडे शहरातील बांधकामाचे कंत्राट घेणारा व्यावसायिक.पोलिसांनी खुनाची चौकशी सुरु केली.महेंद्र पांडेही बलात्काराच्या आरोपातून पाचेक महिन्यापूर्वी सुटला होता.
त्याच्या घरी बायको,दोन वर्षाचा छोटा मुलगा होता.आईवडील खेड्यात राहत होते.बांधकाम क्षेत्रात असलेल्या महेंद्रवर भरपूर कर्ज होते.यापलीकडे पोलिसांना काहीही माहिती  मिळाली नाही.
एका महिन्यात दोन खून झाल्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले.
पोलीस कमीशनरने तातडीची बैठक बोलवली. काहीही करुन दोन्ही खुनांचा गुंता सोडवणे आवश्यक होते.
राजकीय दबाव वाढत होता.
कोण असेल खुनी? दोघांचाही खुनी एकच असेल कि वेगवेगळे? लोक कुजबुजत होते.
खूनी शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु होते.
ओमप्रकाश तिवारीच्या प्रयत्नाने केस crime branch कडे सोपवण्यात आली.
तेथील निष्णात अधिकारी अजय भोसलेकडे तपासाची सुत्रे गेली.
एका महिन्यात खूनी सापडला पाहिजे अशी orderमिळाली.
अजय भोसले कामाला लागले.सोबत ज्युनियर अधिकारी उदय नगराळे  होतेच.
भोसले आणि नगराळेनी अनेक केसेस सोबत सोडवल्या होत्या.
उदय नगराळे- साहेब एका महिन्यात दोन खून.तेही निर्दोष सुटलेल्या आरोपींचे.आश्चर्य आहे.
काय वाटते तुम्हाला?
एकानेच केले असेल का दोन्ही खून?
पण खून करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
अजय भोसले शांतपणे विक्रांतची फाईल वाचत होते….
नगराळे,काही ठरवता नाही येत आहे सध्या.
खूनी एक आहे कि दोघे…काही अंदाजच नाही येत आहे.
साहेब सगळे थरारकच वाटत आहे.दोन्ही खून डोक शांत ठेऊन शांतपणे केले आहे.
हो.तसेच वाटत आहे.नगराळे उद्या त्या दोन्ही मुली कुठल्या होत्या तिथे तपास करायला जाऊ. बघू एखादा धागा मिळाला तर.
हो साहेब
दुसऱ्या दिवशी दोघेही निघाले.आधी विक्रांतने बलात्कार केलेल्या मुलीकडे -ताराकडे गेले.तिने बलात्कारानंतर आत्महत्या केली होती.दारिद्रयाच्या ओझ्याखाली पिचलेल्या आईवडिलांना मुलीवरचा अन्याय,तिने आयुष्य संपवल्याचे दुःख विसरणे भाग होते.
गरीब असूनही ताराने शिकावे या हेतूने ताराला जवळच असलेल्या शहरात काॕलेजमध्ये शिकायला पाठवले.शहर जवळच असल्यामुळे ती रोज सायकलने जाणे येणे करत होती.संध्याकाळी ती काॕलेजमधून येत असतांना विक्रांतने तिच्यासोबत कुकर्म केले होते.
गुन्हा विक्रांतने केला शिक्षा ताराला मिळाली.
दारिद्रयातून मुलगीच आपल्याला बाहेर काढेल असे स्वप्न बघणारे आईवडील हतबल झाले होते.ते काहीही बोलण्याच्या,सांगण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
हात जोडत त्यांनी काहीही बोलण्याची असमर्थता दाखवली.
भोसले,नगराळे तिथून निघाले.महेंद्रने ज्या मुलीवर अन्याय केला तिथे पोहचले.
नंदा-महेंद्रच्या बांधकामावर काम करणाऱ्या बबनची ही नुकतीच वयात आलेली मुलगी.वडिलांना डब्बा पोहचवायला आली.महेंद्रची नजर तिच्यावर गेली….
नगराळेंनी नंदाला काही प्रश्न विचारले पण घाबरलेली ती काही बोलायला तयार नव्हती.
बबनचे काम बंद झाले होते,महेंद्रचा खून झाल्यापासून पोलिसही चौकशी करायला येत होते.नाना प्रश्न  विचारुन भंडावत होते…..
क्रमशः
कोण असेल खुनी?
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!