१४-स्वप्न तहानलेले
१४-स्वप्न तहानलेले

१४-स्वप्न तहानलेले

स्वप्न तहानलेले

ज्योती रामटेके

कनक,आंनदी नदीवरून घरी निघाले. आभाळ जोरात गर्जत होते. विजा चमकत होत्या.

कनक, दादा आज बाहेर गावी गेला आहे.परीक्षा. पास झाला तो.आज मुलाखत होती.त्याला नौकरी लागली कि चांगले दिवस येतील आमचे.आई,बाबांनी खूप कष्ट केले आयुष्यभर.आज दुपारपासून आई देवाजवळ बसून आहे. बाबांची तब्येत बरी नसते.घराची जबाबदारी दादावर आली आहे.बाबाचा दवाखान्याचा खर्च वाढला आहे.

आंनदी सर्व ठीक होईल. उद्या पेढे घेऊन ये. दादाला नक्कीच नौकरी मिळणार.आणि हो.. उद्या नदीकाठावर भरपूर गोष्टी करायच्या आहेत.बाबाचा होकार महत्वाचा होता.जा बरोबर..

दारात आक्का उभी होती.तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत होती.
आराधना झोपाळ्यावर बसून होती.तिच्या चेहरा उदास दिसला कनकला. आताशा आराधना जरा जास्तच नाराज दिसते हे कनकला जाणवत होते. कामाव्यतिरिक्त दोघे फारसे बोलत नव्हते. आराधना सहसा कनकला टाळायची.

रात्र झाली.आंनदीची आई स्वयंपाकघरात होती. आज कनक खूष होता.जेवण सुरू होते.

तेवढ्यात आंनदी रडत आली. आई चल लवकर . दादाला कुणीतरी बेदम मारहाण केली आहे ग. बाबा दवाखान्यात घेऊन गेले.

अरे देवा.. म्हणत आई कोसळली.

आपले तर कुणासोबत वैर नाही. कोण असतील ते मारणारे?

ते ओळखू आले नाही.अंधार होता.

आनंदीचे बोलणे ऐकून कनक धावत आला.
त्याच्या सर्व लक्षात आले. आक्काच्या चेहऱ्यावर दिसणारी चमक त्याला कळली.तिचे रहस्य कळायला त्याला वेळ लागला नाही.

आंनदीची शंका खरी ठरली होती. तिला लहानपणापासून आक्काची भीती वाटायची.आराधनासाठी आक्का कोणत्याही थराला जाऊ शकते याची कल्पना आंनदीला होती.तिचे मन नेहमीच धास्तावलेले असायचे.

दादाला बरीच मारहाण करण्यात आली होती…बाबा काळजीत बसून होते.दादाला नौकरी मिळाली होती पण त्याचा आंनद निघून गेला होता.
आंनदी शांत बसून विचार करत होती.

कनकच्या आयुष्यातून निघून जाणे हा एकच मार्ग तिला दिसत होता.

सर्वांचे आयुष्य पणाला लावून ती कधीच खूष राहू शकणार नाही हे आंनदीला कळत होते.अठ्ठाहास करून काय साध्य होणार? आक्का कनकला सुखाने नाही जगू देणार.

कनक माझ्याशिवाय जगू शकेल का? आणि माझे काय? मी तर कल्पना देखील करु शकत नाही.लहानपणापासून बघितलेली स्वप्ने कशी पायदळी तुडवू?कनकच्या भावनांचे काय? लोक म्हणतात तेच खरे आहे सुख मागून मिळत नाही. ते नशीबात असायला हवे.

हातात आलेले सुख अलगदपणे हातातून निसटत जात आहे.

पहिल्या पावसाचा स्पर्श,तो बेधुंद करणारा मातीचा सुगंध.
नदीकाठावरील गोष्टी. वाळूत बांधलेले घरटे. पावसात नखशिखान्त भिजत पाणी उडवत उड्या मारणे…. कनक तुझ्या चेहऱ्यावरुन ओघळणारे जलबिंदू किती सुंदर दिसायचे,तुझ्यासारखेच पारदर्शक. लहानपणीच्या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले हे आपल्याला कळलेच नाही.
अबोध वयातील प्रेम काळजात घट्ट रुतत गेले.मला माझ्या परिस्थितीची जाणीव होती.

तू चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला.घरात श्रीमंती,पण तू कधीच मला या गोष्टी जाणवू दिल्या नाही. त्या वयात मलाही या गोष्टी जाणवल्या नाही. आक्काची भेदक नजर मात्र जाणवायची.
कळत नव्हते काही.मी पण वेडीच होती. तेव्हाच स्वतःला सावरले असते तर…

दादाची तब्येत अजून सावरली नव्हती कनक त्याला भेटायला येत होता. आंनदी मुद्दामच तेव्हा घरी राहायची.
कनक दवाखान्यात तिची वाट बघत बसायचा. आंनदी त्याला टाळत आहे हे त्याच्या लक्षात आले होते.
आंनदीला भेटण्याचे प्रयत्न विफल होत होते.कनक अगदी वेड्यासारखा झाला. रोज भेटणारी आंनदी,बरेच दिवसापासून त्याला भेटली नव्हती. दीपाला सांगून बघितले.
दीपा तिची जवळची मैत्रीण. तिने कनकची व्यथा, त्याचे वाट बघणे सगळे सांगितले.
एकदा तरी भेट ग. तुझी वाट बघत आहे कनक.

नाही दीपा, कनक समोर दिसल्यावर माझा निश्चय डगमगणार हे माहीत आहे मला.श्रीमंत घराणे आहे ते. पैशाच्या जोरावर आक्का काही पण करु शकते. कनकच्या आयुष्यातून निघून जाणे हा एकच मार्ग मला दिसतो आहे.

आराधनाला कनकची अवस्था बघून वाईट वाटत होते.आक्काच्या मनात मात्र आशेचा किरण दिसत होता.आंनदीच्या आईने वाड्यात जाणे बंद केले. तिचा वेळ दादाच्या सेवेत जाऊ लागला.

दिवस चालले होते. दादाची तब्येत बरी होत होती. पुन्हा असे काही घडले तर..आई,बाबा सहन नाही करु शकणार.
आंनदीने घराबाहेर पडणे बंद केले होते. आभाळात मेघ दाटले कि तिला नदीकाठी जावेसे वाटे. घरात कुणाला काही माहीत नव्हते.

दादाच्या काळजीपोटी आंनदी अस्वस्थ राहते असे आई,बाबाला वाटायचे. घरात पुन्हा लग्नाचा विषय निघाला. धवल बघायला आला. देखणा, कर्तृत्ववान धवल सर्वांना आवडला.आंनदी लग्नाला तयार झाली.घर आंनदात न्हाऊन निघाले. आई, बाबा, दादा मनासारखा मुलगा मिळाला म्हणून खूष होते.

पण आनंदी,तिच्या मनाचे काय…….

 

वेगळया वाटा निराळे आपले आभाळ हे
का तुझ्या माझ्यात असती बंध कुठले ना कळे
कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे……

क्रमशः

Previous Part

https://marathi.shabdaparna.in/१३-स्वप्न-तहानले

प्रिय वाचक,कथामालिका कशी वाटत आहे….आवर्जून सांगा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!